Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

Maruti Suzuki cars: मारुती सुझुकी च्या गाड्यांच्या किंमती वाढणार: महागाई वाढतेय हे काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये, मग त्यात घर असो, सोनं असो, राशनपाणी असो किंवा वाहन असो, आणि अश्याच महागाईच्या युगात मारुती सुझुकी सुद्धा मागे राहिलेली नाहीये, आता मारुती सुझुकी कारच्या किमती वाढवणार आहे. तरीही लोक स्वतःच्या हौशेला मोल ठेवत नाही, EV च्या जमान्यात मारुती सुझुकीच्या गाड्या सुद्धा लोक आवडीने घेतात, चालवतात. पण आता हि बातमी वाचून तुमच्या डोक्यातसुद्धा विचार घोळतायेत का? कि मारुती सुझुकी च्या गाड्या आता का महागणार आहेत? कधीपासून गाडीच्या किमती वाढतील? शिवाय मारुतीच्या टॉप 5 मायलेज कार आणि ह्या गाड्यांचे साधारण किती किंमतीने गाड्यांचे दर वाढतील? तर अजिबात काळजी करू नका, या लेखात तुम्हाला मारुती सुझुकीबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे. Maruti Suzuki cars to become expensive from Jan 2024

का झाली मारुती सुझुकी च्या गाड्यांची दरवाढीची घोषणा?

गेल्या सोमवारी, मारुती सुझुकीच्या वाहन निर्मात्याने कडून माहिती बाहेर पडली आहे कि, मारुती सुझुकी च्या किमती वाढवणार आहेत. आणि ह्या महागाईच कारण वाढता दबाव आहे. यामध्ये शेअर मार्केटसुद्धा जबाबदार ठरले आहे.गेल्या शुक्रवारी मारुती सुझुकी चे शेअर्स 0.072% घसरून ₹10,481 वर ठेपल आहे. वर्षाअखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरवातीस वाढणाऱ्या महागाईचे संकेत  दिसायला लागले आहेत. म्हणूनच मारुती सुझुकी कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी आणि या वाढीची भरपाई जास्तीत जास्त होण्यासाठी, थोडक्यात परिस्तिथी सुधारण्यासाठी गाड्यांच्या बाजारात वाढ आणावी लागनार आहे. याचाच अर्थ जानेवारी 2024 पासून मारुती सुझुकीच्या गाड्या महाग होणार हे नक्की…!

मारुती सुझुकीच्या टॉप 5 मायलेज कार- Maruti Suzuki top cars

Maruti Suzuki top cars
Maruti Suzuki top cars

पण तरीही लोक मारुती सुझुकीच्या गाड्या घेणं पसंद करतात कारण; चांगलं मायलेज , CNG कार आणि किंमत. लोक मारुती सुझुकीच्या 5 गाड्या घ्यायला अधिक पसंद दर्शवतात, त्या आहेत; मारुती WagonR, Maruti Dezire, Maruti Baleno, Maruti Swift आणि Maruti Celerio आणि ह्यांच्या किंमतीचा बोलायचं झालं तर साधारण यातील मॉडेल ची किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू होते ते 9.18 लाख रुपये पर्यंत संपते, सोबत काही ठराविक मॉडेल्स, ऍक्सेसरीस नुसार या गाडीच्या किमतीत चढउतार होत असतो. या गाड्यांमध्ये तुम्हाला CNG व्हेरियंट सुद्धा मिळते.

असेही लोक विचारतात

तुम्हाला हेसुद्धा वाचायला आवडेल:

EV charging stations in Delhi: नवी दिल्लीतील ‘Fastest’ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशनची यादी

Kia Carens Update: मारुती आर्टिगला टक्कर देणाऱ्या किआ कॅरेन्स बद्दल बॅड न्यूज

Tata Nexon VS Suzuki Brezza 2023 – संपूर्ण कंपॅरिजन | कोणती घ्यावी? वाचा माहिती

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment