Maruti Wagon R Flex Fuel Launch Date समोर आली, आता सीएनजी लाईनला थांबण्यापासून मुक्तता

Maruti Wagon R Flex Fuel Launch Date: मारुति सुझुकी इंडिया लवकरच त्यांची लोकप्रिय फॅमिली कार वॅगनआर फ्लेक्स फ्यूल इंधन पर्यायात लाँच करणार आहे. हि कंपनीची पहिली फ्लेक्स फ्यूल इंजिन असणारी गाडी असून पेट्रोल प्रमाणेच पॉवरफुल आणि अधिक मायलेज प्रदान करणार आहे. सध्या मारुती सुझुकीकडे फक्त पेट्रोल + सीएनजी आणि हायब्रीड इंजिन उपलब्ध आहे तर कंपनीने डिझेल इंजिनला काही वर्षापूर्वी राम राम ठोकला असून कंपनीच्या ताफ्यात आता फ्लेक्स फ्युएल इंजिनची एन्ट्री होणार आहे. नवीन फ्लेक्स फ्युएल इंजिन पेट्रोल प्रमाणेच ताकदवान आणि टॉर्की असेल पण फ्लेक्स फ्युएल पेट्रोल पेक्षा स्वस्त असल्याने खिश्याला परवडणारे असेल. आज आम्ही तुम्हाला मारुति सुझुकी वॅगनआर फ्लेक्स फ्युएल गाडीबाबत सर्व माहिती या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.

Maruti Wagon R Flex Fuel 1 marathi
Maruti Wagon R Flex Fuel Launch Date

मारुति सुझुकीने २०२३ ऑटो एक्स्पो मध्ये या आधीच वॅगनआर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाईप शोकेस केले आहे पण गाडीचे फायनल व्हर्जन २०२५ मध्ये भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केले जाणार आहे. कंपनीतर्फे फ्लेक्स इंधनावर चालणारी वॅगनआर हि पहिली वहिली कॉम्पॅक्ट कार असणार आहे. मारुति ऑफिशियल्स ने अजून पर्यंत फ्लेक्स फ्युएल वॅगनआर च्या लाँच बाबत काहीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही

Maruti Wagon R Flex Fuel

Maruti Wagon R Flex Fuel 2 marathi
Maruti Wagon R Flex Fuel Launch Date

मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये वॅगनआर फ्लेक्स-इंधन प्रोटोटाइप प्रदर्शित केला. त्याआधी डिसेंबर २०२२ मध्ये फ्लेक्स वॅगनआर दिल्ली येथे पार पडलेल्या SIAM म्हणजेच सोसाइटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरर्स टेक्नोलॉजी प्रदशनावेळी सुद्धा प्रदर्शन करण्यात आली होती. मारुती फ्लेक्स-इंधन वाहने हि भारतात स्थानिक पातळीवर इंजिनिअर्स च्या साहाय्याने विकसित केली जाणार आहेत. आगामी फ्लेक्स वॅगनआर चे इंजिन 20 टक्के (E20) आणि 85 टक्के (E85) या दोन्ही प्रकारच्या इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर धावण्यास सक्षम असेल. मारुती भारतातील नंबर १ ची ऑटो मेकर कंपनी असून कंपनीच्या या एका पावलामुळे देशातील कच्च्या तेलाची आयात कमी होण्यास मदत होईल आणि देशाच्या कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल.

Maruti Wagon R Flex Fuel 3 marathi
Maruti Wagon R Flex Fuel Launch Date

Maruti Wagon R Flex Fuel Launch Date

Maruti Wagon R Flex Fuel Launch Date
Maruti Wagon R Flex Fuel Launch Date

वॅगनआर फ्लेक्स-इंधन कारमध्ये कंपनी १.२ लिटर नैचुरली एक्सेप्टेड ४ सिलेंडर इंजिन देईल जे 88.5bhp आणि 113Nm टॉर्क प्रोड्युस करेल. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चा पर्याय देखील फ्लेक्स इंजिन सोबत दिला जाणार आहे या शिवाय गाडीचे मायलेज देखील उत्तम मिळणार आहे. मारुती इंजिनिअर्स, इंजिनमध्ये मोठ्याप्रमाणावर बदलावं करून एथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालण्यास सक्षम करणार असून अधिक मायलेज सह सरासरी ७९% वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करेल.

वाचा – New Renault Duster SUV: सीएनजी इंधन, नवीन लुक आणि हायब्रीड इंजिन सह करणार पदार्पण; जाणून घ्या खासियत

Maruti Wagon R Flex Fuel marathi
Maruti Wagon R Flex Fuel Launch Date

Flex Fuel Engine म्हणजे काय?

Flex Fuel Engine म्हणजे काय? हे जाणून घेण्याआधी फ्लेक्स फ्युएल याचा अर्थ समजून घ्या.

फ्लेक्स फ्युएल इंधन म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? – 

फ्लेक्स म्हणजे लवचिक आणि फ्युएल म्हणजे इंधन. समजा तुमच्याकडे फ्लेक्स फ्युएल पेट्रोल कार आहे तर त्यामध्ये तुम्ही १००% पेट्रोल भरू शकता किंवा २०% अथवा ८५% इथेंनॉल संमिश्र पेट्रोल भरू शकता. पेट्रोल मध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे स्टार्च आणि उसाच्या फर्मेंटेशन प्रक्रियेने निर्माण केले जाते, याव्यतिरिक्त पूअर पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल मिश्रित इंधन अधिक स्वस्त आणि अधिक मायलेज देणारे असेल. एकीकडे पेट्रोल ११० रुपये लिटर आहे तर इथेनॉल मिश्रित इंधन ५० ते ९० रुपये लिटर असेल. या लवचिकते मुळे ग्राहक इथेनॉल युक्त पेट्रोल भरून पैसे आणि पर्यावरण दोन्ही वाचवू शकतो.

वाचा – VIP Fancy Number Plate: वाहनासाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक मिळवा

Flex Fuel Engine म्हणजे काय? – 

फ्लेक्स इंधन वाहनांची इंजिने एकाहून अधिक प्रकारच्या इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, इंजिन आणि इंधन प्रणालीमध्ये अनेक बदल करून ते सामान्य पेट्रोल ते इथेनॉल मिश्रित पेट्रोल वर चालण्यास सक्षम केले जातात. असे असले तरी हे इंजन नॉर्मल इंजिनप्रमाणेच कार्यक्षम आणि आकाराने सामान्य असतात.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment