लाँच पूर्वीच “ह्युंदाई क्रेटा २०२४ फेसलिफ्ट” चा विडिओ वायरल, पहा कशी दिसते आता

Ajinkya Sidwadkar

आदी झोन या यूटुबरने काही दिवसांपूर्वी किया सॉनेट चा विडिओ लाँच आधी वायरल केला होता आणि आता New Creta 2024 Facelift चा संपूर्ण रिव्यू विडिओ लाँच आधी अपलोड करून वायरल केला आहे. या विडिओ मध्ये क्रेटा च्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती रिव्हिल केली आहे.

ह्युंदाई इंडिया, १६ जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात नवीन क्रेटा फेसलिफ्ट अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. गाडी लाँच होताच मराठी मध्ये या गाडीचा रिव्ह्यू आपल्या ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनेल वर येणार आहे त्यामुळे सब्सक्राइब करा. नवीन क्रेटा मध्ये सात व्हेरिएंट्स असणार आहेत यामध्ये ई, ईएक्स, एस, एस( ओ), एसएक्स, एसएक्स टेक, आणि एसएक्स (ओ) या ट्रिम्स दिल्या जातील. गाडीची बुकिंग आधीच सुरु झाली असून ग्राहक २५ हजार रुपयांच्या राशीने हि गाडी बुक करू शकतात. गाडी बुक केल्यानंतर क्रेटाचा वेटिंग पिरियड नेहमी सारखा असणार आहे.

क्रेटा 2024 कलर्स ऑपशन

ट्रिम सारखेच कलर देखील सात ऑपशन्स मध्ये देण्यात येणार आहेत. टॉप व्हेरिएंट साठी काही खास रंग राखून ठेवले जाणार आहेत. सात कलर्स मध्ये रोबस्ट एमराल्ड पर्ल, फायरी रेड, रेंजर खाकी, एबिस ब्लैक, एटलस व्हाइट, टाइटन ग्रे आणि ड्युअल टोन मध्ये काळ्या रूफ सह एटलस व्हाइट कलर ऑपशन दिला जाईल.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

2024 Hyundai Creta dealers

New Creta 2024 Facelift – डिजाईन आणि फीचर्स

नवीन क्रेटा, पूर्वीच्या मॉडेल पेक्षा अधिक बॉक्स शेप मध्ये असणार आहे. पुढील आणि पाठीमागील बम्पर, ग्रील आणि शेप यामध्ये कमालीची आकर्षकता दिली जाणार आहे. या सोबतच लांब आणि आकर्षक डीआरएल्स, कनेक्टेड एलईडी हेडलैंप, सिल्वर फॉक्स स्किड प्लेट दिली आहे आणि रिअरला कनेक्टिंग एलईडी टेललाइट्स सेटअप, शार्क-फिनअँटेना, ३६० डिग्री कॅमेरा दिला जाईल. पूर्वी टेल गेट साठी शॉर्ट लाईट होती पण आता फुल कनेक्टेड टेल लॅम्प असेल.

hyundai creta facelift right rear

क्रेटा फेसलिफ्ट कॉकपीटमध्ये रि-डिझाइन केलेला डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोल लेआउटसह एक सर्व-नवीन केबिन आहे. नवीन कन्विनिएंट आणि सेफटी फीचर्स बाबतीत इंफोटेनमेंट साठी 10.25 स्क्रीन आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी 10.25-इंच डिस्प्ले असा फुल असेम्ब्ली कनेक्टेड सेटअप दिला जाईल, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, नवीन डिजाईनच्या एसी व्हेंट्ससह नवीन एअरकॉन पॅनेल, प्रवास आरामदायी होण्यासाठी अपडेटेड व्हेंटिलेटेड फिचर सह लेदर सीट अपहोल्स्ट्री, 360-डिग्री कॅमेरा आणि रोड सेफटी करीत लेव्हल 2 ADAS देण्यात येईल.

2024 क्रेटा इंजिन पॉवरट्रेन

या नवीन एसयूव्ही मध्ये पूर्वी प्रमाणेच तीन इंजिन पर्याय असणार आहेत. इंजिन मध्ये एक 1.5-लीटर NA पेट्रोल आणि दुसरे 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल असेल तर डिझेल साठी 1.5-लीटर डीजल इंजिन ओप्टिव दिला जाईल. या तीन इंजिनला गिअरबॉक्स पर्यायांमध्ये सहा-स्पीड मॅन्युअल, सहा-स्पीड iMT, ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर, CVT आणि सात-स्पीड DCT यांचा समावेश आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment