Kia Carens Update: मारुती आर्टिगला टक्कर देणाऱ्या किआ कॅरेन्स बद्दल बॅड न्यूज

किआ इंडियाने त्यांच्या लोकप्रिय एमपीवी मधील ब्राउन या रंगाला बंद केले असून ७ ऐवजी आता ग्राहकांना फक्त ६ कलर ऑप्शन्स सेलेक्ट करता येणार आहेत.

  • किआ कॅरेन्समधील लोकप्रिय रंग डिस्कंटिन्यू
  • १०.४५ लाख (एक्स-शोरूम) रुपये किमतीत पासून सुरु होते कॅरेन्स

Kia Carens Color Discontinue Update

किआ इंडिया ने कॅरेन्स या एमपीवीला नुकताच कलर संदर्भात एक छोटा अपडेट देत ग्राहकांना झटका दिला आहे. ही एमपीवी आता सात कलर ऑप्शन्स ऐवजी आता फक्त सहा कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध असून आता पासून ग्राहकांना मॉस ब्राउन हा लोकप्रिय कलर खरेदी करता येणार नाहीये. किआ कॅरेन्स मध्ये आता फक्त ६ कलर्स उपलब्ध असणारे आहेत ज्यामध्ये इंटेन्स रेड, इंप्रेरियल ब्लू, ऑरोर ब्लॅक पर्ल, स्पार्कलिंग सिल्वर, ग्रॅव्हीटी ग्रे आणि ग्लेशियर व्हाईट पर्ल असे ऑप्शन्स असतील.

किआ कॅरेन्स २०२३ या मॉडल मध्ये टोटल ७ व्हेरिएंट उपलब्ध असतील ज्यामध्ये प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्जरी, लक्जरी O, लक्जरी प्लस आणि एक्स-लाईन. कॅरेन्स एमपीवीचे सुरवातीचे मॉडल रुपये १०.४५ लाखांपासून सुरू होते, ही किंमत एक्स शोरूम आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२३ मध्ये नुकतेच या गाडीला मोठा अपडेट देत एक्स-लाईन व्हेरिएंट रुपये १८.९५ लाखांत लाँच केले होते.

वाचा – Bharat NCAP Tests साठी हुंदाई पाठवणार तीन लोकप्रिय वाहन; पास होणार कि नापास, पहा लिस्ट

किआ कॅरेन्स इंजिन ऑप्शन्स

किआ कॅरेन्स मध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. सध्या किआ मध्ये १.५ लिटर नैचुरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, १.५ लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिन दिले आहे. ट्रांसमिशनचे पर्याय पाहिले टीआर सहा स्पीड मैन्युअल, सहा स्पीड iMT, सात स्पीड DCT आणिऑटोमैटिक टॉर्क कन्व्हर्टर गियरबॉक्स ऑप्शनस दिले गेले आहेत.

किआ कॅरेन्सचे १.५ लिटर NA पेट्रोल इंजिन ११३ BHP आणि १४४ nm टॉर्क प्रोड्यूस करते आणि हे इंजिन ६ स्पीड मैन्युअल ट्रांसमिशन सह येते. दुसरे १.५ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन १५८ BHP आणि २५३ nm टॉर्क प्रोड्यूस करते आणि हे इंजिन ६ स्पीड iMT आणि ७ स्पीड DCT गियरबॉक्स सह येते.

वाचा – Tata Nexon VS Suzuki Brezza 2023 – संपूर्ण कंपॅरिजन | कोणती घ्यावी? वाचा माहिती

या एमपीवी मध्ये देण्यात येणारे १.५ लिटर डिझेल इंजिन ११३ BHP आणि २५० nm टॉर्क जनरेट करते, हे इंजिन ६ स्पीड iMT आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सशी जोडले आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment