New Renault Duster SUV: सीएनजी इंधन, नवीन लुक आणि हायब्रीड इंजिन सह करणार पदार्पण; जाणून घ्या खासियत

New Renault Duster SUV with CNG: फ्रेंच ऑटो मेकर कंपनी “रेनॉल्ट” लवकरच आपली नवीन जनरेशनची डस्टर एसयूव्ही ग्लोबल प्लॅटफॉर्म वर लाँच करणार असून कंपनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पदार्पण करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. नवीन रेनोल्ट डस्टर एसयूव्ही २९ नोव्हेंबर २०२३ लाँच होणार असली तरी पदार्पण करण्यापूर्वीच गाडीची डिजाईन, फीचर्स आणि इंजिन पॉवर ट्रेन सार्वत्रिक झाले आहेत.

new renault duster spotted testing front 600x338 1

रेनॉल्ट डस्टर वैशिष्ट्ये, आणि इतर तपशील

२९ नोव्हेंबर २०२३ रोजी नवीन डस्टरचे ग्लोबल मार्केट मध्ये पुनरागमन होणार असून हि कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीन लुक, फ्रेश कॉकपीट डिजाईन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने  लोडेड असेलेले फीचर्स ने सुसज्ज असणार आहे. डासिया या अमेरिकन ऑटो मेकरशी भागेदारी करत रेनॉल्ट ने नवीन डस्टरला डिजाईन केले असून प्रथमतः हि एसयूव्ही युरोपियन देशांत विक्री साठी उपलब्ध केली जाईल. काही महिन्यांपूर्वीच रेनॉल्ट इंडिया ने भारतीय बाजारपेठेतून डस्टरचे मॉडेल विक्री साठी डिस्कंटीन्यू केले आहे. तसेच या ‘Renault Duster 2024‘ लाँच साठी भारतीयांना पुढील वर्ष्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Renault Duster 2023 1700208970776 1700208980665

रेनॉल्ट डस्टर 2023 डिजाईन

नवीन रेनॉल्ट डस्टर पारंपरिक भारतीय डिजाईन पेक्षा खूप भिन्न असणार आहे. रेनॉल्ट आणि डासिया या दोन कंपन्यांच्या भागीदारीतून नवीन मॉडेल डेव्हलोप केले असल्याने जुन्या मॉडेल ची छबी पूर्णपणे पुसलेली असल्याचे दिसते आहे.

नवीन जनरेशन डस्टर, रेनॉल्ट आणि निस्सान या जॉईन व्हेंचरने बनवलेल्या CMF-B या प्लॅटफॉर्मवर आधारित असून या प्लॅटफॉर्मवर पेट्रोल, हायब्रिड, सीएनजी आणि इलेकट्रीक मॉडेल डेव्हलप केले जाऊ शकते. या नवीन CMF-B प्लॅटफॉर्म मुळे भारतीय बाजारपेठेत कमी किमतीत डस्टर ईव्ही ची आवृत्ती पाहायला मिळेल.

पारंपरिक डिजाईनला बाजूला सारत नवीन अपडेटेड ग्रील, हॉरीझॉन्टल एलईडी हेडलॅम्प्स, रेडिएटर एअर इन्टेक साठी अपडेटेड बम्पर, ओव्हरऑल डिजाईन मध्ये शार्प कट्स आणि क्रीज, Y या आकाराच्या डीआरएल्स, लोखंडी जाळी, रि-शेप केलेला विंडो एरिया, अपीलिंग बॅक डिजाईन यामुळे ‘डस्टर’  मारुती ग्रँड व्हिटारा, ह्युंदाई क्रेटा, किया सेलटॉस आणि टाटा हॅरीयर यांना तगडे आव्हान उभे करेल.

वाचा – ऑक्टोबर २०२३ मध्ये ई-स्कूटर्स चा जोरदार सेल । Electric Scooter Sale October 2023

बाहेरील अपडेट्स प्रमाणेच डस्टर आतून सुद्धा अग्रेसिव्हली उपडेट करण्यात आलेली असेल. अद्ययावत अपहोल्स्ट्री सीट्स, री-डिजाईन डॅशबोर्ड, ८-१० इंच मोठी इंफोटेंमेंट स्क्रीन, डिजिटल इन्ट्रुमेन्ट पॅनल, वायरलेस चार्जर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो – अँपल कार प्ले, सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस कनेक्टिव्हिटी यासारखी वैशिष्ट्ये ऑफर केले जातील.

वाचा – किया मोटर्स ने गुपचूप बंद केली फेमस कार पण…! – New Kia Carnival MPV

रेनॉल्ट डस्टर 2023 इंजिन पॉवर ट्रेन 

रेनॉल्ट नवीन डस्टर पेट्रोल तसेच हायब्रिड पॉवरट्रेनसह आणि भविष्यात इलेकट्रीक अवतारात मार्केट मध्ये येईल अशी अपेक्षा आहे. नवीन एसयूव्ही मध्ये 1.2-लीटर माइल्ड-हायब्रिड मशीन दिली जाईल जी 130 एचपी पॉवर आणि 1.6-लिटर स्ट्रॉंग-हायब्रिड इंजिन दिले जाईल जे 140 एचपी पॉवर तयार करू शकते. पेट्रोल डस्टरशिवाय सीएनजी आणि डिझेल इंधन पर्यायात उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डस्टर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गियरबॉक्ससह बाजारात लाँच होणार आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment