Maruti jimny thunder edition: विकत घ्या “दोन लाखांनी” स्वस्त मारुति जिम्नी, जाणून घ्या नवी किंमत आणि शेवटची तारीख

देशातील अग्रगण्य ऑटो मेकर आणि विक्रेती कंपनी मारुति सुझुकीने १ डिसेंबर २०२३ रोजी नवीन जिमनी थंडर एडिशन लाँच केले असून स्टॅंडर्ड मॉडेल पेक्षा नुकतेच लाँच केलेलं हे व्हेरिएंट तब्बल दोन लाख रुपयांनी स्वस्त आहे.

  • २ लाखांनी स्वस्त झाल्यावर एक्स-शोरूम किंमत १०.७५ लाखांपासून पुढे
  • ऑफर फक्त लिमिटेड काळासाठी उपलब्ध

Maruti Suzuki Jimny Thunder Edition: मारुति सुझुकी इंडियाने जिमनी थंडर एडिशनला नुकतेच भारतीय बाजारपेठेत लाँच केले असून हे एडिशन गाडीच्या सर्व चार व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध असणार आहे. जिमनी प्रेमींसाठी हे एडिशन फक्त ३१ दिवसांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार असून १ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. या ३१ दिवसात ग्राहक गाडीचे थंडर एडिशन बुक करून दोन लाख सेव्ह करू शकतात.

Maruti Jimny Thunder Edition: काय आहे खास?

मारुति जिमनी थंडर एडिशन मध्ये नवीन ब्लॅक एक्सटेरिअर कलर असेल, गाडीचे अलॉय व्हील्स १७ इंचाचे संपूर्ण ब्लॅक कलरचे दिलेले असतील, या व्यतिरिक्त ब्लॅक रूफ, ब्लॅक ORVM’s आणि फ्रंट ब्लॅक ग्रील, स्किड प्लेट, साइड डोअर क्लेडिंग, डोअर व्हिझर आणि ओआरव्हीएम, हुड आणि साइड फेंडर्सवर गार्निश अशी थीम असेल. गाडीचे थंडर एडिशन हे खूप स्टयलिस्ट आणि आकर्षक असून संपूर्ण छोटे छोटे एलेमेंट्स देखील काळ्या रंगात दिले असल्याने गाडीची रोड वर वेगळी छाप पडेल.

image

मारुती सुझुकी जिमनी – इंजिन पर्याय

थंडर एडिशन मध्ये गाडीच्या इंजिन स्पेसिफिकेशन्स किंवा ट्रान्समिशन मध्ये कोणतेही बदल किंवा अपग्रेडस केलेले नाहीत. पूर्वीप्रमाणेच या एडिशन मध्ये 1.5-लीटर, 4-सिलेंडर K15B माइल्ड-हाइब्रिड पेट्रोल इंजन दिले जाईल 105 hp पावर आणि 134 Nm टॉर्क उत्पन्न करेल. ट्रान्स्मिशनमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड टॉर्क कॉव्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय या इंजिनसह उपलब्ध असतील.

कोणते व्हेरिएंट किती स्वस्त?

वर्ष संपणार असून वर्षअखेर ग्राहकांना मारुति सुजुकी थंडर एडिशन जुन्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत दोन लाखांपर्यंत स्वस्त मिळणार आहे. जिमनी चे जेटा मैनुअल वेंरिएंट, जेटा ऑटोमैटिक, दोन लाखांनी स्वस्त झाले आहे. अल्फा ऑटोमैटिक ड्युअल टोन, अल्फा मैनुअल आणि अल्फा ऑटोमैटिक एक लाख तर अल्फा मैनुअल ड्युअल टोन एक लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे.

वाचा – Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

Maruti Jimny Thunder Edition Price List in Maharashtra

Jimny Thunder Edition च्या व्हेरिएंट प्रमाणे, महाराष्ट्रातील एक्स-शोरूम किमती:

व्हेरिएंटएक्स-शोरूम किंमत
Zeta MT₹10.74 लाख
Zeta AT₹11.94 लाख
Alpha MT₹12.69 लाख
Alpha MT dual-tone₹12.85 लाख
Alpha AT₹13.89 लाख
Alpha AT dual-tone₹14.05 लाख
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment