टाटा सफारी फेसलिफ्ट संपूर्ण किंमत लिस्ट उघड – ट्रीम्स, कलर्स आणि स्पेक्स

टाटा सफारीचे फेसलिफ्ट नुकतेच  दिवसांपूर्वी लाँच झाले. लौंचवेळी कंपनीने फक्त मर्यादिती ट्रीम्सच्या किमती उघड केल्या मात्र आता कंपनीने सर्व ट्रीम्स च्या किमतीवरून पडदा हटवला आहे. हा लेख तुम्हाला फाईव्ह स्टार सेफटी असलेल्या टाटा सफारी फेसलिफ्ट च्या सर्व व्हेरिएंट वाईस किमती, बेस्ट फीचर्स, कलर्स आणि ट्रीम्स सांगणारा असेल.

tata safari 20223 price in maharashtra

नवीन टाटा सफारी संपूर्ण प्राईज लिस्ट

Tata Safari facelift Prices Maharashtra: टाटा सफारी २०२३ टोटल ३० व्हेरिएंट्स मध्ये उपलब्द असणार आहे. ग्राहक आपल्या गरजे नुसार व बजेट नुसार ट्रिम सिलेक्ट करू शकतात. मॅन्युअल ट्रान्समिशन गेअरबॉक्स साठी १८ व्हेरिएंट्स तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन साठी १२ व्हेरिएंट्स उपलब्ध केले गेले आहेत. मॅन्युअल गेअरबॉक्स असणाऱ्या ट्रीम्स १६.२० लाख रुपये एक्स-शोरूम किंमती पासून सुरु होतात आणि टॉप ऑफ द लाईन व्हेरिएंट २५.९४ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमती पर्यंत जाते. जर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱ्या गेअरबॉक्स ट्रीम्स च्या किमतीवर नाराज टाकली तर २०.७० लाख एक्स-शोरूम किंमती पासून सुरु होतात आणि टॉप व्हेरिएंट २७.३४ लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्द आहे.

टाटा सफारीच्या फेसलिफ्ट २०२३ च्या किमतीचा टेबल:

टाटा सफारीच्या फेसलिफ्ट २०२३ एक्स-शोरूम किंमती

व्हेरिएंट्स२.० लि. टर्बो डिझेल MT२.० लि. टर्बो डिझेल AT
Smart₹16,19,000NA
Smart (O)₹16,69,000NA
Pure₹17,69,000NA
Pure (O)₹18,19,000NA
Pure Plus₹19,39,000₹20,69,000
Pure Plus S₹20,39,000₹21,79,000
Pure Plus S Dark₹20,69,000₹22,09,000
Adventure₹20,99,000NA
Adventure Plus₹22,49,000₹23,89,000
Adventure Plus Dark₹23,04,000₹24,44,000
Adventure Plus ADAS₹23,49,000₹24,89,000
Accomplished₹23,99,000₹25,39,000
Accomplished Dark₹24,34,000₹25,74,000
Accomplished Plus₹25,49,000₹26,89,000
Accomplished Plus 6-Seater₹25,59,000₹26,99,000
Accomplished Plus Dark₹25,84,000₹27,24,000
Accomplished Plus 6-Seater Dark₹25,94,000₹27,34,000

वाचा – Top Mileage CNG Cars : स्वस्तात खरेदी करा या ५ बेस्ट मायलेज सीएनजी कार्स, वाचा किंमत

नवीन सफारी २०२३ चे कलर ऑपशन्स

टाटा सफारी फेसलिफ्ट २०२३ मध्ये टोटल ७ कलर ऑपशन्स दिलेले आहेत. टॉप मॉडेल मध्ये कंपनीने काही प्रीमियम कलर्स राखीव ठेवले असून बेस आणि इतर लो ट्रीम्स मध्ये नियमित कलर शेड्स दिल्या आहेत.

टाटा सफारीच्या फेसलिफ्ट २०२३ च्या कलर्स चा टेबल:

टाटा सफारीच्या फेसलिफ्ट २०२३ ट्रीम्स वाईस कलर्स
कलरस्मार्ट (O)प्युअर (O)ऍडवेंचर लाईनअपअकाम्प्लिशेड लाईनअप
गोल्डXXX
व्हाईट
डार्क ग्रेXX
ब्लूXX
कॉपर ब्राउनXXX
लाईट ग्रेXX
डार्क ब्लॅकXX✔फक्त डार्क एडिशन करीत राखीव

 

२०२३ टाटा सफारी इंजिन स्पेसिफिकेशन्स

टाटा सफारी मध्ये स्टेलांटीस कंपनीचे २.० लिटर, ४ सिलेंडर टर्बो चार्ज डिझेल इंजिन दिले जाते, यामध्ये पेट्रोल इंजिनचा ऑपशन सध्या तरी उपलब्ध नाही.

२०२३ टाटा सफारी इंजिन पॉवरट्रेन
इंजिनटर्बो डिझेल
क्षमता२.० लिटर
सिलेंडर्स
Power170PS @ 3750rpm
टॉर्क३५० एनएम @ १७५० – २५०० आरपीएम
मॅन्युअल गेअर्स६-स्पीड
ऑटोमॅटिक गेअर्स६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर

संपूर्ण ब्रोशर डाउनलोड करा – लिंक

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment