ही घ्या टाटाच्या नव्या 3 वेरिएंट्सची किंमत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Published:

Bestselling Tata Punch Gets 3 New Variant: सुप्रसिद्ध कार निर्माता टाटा मोटर्सच्या लोकप्रिय आणि पॉप्युलर पंच SUV मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, इतके दिवस टाटा पंच 10 वेरिएंटमध्ये उपलब्ध होती, पण आता जुन्या 10 वेरिएंटला नव्या 3 वेरिएंटने रिप्लेस केलं असून, क्रिएटिव MT, क्रिएटिव फ्लैगशिप MT आणि क्रिएटिव AMT हे वेरिएंट पंचला मिळत आहेत. नव्या व्हेरिएंट्ससोबत टाटा पंचला नव्या किंमतीसुद्धा मिळाल्या आहेत, जुन्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत नव्या किंमतीमध्ये साधारण 3000 ते 17,000 रुपये ज्यादा रक्कम असणार आहे.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

टाटा पंचचे 10 प्रकार बंद

याआधी टाटा पंचच्या लाइनअपमध्ये 10 वेरिएंट उपलब्ध असायचे; ज्यामध्ये 8 कॅमो एडिशन्स- कॅमो ॲडव्हेंचर एमटी, कॅमो ॲडव्हेंचर रिदम एमटी, कॅमो ॲडव्हेंचर एएमटी, कॅमो ॲक्प्लिश्ड एमटी, कॅमो ॲडव्हेंचर रिदम एएमटी, कॅमो ॲक्प्लिश्ड डॅझल एमटी, कॅमो ॲक्प्लिश्ड एएमटी, कॅमो ॲक्प्लिश्ड डॅझल एएमटी आणि क्रिएटिव्ह ड्युअल-टोन आणि क्रिएटिव्ह फ्लॅगशिप एमटी ड्युअल-टोन या व्हेरिएंट्सचा समावेश होता पण आता हे सर्व व्हेरिएंट्स काढून पंच SUV मध्ये 3 नवीन प्रकार जोडले गेले आहेत. हे उत्पादन कार्यक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी केले गेले आहेत.

वाचा: Tata Punch EV Prices: पंच ईव्ही सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती (फेब्रुवारी)

टाटा पंच नवीन 3 वेरिएंट

ग्लोबल एनसीएपी 5 स्टार मिळवणाऱ्या टाटा पंचला अडल्ट  ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार रेटिंग आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 4-स्टार रेटिंग मिळाले आहेत. टाटांची आत्तापर्यन्तची सर्वात जास्त विकली जाणारी कार पंचच्या नव्या क्रिएटिव्ह एमटी, क्रिएटिव्ह फ्लॅगशिप एमटी आणि क्रिएटिव्ह एएमटी व्हेरिएंट्समध्ये बऱ्याच फीचर्सचा समावेश केला गेला आहे.

टाटा पंच स्पेसिफिकेशन्स

ड्रायव्हर वन-टच अप विंडो आणि टायर प्रेशर 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि क्रूझ कंट्रोलची सुविधा,कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, मागील सीट आर्म रेस्ट, लेदर स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, R16 डायमंड कट अलॉय व्हील्स, रूफ रेल, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो फोल्डिंग ORVM, रिअर वाइपर + वॉश, रिअर डीफॉगर आणि पुडल लॅम्प्स यांचा समावेश आहे.

या तीन व्हेरिएटमधल्या क्रिएटिव्ह पेट्रोल व्हेरियंटमध्ये सनरूफ पॅक आणि फ्लॅगशिप पॅकचा समावेश असून, ह्या इलेक्ट्रिक सनरूफसाठी व्हॉइस असिस्ट आणि शार्क फिन अँटेना हे पर्याय उपलब्ध आहेत तर त्याच ठिकाणी फ्लॅगशिप पॅकमध्ये सनरूफ पॅकसोबत ज्यादा iRA कनेक्टेडटेकनॉलॉजीची जोड दिली गेली आहे.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

पंचच्या नवीन प्रकारांची ही किंमत

नव्या वर्षात टाटाच्या संपूर्ण सेगमेंटच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे, आणि यामध्ये पंच्च्या नव्या व्हेरियंटचा समावेश आहे, पंचाच्या क्रिएटिव्ह एमटी व्हेरिएंटच किंमत रु. 8.85 लाख , क्रिएटिव्ह फ्लॅगशिप एमटीची किंमत रु. 9.60 लाख आणि क्रिएटिव्ह एएमटी प्रकारांची किंमत रु. 9.45 लाख आहे. (एक्स-शोरूम).

थोडक्यात पंचच्या किंमतीमध्ये 17,000 रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. पंच CNG  व्हेरियंटमध्ये 17,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे तर बेस प्युअर एमटी व्हेरियंटमध्ये 13,000 रुपयांनी दरवाढ झाली आहे.

Punch Adventure Rhythm Pack | Tata New Logo | Punch Adventure Rhythm 2024 Model | Tata Punch 2024..

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version