भारतात सर्वात जास्त चार चाकी वाहन विकणारी आणि नंबर १ पोजिशन वर विराजमान असलेली मारुती सुझुकी त्यांचे टॉप सेलिंग प्रॉडक्ट वॅगन आर लवकरच भारतीय बाजारपेठेत इलेकट्रीक व्हर्जन मध्ये लाँच करणार आहे. मारुती सुझुकीच्या आगामी इलेकट्रीक वाहनांच्या यादीत प्रामुख्याने eWX आणि EVX यांचा समावेश आहे. eWX हि वॅगनआर इलेकट्रीक म्हणून भारतात लाँच केली जाणार आहे तर दुसरीकडे EVX ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आहे जी पुढील वर्षी जागतिक बाजारपेठेत लाँच होईल अशी अपेक्षा आहे. मारुती सुझुकी EVX एसयूव्ही आगामी Creta EV, Seltos EV आणि Tata Curvv सारख्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करेल.
२०२० मध्ये टाटा मोटर्सला आवाहन देण्यासाठी मारुती सुझुकी वॅगन आर च्या इलेकट्रीक वर्जनवर काम करत होती मात्र त्या काळी आलेली कोरोना महामारी, तांत्रिक आणि व्यवहार्यता समस्यांमुळे तो प्लॅन कंपनीला रद्द करावा लागला. भारतात सध्या वाढते इलेकट्रीक वाहनाचे मार्केट आणि सरकारची मिळणारी सवलत पाहता मारुती सुद्धा आपली पहिली ईव्ही विक्री करीता उपलब्ध करणार असून भारतातूनच इलेकट्रीक वाहन निर्यात करणार आहे.
कशी आहे “वॅगनआर इव्ही”?
eWX इलेक्ट्रिक हि जरी वॅगन आर म्हणून ओळखली जाणार असली तरी ती एक मिनी वॅगन म्हणून आकार घेणार आहे. या इव्ही चे प्रोटोटाईप सुरु असलेल्या जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये प्रदर्शित केलेगेले आहे. सुझुकी eWX प्रामुख्याने 3,395 मिमी लांब, 1,475 मिमी रुंद आणि 1,620 मिमी उंच असेल. पूर्ण चार्ज केल्यावर, सुझुकी eWX ची रेंज 230 किमी असेल. इतर तांत्रिक तपशील येत्या काही दिवसांत उघड होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या WagonR प्रमाणेच, सुझुकी eWX मध्ये बॉक्सी स्टान्स आहे. तथापि, eWX आकाराने छोटी आणि खूप क्युट आहे. या आगामी वॅगन आर च्या इमेजेस खाली दिलेल्या आहेत.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप

दाखवलेल्या इमेज नुसार इलेकट्रीक वॅगन आर अतिशय प्रगत आणि फ़ुटूरिस्टीक दिसते. हेडलॅम्प बंपरवर जोडल्या आहेत आणि त्यावर पिवळे इन्सर्ट दिलेले आहेत. डीआरएल्स अतिशय मोहक आहेत.गाडीची चाक हि नवीन जनरेशनला शोभणारी दिली आहेत.

पाठीमागची बाजू देखील अतिशय अट्रॅक्टीव्ह आणि सिम्पल आहे. साईडला दिलेला मोठा ग्लास एरिया केबिन खुले खुले ठेवण्यास मदत करेल. फोटो मध्ये स्पष्ट दिसते आहे कि, ORVM,अलॉय व्हील आणि मागील बंपरवरील हायलाइट्स शोभून दिसतात.

केबिन मध्ये कॉम्पॅक्ट टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि वाइडस्क्रीन डिस्प्ले मिळतो. आतील दरवाजाचे हँडल आणि सीटवर निऑन हायलाइट्स, पॉवर विंडोसाठी बटणांसह फ्लोटिंग सेंटर कन्सोल, रोटरी डायल दिलेले असेल. २३० किमी रेंज या गाडीला मिळेल अशी सध्या माहिती उघड झालेलं आहे पण नक्की टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे थोड्या दिवसात उघड होणार आहे.
वाचा – Top Mileage CNG Cars : स्वस्तात खरेदी करा या ५ बेस्ट मायलेज सीएनजी कार्स, वाचा किंमत