‘नवीन पोर्शे मॅकन EV’ प्रोटोटाइप फर्स्ट लूक, जाणून घा वैशिष्ट्ये, इंटीरियर आणि किंमत

Aishwarya Potdar

Updated on:

Porsche Macan EV prototype: ग्राहकांसाठी नव्याने ओळखीस आलेला ‘पोर्श’ ह्या ब्रँड ने कॉम्पॅक्ट मॅकन एसयूव्हीला ‘परफॉर्मन्स-ओरिएंटेड ईव्ही’ बनवली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या जगामध्ये ‘पोर्श मॅकन’ हा ब्रॅंड भारतासाठी नवीन आहे. भविष्यामध्ये पोर्श चे मॉडल लोकांमध्ये लोकप्रिय व्हावे अशी आशा बाळगणारे ,पोर्श मॅकन हा एक विक्रेता असून, ‘मॅकन ईव्ही- Macan EV’ हे त्यांचे नवे इलेक्ट्रिक वाहन आहे. ह्या लेखात आपण पोर्श मॅकन EV प्रोटोटाइप फर्स्ट लूक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Untitled design

चला प्रथम स्टाइलिंगबद्दल बोलूया, वरील छायाचित्रात  गाडीची जास्त माहिती जरी दिसत नसली Macan EV मध्ये पुढच्या व्हिल्स मागची व्हिल्स वेगळ्या आकारांची आहेत, या गाडीमध्ये तुम्हाला मागील बाजूस रुंद टायर्स- रुंद व्हिल्स मिळत आहेत. पण तुम्ही जर ह्या गाडीमध्ये निरखून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, गाडीच्या इंटीरियर Cayenne,Taycan आणि आगामी Panamera शी मिळते-जुळते असण्याची शक्यता आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

पोर्श मॅकन ईव्ही स्टाइलिंग

या गाडीमध्ये संपूर्ण स्केटबोर्ड आर्किटेक्चर दिले गेले आहे जे नवीन PPE प्लॅटफॉर्म आहे, पोर्श आणि ऑडी ने डेव्हलप झाला आहे. 100 kWh बॅटरी ही गाडीच्या बेसप्लॅटफॉर्म मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या गाडीमध्ये दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक मोटर पुढच्या बाजूस आणि दुसरी मागच्या बाजूस देण्यात आली आहे.

मॅकन ईव्ही: तीन डिस्प्ले युनिट्स

या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या बाजूस 12.6-इंचचा डिस्प्ले , मध्यभागी इन्फोटेनमेंट HD डिस्प्ले ज्याची स्क्रीन 10.9-इंच आणि तिसरी पर्यायी स्क्रीन ही समोरच्या ड्राइवर ला  मदत करते. या गाडीच्या इन्फोटेनमेंट स्क्रीन सिस्टममध्ये या ऍपल, अँड्रॉइड आणि ऑटोकार्प्लेचे फिचर्स दिले जाणार आहेत.

मॅकन ईव्ही: इंजिन आणि इंटीरियर

गाडीमध्ये नवीन क्रांतीचा भाग म्हणजे damper. गाडीमध्ये चांगला कंट्रोल निर्माण होण्यासाठी दोन वॉल्व damper दिले आहेत. जे कॉम्प्रेशन आणि रिबाउंड साठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. इतर स्पोर्ट्स कारप्रमाणेच या गाडीमध्ये 20 ते 22 इंच व्हिल्स देण्यात आली आहेत, ज्याची ग्रिप उत्तम आहे. गाडीमध्ये विशेष आहे ते म्हणजे गाडीची बॅटरी, ज्याच संपूर्ण वजन गाडीच्या रिअर एक्सेल म्हणजेच मागील बाजूस जास्त कन्व्हर्ट केले आहे.

गाडीच्या अधिक वैशिष्ठ्यांची माहिती देत या Macan मध्ये एक कम्फर्ट केबिन सोबत मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग सिस्टम, लेदर-रॅप्ड मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, AR HUD, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यासोबत इतर वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.

मॅकन ईव्ही: चार्जिंग

गाडीच्या चार्जिंग बाबतीत सांगायचं झाल तर गाडीमध्ये, ऑडी इट्रोनप्रमाणे या गाडीत दोन चार्जिंग पॉईंटस देण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक DC आणि AC चार्जिंग असेल आणि दुसरे केवळ AC चार्जिंग असणार आहे.

पोर्श मॅकन ईव्ही: किंमत

पोर्शे मॅकन बेस मॉडल ची किंमत साधारण 88.06 लाख ते याचेच टॉप मॉडल 1.53 करोड या किंमतीमध्ये विकले जाते.

हेपण वाचा:

ट्राफिक नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलन दंड फास्ट टॅग अकाउंट मधून कट होणार, वाचा काय आहे नवा नियम?

Top EV: भारतात २०२४ मध्ये येणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक कार्स

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मी कोल्हापुरी मुलगी असून नागपूर येथून हॉटेल मॅनेजमेंट डिग्री पूर्ण केली आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याबद्दल लिहायला आवडते.

Leave a Comment