भारतात मारुती एर्टिगा हायब्रीड कधी येणार? हायवे कारला मिळतेय ईव्हीपेक्षा परवडेल असे मायलेज

Published:

Suzuki Ertiga Cruise Hybrid: इंडोनेशिया मध्ये चालू असणाऱ्या IIMS 2024 (इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो) मध्ये भारतामधील सर्वात लोकप्रिय आणि मोस्ट सेलिंग MPV 7 सीटर हायवे कार एर्टिगाला सादर करण्यात आले. हे मॉडेल नवीन प्रकार स्पोर्टियर डिझाइनने बनलेले असून,  या 7 सीटर कारची किंमत 20 लाखाच्या आत असणार आहे, शिवाय या  MPV मधल्या इंजिनला अपडेट करण्यात आले आहे.  चला जाणून घेऊया मोठ्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या मारुती सुझुकीच्या स्टाइलिश एर्टिगा क्रूझ हायब्रिड संबंधित संपूर्ण माहिती.

एर्टिगा क्रूझ हायब्रिड अपडेट डिझाइन

रेग्युलर एर्टिगा हायब्रीड जीएक्स ब्रेव्ह खाकी, सिल्की सिल्व्हर, बरगंडी रेड, मेलो डीप रेड, कूल ब्लॅक, पर्ल स्नो व्हाइट आणि मेटॅलिक मॅग्मा ग्रे या रंगामध्ये उपलब्ध आहे तर एर्टिगा क्रूझ हायब्रिड कारला पर्ल व्हाइट + कूल ब्लॅक या ड्युअल टोनचा रंग पर्याय मिळतो.

8-इंच टच स्क्रीन, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इन्फोटेनमेंट डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्पोर्टियर डिझाइन मिळालेली एर्टिगा क्रूझमध्ये स्पोर्टी फ्रंट आणि रियर बंपर, स्मॉल अँटेना, अंडर स्पॉयलर, साइड बॉडी डेकल, रिअर अप्पर स्पॉयलर ,रेक्लिनर सीट्स आणि नवीन एर्टिगामध्ये खास एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) LED DRL उपस्थित आहेत.

वाचा: यामाहा मोटरने ‘देशी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअपला’ दिला, 335 कोटी रुपयांचा निधी

एर्टिगा क्रूझ हायब्रिड पॉवरट्रेन अपडेट

Ertiga Cruise Hybrid मध्ये  K15B स्मार्ट हायब्रिड पॉवरट्रेन इंजिन आणि 10 Ah लिथियम-आयन बॅटरी दिली गेली आहे. ज्यामुळे 103bhp आणि 138Nm टॉर्क जनरेट होतो. रेग्युलर Ertiga Hybrid GX पेक्षा Hybrid Ertiga मध्ये बॅटरी कॅपॅसिटी वाढवून या नव्या गाडीला अपग्रेड करण्यात आला आहे.  या कारमधील बॅटरीला 8 वर्षांची वॉरंटी मिळते. एर्टिगा क्रूझ हायब्रिड द्वारे एका लिटरमध्ये 20km पेक्षा जास्त मायलेज मिळते.

वाचा: हिरोची सर्वात ‘प्रीमियम बाईक’ झाली लॉन्च,जाणून घ्या मॅवरिक 440 ऑफर, फिचर्स आणि बुकिंग

एर्टिगा क्रूझ हायब्रिड किंमत

मारुती एर्टिगाची भारतातील किंमत 8.49 लाख आणि रु. 13.08 लाख रु. च्या दरम्यान आहे.  इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शोमध्ये एर्टिगा क्रूझ IDR 288 मिलियन मध्ये लॉन्च झाली आहे, मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत इंडियन करन्सीमध्ये Rs. 15.3 लाख, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सची किंमत Rs. 16 आहे.

भारतामधल्या सेडानच्या विक्रीत घट झाल्याने, मारुती सुझुकी आता मोठ्या बॅटरी एर्टिगा क्रूझ हायब्रिड भारतामध्ये लॉन्च करणे लांबणीवर पडणार आहे.

वाचा: ओला S1 प्रो वर मिळतोय 25 हजार डिस्काऊंट, ऑफरचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

2024 सुझुकी एर्टिगा क्रूझ हायब्रिड: टॉप फिचर्स

  • टू-टोन कलर ऑप्शन्स
  • अपग्रेड केलेले K15B स्मार्ट हायब्रिड इंजिन
  • नवीन एक्सटीरियर डिझाइन एलिमेंट्स
  • LED डेटाइम रनिंग लाइट्स
  • मोठी बॅटरीची उपलब्धता

मारुती जिम्नीसुद्धा इंडिनेशियामध्ये झळकली

याआधी सुझुकीची IIMS मध्ये सुझुकी जिम्नी सादर करण्यात आली होती, जिच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत भारताच्या तुलनेत तब्बल 7 लाख रुपयांनी जास्त आहे, शिवाय इंडोनेशियन मारुति जिम्नी कारमध्ये पुश-स्टार्ट बटनची सुद्धा कमतरता आहे, अश्यात सुझुकी एर्टिगा क्रूझ हायब्रिड सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसली.

NEW Maruti Suzuki Ertiga 2024 New Model   Ertiga New Model 2024 Update Price, Specifications

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version