Bharat NCAP Tests साठी हुंदाई पाठवणार तीन लोकप्रिय वाहन; पास होणार कि नापास, पहा लिस्ट

Hyundai Cars in Bharat NCAP Tests: भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच ज्याला शॉर्ट मध्ये भारत NCAPकिंवा BNCAP म्हटले जाते. या प्रोग्रॅम अंतर्गत लवकरच पाहल्या वाहनांची क्रॅश घेणार असून ह्युंदाई इंडिया आपल्या कार पोर्टफोलिओ मधून तीन वाहन या BNCAP क्रॅश टेस्ट साठी पाठवणार आहे. तथापि ह्युंदाई इंडिया ने कोणती तीन वाहन असतील याबद्दल ऑफिसिअल स्टेटमेंट दिलेले नाही पण आम्ही तुमच्यासाठी ती तीन वाहन कोणती आहेत याबद्दल सविस्तर या लेखात सांगितले आहे.

1. Hyundai Tucson

ह्युंदाई इंडिया त्यांची पहिली कार टक्सन, भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम मध्ये क्रॅश टेस्ट साठी पाठवणार आहे. कंपनी हीच कार क्रॅश टेस्ट साठी पाठ्वण्यामागे कदाचित युरो NCAP आणि लॅटिन NCAP मध्ये मिळालेले चांगले स्कोअर स्टार्स हे कारण असू शकते. Hyundai Tucson ने युरो NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग आणि लॅटिन NCAP मध्ये 3-स्टार रेटिंग मिळवलेले आहे असून ग्लोबल NCAP मध्ये टेस्ट गाडीला झेरो स्टार्स मिळाले आहेत.  भारत NCAP क्रॅश टेस्ट मध्ये टक्सन, 6 एअरबॅग्ज, 3-पॉइंट सीटबेल्ट, ABS, EBD आणि ESC सारख्या सेफटी फीचर्स मुळे ५-स्टार्स रेटिंग मिळवेल अशी अपेक्षा आहे.

वाचा – Tata Nexon Price in India : इतकी आहे ‘ Best SUV Tata Nexon’ ची भारतात किंमत

2. Hyundai Exter

Hyundai Tucson नंतर कंपनी दुसऱ्या क्रमांकावर फक्त भारतासाठी डेव्हलप केलेली मायक्रो एसयूव्ही “एक्सटर” ला भारत एनकॅप मध्ये पाठवू शकते. कंपनीने जुलै २०२३ रोजी भारतीय मार्केट मध्ये टाटा पंच या एकमेव मायक्रो एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी एक्सटर लाँच केली आहे. टाटा पंच सध्या मार्केट मध्ये एकमेव ग्लोबल NCAP मध्ये ५-स्टार्स मिळवलेली गाडी असून सेगमेंट मध्ये सर्वात सुरक्षित वाहन मानले जाते. पंचला सेफटी विभागात टक्कर देण्यासाठी ह्युंदाई तिच्या एक्सटर या गाडीला BNCAP मध्ये टेस्ट करून गाडीच्या सेल्सला बूस्ट करू शकते. सध्या मारुती सुझुकी इग्निस ने ग्लोबल NCAP मध्ये ३ स्टार्स आणि सिट्रोएन C3 ने ० स्टार्स स्कोअर केले आहे.

वाचा – Maruti Wagon R Flex Fuel Launch Date समोर आली, आता सीएनजी लाईनला थांबण्यापासून मुक्तता

3. Hyundai Creta Facelift

भारतातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १ सेलिंग मिड साईज एसयूव्ही क्रेटा हि तिसऱ्या क्रमांकावर भारत NCAP मध्ये क्रॅश टेस्ट साठी पाठवली जाऊ शकते. हुंदाई क्रेटाचे आगामी फेसलिफ्ट जे तिसरे जनरेशन असेल, हे मॉडेल क्रॅश टेस्ट साठी पाठवेल. सर्व प्रवाशांसाठी 6 एअरबॅग्ज आणि 3-पॉइंट सीटबेल्ट दिल्याने क्रेटा फेसलिफ्टला भारत NCAP चाचण्यांमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळू शकेल. आगामी क्रेटा मध्ये ADAS हे फिचर अपडेट केले असेल. क्रेटा ने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये 3-स्टार रेटिंग आणि ASEAN NCAP चाचण्यांमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवले आहे

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment