नव्या ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टचे वेटींग पिरियड जाणून घ्या किती असणार?

Hyundai Creta 2024 Facelift Waiting Period: ह्युंदाई क्रेटा 2024 फेसलिफ्ट लवकरच लाँच 16 जानेवारी होणार असून या creta फीचर्स आणि डिजाइन बद्दल आम्ही आधीच लेख लिहिला आहे.

2024 Hyundai Creta dealers

Hyundai Creta 2024 या आगामी लाँच बद्दल अनेकजण खूप उत्सुक आहेत. कंपनीने या गाडी बुकिंग्ज सुरू केली असून ग्राहक 25 हजार रुपयांच्या टोकन रकमेने ऑनलाईन अथवा शोरुम वर जाऊन बुक करू शकतात. Creta facelift 2024 या गाडीच्या लाँच आधी वेटींग पिरियड ची माहिती समोर आली असून महाराष्ट्रात ग्राहकांना डिलिवरी साठी किती वाट पाहावी लागणार हे जाणून घेऊ.

वाचा – लाँच पूर्वीच “ह्युंदाई क्रेटा २०२४ फेसलिफ्ट” चा विडिओ वायरल

मिळालेल्या माहितीनुसार 2024 creta पेट्रोल वेरीएंट्स वर 10 ते 12 आठवड्यांचा वेटींग पिरियड आहे. डिझेल वेरीएंट्स करिता 16 ते 18 आठवड्यांचा वेटींग पिरियड आहे. हा वेटींग पिरियड रंग, मॉडेल, इंजिन पर्याय, ट्रान्समिशन पर्याय आणि इतर ग्राहकांच्या अवडी नुसार कामी जास्त असू शकतो. तुम्हाला पिन-पॉइंट वेटींग पिरियड जाणून घ्यायचं असल्यास कृपया जवळच्या डीलरशी संपर्क साधा.

वेरीएंट्स – 

नव्या जनरेशनच्या creta मध्ये टोटल 7 ट्रिम असणार आहेत ज्यामध्ये E या बेस मॉडेल पासून सुरू होईल त्यापुढे EX, S, S (O), SX, SX टेक आणि टॉप ऑफ द लाईन SX (O) असेल. गाडीमध्ये 2 इंधन पर्याय तर 3 इंजिन पर्याय दिले गेले आहेत. Creta 2024 मध्ये 1.5-लीटर नैचुरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल या 1.5-लीटर डिझेल इंजन दिले जाणार आहे. ट्रान्समिशन मध्ये 6 स्पीड manual आणि 7 स्पीड डीसीटी तसेच सीवीटी गेअर बॉक्स दिला जाणार आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment