New Tata Altroz Racer: टाटा मोटर्स करणार धमाका, Hyundai i20 N line चा द एन्ड?

Ajinkya Sidwadkar

टाटा अल्ट्रोज एक प्रीमियम-५ स्टार सेफ हॅचबॅक जानेवारी २०२३ मध्ये आयोजीत केलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये रेसर अवतारात शोकेस करण्यात आली होती, त्यावेळीस प्रत्येक ऑटो प्रेमींना हि गाडी मार्च २०२३ मध्ये लाँच केली जाईल असे वाटत होणे मात्र तसे न झाल्याने “Tata Altroz Racer” व्हेरिएंटचा कंपनीने गाशा गुंडाळला असे वाटत होते पण एका न्यूज पोर्टल ने आपल्या कॅमेरात नुकतेच अल्ट्रोज रेसर व्हेरिएंट ला टेस्टिंग फेज मध्ये कैद केले आहे त्यामुळे ह्युंदाई एन लाईन ला टक्कर देण्यासाठी टाटा सज्ज आहे हे स्पस्ट झाले आहे.

image 5
Tata Altroz Racer

अल्ट्रोज रेसर स्पेसिफिकेशन्स

Altroz Racer चे अनावरण होऊन अनेक महिने उलटले आहेत त्यामुळे आता रेसर मॉडेल लाँच होताना काही नवीन फीचर्स ऍड होऊ शकतात. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे Altroz Racer 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन ने सुसज्ज असेल. हे मशीन १२० पीएस पॉवर आणि १७० एनएम पीक टॉर्क निर्माण करेल. सध्या अल्ट्रोज जे स्टॅंडर्ड नॉर्मल मॉडेल आहे ते १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन ने रिलोडेड आहे परंतु रेसर मधील इंजिन स्टॅंडर्ड पेक्षा १० पीएस पॉवर आणि ३० एनएम टॉर्क जास्त निर्माण करते. रेसर चे इंजिन अधिक ट्यून्ड आणि पॉवरफुल असेल, अवघ्या १० सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठण्यास Altroz Racer सक्षम असेल.

image 4
Tata Altroz Racer

वाचा – टाटा सफारी फेसलिफ्ट संपूर्ण किंमत लिस्ट उघड – ट्रीम्स, कलर्स आणि स्पेक्स

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Altroz Racer ला एक्सटेरिअर आणि इंटेरिअर भागात विशेष कॉस्मेटिक अपग्रेड मिळणार आहेत. नवीन फीचर्सच्या यादीमध्ये व्हेंटिलेटेड लेदर सीट, वायरलेस चार्जर, व्हॉइस असिस्टसह इलेक्ट्रिक सनरूफ, एअर प्युरिफायर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि रिअर एसी व्हेंट्सचा समावेश आहे.

Tata Altroz Racer लाँच डेट

टाटा मोटर्सद्वारे कडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी, Altroz Racer २०२३ वर्षाच्या शेवटी किंवा 2024 च्या सुरुवातीस पदार्पण करू शकते असे संकेत आहेत. रेसर वारिएंट प्रामुख्याने Hyundai i20 N लाइनच्या कॉम्पिटिशनला उभे राहील.

वाचा – Top 5 Most Awaited Upcoming Cars: महिंद्रा थार ते फोर्स गुरखा या गाड्या पुढच्या काही महीन्यात राडा घालणार

वाचा – टाटा मोटर्स ऑटो सेल सप्टेंबर जाहीर, तब्ब्ल 82,023 वाहन विकली तरीही ५% ने घसरला

किंमत

अल्ट्रोज रेसर या आगामी हॅचबॅक मध्ये अनेक नवीन जनरेशनचे फीचर्स आणि प्रीमियम सेगमेंट मधील गाडी असल्याने सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत १ ते २ लाख रुपये जास्त असू शकते असे अंदाज आहेत. सध्याचे मॉडेल 6.60 लाख ते 10.74 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. टर्बो पेट्रोलची रेंज 9.10 लाख रुपयांपासून सुरू होते.

Source

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment