टाटाने दिला ग्राहकांना धक्का ! हॅचबॅक कारवर 2.80 लाखपर्यंत सूट, नेक्सॉन आणि टियागो ईव्ही खरेदीवर करा बचत

Published:

Tata Electric Car : टाटाप्रेमींसाठी खुशखबर, Tata Nexon EV आणि Tiago EV या दोन्ही गाड्यांच्या खरेदीवर तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतची बचत होणार, नेक्सॉन ईव्ही प्री-फेसलिफ्ट मॉडेल ‘प्राइम’ आणि ‘मॅक्स’ या दोन वेरिएंट्सची किंमत 1.90 लाख ते 2.80 लाखांने कमी झाली आहे, तर Tata Tiago EV ची किंमत 70,000 रुपयाने स्वस्त करण्यात आली आहे. तुम्ही जर चांगल्या कार बाईंग ऑप्शन्सच्या शोधात असाल किंवा तुम्ही जर स्वस्तात गेम चेंजर आणि परवडणारी टाटा इलेक्ट्रिक कार घरी आणायचा विचार करत असाल, तर तुम्हाला लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा लागणार आहे. शोरूमला विजित करण्याआधी,चला जाणून घेयूया या दोन्ही इलेक्ट्रिक कार संबंधित अधिक माहिती.

नव्या वर्षात टाटाच्या कारच्या किंमती वाढणार या बातमीमुळे वाहनक्षेत्रत अनेक चर्चा रंगल्या, पण आता ह्याच वर्षात टाटाच्या या सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक हॅचबॅक कारच्या किंमतीवर मिळणार डिस्काउंट न्यूज मुळे सगळ्या इलेक्ट्रिक कार कंपनींच्या तोंडच पाणी पळून गेलंय कि काय असं चित्र दिसत आहे; कारण टाटाच्या हॅचबॅक कार डिस्काउंट आयडिया मुळे टाटाचा कार सेलसुद्धा वाढला आहे. डिस्काउंट ठेवण्यामागे दोन ठळक कारणे आहेत; त्यामधील पाहिलं कारण मागील वर्ष 2023 मध्ये टाटांकडून न विकला गेलेला कार स्टॉक साफ करण्यासाठी आणि दुसरं कारण टाटाच्या कारमध्ये येणाऱ्या बॅटरी पॅकची किंमत कमी झाल्यामुळे टाटाच्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही डिस्काउंट

टाटाला पुन्हा एकदा नव्याने ओळख मिळवून देणारी नेक्सॉन ईव्हीच्या प्री-फेसलिफ्ट आणि फेसलिफ्ट या दोन्ही मॉडेलवर कमालीचा डिस्काउंट देण्यात येतोय, यातील नेक्सॉन ईव्ही प्री-फेसलिफ्ट मॉडेल मध्ये ‘प्राइम’ आणि ‘मॅक्स’ व्हर्जन मिळतात, प्राइम व्हर्जनची किंमतीवर 1.90 लाख ते 2.30 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट तर टॉप-ऑफ-द-लाइन मॅक्स या व्हर्जनवर 2.80 लाखांपर्यंतच्या डिस्काउंट देण्यात येत आहे.

पोस्ट-फेसलिफ्ट नेक्सॉन ईव्ही दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत – एमआर आणि एलआर. फियरलेस एमआर, एम्पॉवर्ड + एलआर आणि एम्पॉवर एमआर यावर तुम्हाला तर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, तर फियरलेस + MR, फियरलेस + S MR, फियरलेस + LR व्हेरिएंट वर 65,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

2023 टाटा नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट: इंजिन

Nexon EV फेसलिफ्ट दोन व्हेरिएंट MR आणि LR मध्ये अनुक्रमे 30.2kWh बॅटरी आणि 40.5kWh बॅटरी दिली गेली आहे. एमआरची रेंज 325 किमी आहे, तर एलआरची रेंज 465 किमी आहे.या दोन्ही व्हेरिएंटसाठी स्टँडर्ड चार्जर दिला गेला आहे जो 7.2kW चा आहे, ह्या चार्जरमुळे MR व्हेरिएंटला चार्ज होण्यासाठी 4.3 तास आणि LR व्हेरिएंट चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात.

Nexon EV प्राइममध्ये 30.2kWh बॅटरी पॅक आणि 129hp इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे, हि कार एका चार्जमध्ये 312 किमी रेंज प्रदान करते तर Nexon EV Max मध्ये 40.5kWh बॅटरी पॅक आणि 143hp इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे  जिच्यामुळे मॅक्स एका चार्जमध्ये 437 किमी रेंज प्रदान करते.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

टाटा टियागो ईव्ही डिस्काउंट

Tata Tiago EVची किंमत 7.99 लाख ते 11.89 लाख रुपयांपर्यंत असून, आता या कारवर 70,000 रुपये डिस्काउंट मिळत आहे. Tiago EV च्या मिड-स्पेक XTव्हेरिएंटवर 30,000 रुपये, टॉप-स्पेक XZ+ व्हेरियंटवर 15,000 रुपये इतकी सूट दिली जात आहे.

वाचा: ही घ्या टाटाच्या नव्या 3 वेरिएंट्सची किंमत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

टाटा टियागो ईव्ही फेसलिफ्ट: इंजिन

टाटा टियागो ईव्हीमध्ये इलेक्ट्रिक मोटरशी जोडले गेलेल्या 2 बॅटरी पॅक ऑप्शन दिले गेले आहेत, 19.2 kWh आणि 24 kWh. ह्या कारद्वारे 250 किमी ते 315 किमीपर्यंत अंतर कापले जाऊ शकते. 15 A सॉकेट चार्जर, 3.3 kW AC चार्जर, 7.2 kW AC चार्जर आणि एक DC फास्ट चार्जर हे चार चार्जिंग ऑप्शन्स या कारमध्ये मिळतात.

Huge Discounts On Tata Nexon EV | Tata Electric Cars Price 2024 | Electric Vehicles India

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version