किया मोटर्स ने गुपचूप बंद केली फेमस कार पण…! – New Kia Carnival MPV

Ajinkya Sidwadkar

Kia Carnival Discontinued: किया इंडियाने गुपचूप कार्निवल हि प्रीमियम एमपीव्ही वेबसाईट वरून हटवली असून ऑफिशीअली “किया कार्निवल” हि एमपीव्ही डिसकंटिन्यू करण्यात आली आहे. हि फेमस कार बंद होण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊया.

Kia Carnival MPV का बंद झाली

Kia India ने 2020 मध्ये कार्निवल भारतीय बाजारपेठेत लाँच केली होती किया च्या वाहनांच्या यादीमध्ये हि सर्वात महागडी फ्लॅगशिप गाडी होती Kia ने BS6 फेज-2 इमिशन नियमांची पूर्तता करण्यासाठी कार्निवल अपडेट केले नाही त्यामुळे कंपनीने या कारला बंद करून त्याजागी चौथ्या जनरेशन च्या कार्निवल फेसलिफ्टवर काम करत आहे. किया KA4 Carnival नवीन अपडेटेड फीचर्स आणि सेफटी मानकासह २०२४ मध्ये लाँच करणार आहे.

kia carnival 2024 asset carousel 1

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

कार्निवल मध्ये 2.2L टर्बो डिझेल इंजिन दिले होते, जे 3800rpm वर 200PS पॉवर,1750rpm आणि 2750rpm दरम्यान 440Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिश गेअरबॉक्स टॉर्क कन्व्हर्टरसह दिले आहे. हे इंजिन किया ने फक्त भारतीय कार्निवल मॉडेल मध्येच वापरले असल्याने, BS6 फेज-2 इमिशन नियमांची पूर्तता करण्यासाठी हे इंजिन अपग्रेड करणे किया साठी खर्चिक होते.

वाचा – New Tata Altroz Racer: टाटा मोटर्स करणार धमाका, Hyundai i20 N line चा द एन्ड?

वाचा – Top 5 Most Awaited Upcoming Cars: महिंद्रा थार ते फोर्स गुरखा या गाड्या पुढच्या काही महीन्यात राडा घालणार

कधी येणार न्यू-जेन किया कार्निवल

किया इंडिया ने कार्निवल एमपीव्ही डिस्कंटीन्यू केल्याने या गाडीच्या प्रेमात असणाऱ्यांना निराश होण्याची गरज नाही. कारण किया २०२४ वर्ष्यात चौथ्या जनरेशन KA4 कार्निवल लाँच करणार आहे. किया ने २०२३ ऑटो एक्स्पो मध्ये फुल साईज प्रीमियम एसयूवी ची झलक सादर केली होती त्यानंतर नुकतीच कंपनीने कार्निवल फेसलिफ्टचा फर्स्ट लुक शोकेस केला आहे. सध्याची कार्निवल बंद केल्याने या सेगमेंट मध्ये मोठा गॅप निर्माण झाला असल्याने त्या सेगमेंटच्या ग्राहकांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. सांगू इच्छितो कि आगामी कार्निवल एमपीव्ही व्हेरिएंट पूर्वी पेक्षा महाग किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.

new project 45 1698502218

फोर्थ जनरेशन कार्निवल MPV कार ADAS सारख्या फीचर्सने सुसज्ज असेल. भारतात कार्निवलचे टोयोटा इंनोवा क्रिस्टा, हायक्रोस या वाहनांशी सरळ स्पर्धा असेल.

वाचा – मारुती सुझुकी स्विफ्ट ADAS लेव्हल २ सह अपडेट होणार, देणार ४० kmpl चे मायलेज, जाणून घ्या खास माहिती

वाचा – टाटा सफारी फेसलिफ्ट संपूर्ण किंमत लिस्ट उघड – ट्रीम्स, कलर्स आणि स्पेक्स

किया कार्निवल फेसलिफ्ट: इंजिन स्पेसिफिकेशन्स

न्यू किया कार्निवलला 2.2-लीटर डीजल इंजिन सह उपलब्ध केले जाईल जे 199 एचपी पावर आणि 440 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनचे गेअरबॉक्स 8-स्पीड ऑटोमॅटिक सोबत ट्यून केले आहे. 1.6-लीटर टर्बो-पेट्रोल हायब्रिड इंजिन आणि 3.5-लीटर नेचुरली एस्पेटेड वी6 पेट्रोल इंजिन चे पर्याय देखील यामध्ये उपलब्ध केले जातील.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment