गुगल मॅपच नवं ‘इंधन वाचवा’ फिचर जाणून घ्या याबद्दल महत्वाची माहिती

गूगल मॅप ने एक फ्युएल सेविंग, फीचर Launch केलंय, जे आत्तापर्यंत केवळ युरोप, कॅनडा, यूनाइटेड स्टेट मध्येच वापरलं जायचं. पण आता भारतातसुद्धा इंधन बचतीसाठी आणि प्रवास अजून सुखकर होण्यासाठी या google app वापर होणार आहे, जाणून घेऊया या ‘इंधन वाचवा’ फिचरबद्दल अजून महत्वाची माहिती

  • गूगल ऍपच नवं फिचर – फ्युएल सेविंग आणि वैशिष्ट्ये
  • तुमच्या मोबाईल डिवाईस मध्ये फ्युएल सेविंग ( गूगल मैप )इन्स्टॉल करण्याची पद्धत
  • ‘इंधन वाचवा’ इन्स्टॉल करण्याचा फायदा

एखादा प्रवासी जेव्हा अनोळख्या ठिकाणी प्रवास करतो तेव्हा त्याच्यासाठी तो प्रवास जोखमीचा असतो त्याच कारण म्हणजे चुकीची माहिती देणारे लोक आणि गरजेच्या ठिकाणी गाडीसाठी लागणारी इंधन पुरवठा अथवा चार्जिंग स्टेशन व्यवस्था, आणि ह्याच जोखमीच्या प्रॉब्लेमवर आपल्याला गूगल मैप ची मदत मिळते, तुम्हाला तर माहितीच असेल की गूगल मैप मुळे योग्य मार्ग शिवाय तुमच्या दिशेने येणारे इंधन स्टेशन किंवा चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते. पण आता सप्टेंबर २०२२ मध्ये गूगल मॅप स्वतःमध्ये काही बदल वाढवत नवीन फिचर्स ओळखी आणले आहे ज्याच नाव -फुएल सेविंग आहे.

गुगल मॅपमध्ये ‘इंधन वाचवा’ इनस्टॉल करण्याची पद्धत

  • तुमच्या स्मार्टफोनवर Google Maps इनस्टॉल करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो आणि काही इनिशियल्स बनवायचे आहे.
  • नेव्हिगेशन वर टॅप करुन “मार्ग पर्याय” वर क्लिक करा.
  • इको-फ्रेंडली रूटिंग चा वापर म्हणजेच fuel saving चालू करण्यासाठी “इंधन-कार्यक्षम मार्गांना प्राधान्य द्या” वर टॅप करा.
  • तुम्ही तुमच्या गाडीचा इंजिन प्रकार निवडण्यासाठी इंजिन प्रकार या पर्यायावर क्लिक करुन सिलेक्ट करु शकता.
  • दुर्दैवाने यात CNG हा प्रकार अजून मिळाला नाहीये.

Google Map ‘इंधन वाचवा’ फिचर चा फायदा

हे फ्यूल saving फिचर्स ऍक्टिवेट केल्यानंतर गूगल मैप तुम्हाला प्रवास करत असणाऱ्या मार्गावर किती ट्रैफिक आहे, रोड कंडीशन तुमचा किलोमीटरचा प्रवास मोजून दाखवत आणि त्याप्रमाणे मार्ग सुचवेल ज्यामदतीने तुम्ही तुमच्या वेळेत आणि तुम्ही जवळ जवळ 5%  इंधनात बचत करू शकाल. भारतात नव्याने आलेले हे फिचर या आधी भारताबाहेर वापरण्यात आलेय.

हेपण वाचा :

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करुन मिळवा 80% सबसिडी, जाणून घ्या नोंदणीसोबत संपूर्ण माहिती

Gogoro Electric Scooter: अनलिमिटेड रेंज देणारी मेड इन पुणे ई-स्कूटर लाँच, पहा काय आहे खास

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment