Top 5 Most Awaited Upcoming Cars: महिंद्रा थार ते फोर्स गुरखा या गाड्या पुढच्या काही महीन्यात राडा घालणार

भारतात सध्या कार निर्मात्या कंपन्या प्रॉडक्ट फेसलिफ्ट करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच टाटा मोटर्स सफारी, हॅरीयर चे फेसलिफ्ट आले आहे आणि हातात ग्राहक इतर फेमस कार्स च्या फेसलिफ्ट ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोणत्या त्या ५ टॉप अपकमिंग कार्स आहेत ज्यांच्या लाँचची माहिती लोक रोज इंटरनेटवर सर्च करत असतात.

नेक्स्ट-जेन मारुति सुझुकी स्विफ्ट

3 23.jpg

मारुती सुझुकी इंडिया लवकरच ADAS म्हणजे ऍडव्हान्स ड्रायव्हर अस्सिस्टन्ट सिस्टिम लेव्हल २ चे फीचर्स स्विफ्ट मध्ये अपडेट करून येत्या काही महिन्यात भारतात विक्री साठी उपलब्ध करणार आहे. आगामी नवीन सुझुकी स्विफ्टच्या इंजिन पॉवर आणि मायलेजबद्दल मीडिया रिपोर्ट्सनुसार अशी माहिती समोर आली आहे किया, यात सध्याचेच 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल, जे स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या नेक्स्ट जनरेशन हॅचबॅकचे मायलेज 35-40 kmpl पर्यंत असू शकते असे सांगितले जात आहे. असे म्हटले जात आहे की भारतात हे सध्याच्या K-सीरीज इंजिनसह दुसरा पर्याय म्हणून स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन पर्याय सादर केले जाईल.

अपकमिंग महिंद्रा थार ५ डोर्स एडिशन

thar exterior right front three quarter 35

बहुचर्चित आणि बहू प्रतिक्षीत महिंद्रा कंपनीची इम्प्रेसिव्ह एसयूव्ही थार च्या ५ डोर वर्जनचे लोक खूप आतुरतेने वाट बघत आहेत. सध्या मार्केट मध्ये थार ३ दरवाज्यांसह उपलब्ध आहे परंतु 5 डोर एडिशन साठी लोकांची उत्कंठा वाढलेली दिसते. मिळालेल्या माहिती नुसार नुकतीच थार रस्त्यावर टेस्टिंग करताना कॅमेरात कैद झाली होती ज्यामुळे ५ दरवाज्याची महिंद्रा थार एसयूव्ही येणार हे कन्फर्म झाले आहे. महिंद्रा हि एसयूव्ही भारतात ऑगस्ट २०२४ पर्यंत मार्केट मध्ये हि गाडी लाँच करेल अशी अपेक्षा आहे.

अपकमिंग फोर्स गुरखा ५ डोर्स एडिशन

gurkha water wading

महिंद्रा थार आणि मारुति सुझुकी जिमनी या वाहनांना टक्कर देण्यासाठी फोर्स लवकरच गुरखा 5-डोर एडिशन भारतात लाँच करू शकते. गुरखा 5-डोर एडिशन बरेच दिवसांपासून डेव्हलपमेंट स्टेज मध्ये असून २०२४ पर्यंत हि गाडी रस्त्यांवर दिसू शकते.

अपकमिंग टाटा कर्व

concept one outer sidelook

टाटा कर्व भारतामध्ये सर्वात जास्त प्रतीक्षित एसयूवी येत्या काही दिवसांत लाँच होत आहे. हि गाडी सरळ टक्कर देणार आहे हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुति सुजुकी ग्रैंड विटारा या लोकप्रिय वाहनांना. टाटा कर्व मध्ये जवळजवळ 125 बीएचपी  पावर आणि 1.5-लीटर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे मॉडेल को इलेक्ट्रिक झीप्ट्रोन तंत्रज्ञानासह देखील लॉन्च केले जाण्याची आशा आहे. एका चार्ज मध्ये हि गाडी ४५० किमी ची रेंज देईल.

अपकमिंग ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

creta exterior right front three quarter 16

ह्युंदाई इंडिया आपली क्रेटा एसयूव्ही चे फेसलिफ्ट आगामी महिन्यात लाँच करण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण क्रेटा फेसलिफ्टचे मॉडेल टेस्टिंग मोड मध्ये रस्त्यांवर धावताना पहिले. सध्या क्रेटा ला मिळत असलेले यश आणि लोकप्रियता यामुळे कंपनी नवीन मॉडेल लवकरात लवकर लाँच करेल. या अपकमिंग क्रेटा मध्ये ADAS, 360 degree camera, ६ ऐरबॅग्स असे काही फीचर्स मिळतील.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment