यामाहा मोटरने ‘देशी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअपला’ दिला, 335 कोटी रुपयांचा निधी

Aishwarya Potdar

River Mobility: यामाहा मोटर कंपनीने बेंगळुरू-आधारित, इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप ‘रिव्हर मोबिलिटी’ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, रिवर मोबिलिटी इलेक्ट्रिक स्कुटरला कंपनीला, यामाहा मोटर कंपनीच्या नेतृत्वाखालील सीरीज बीफंडिंग मध्ये 335 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ‘स्कूटर्सची SUV’  म्हणून ओळखली जाणारी रिव्हरच्या इंडी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअप साठी आता यामाहा फंडिंग करत आहे.

संपूर्ण भारतात e-scooter चा प्रसार आणि वापर झपाट्याने होत असताना, बेंगलुरु मधील स्थायिक इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप – रिव्हर मोबिलिटी हि कंपनी, ‘मल्टि-यूटिलिटी इलेक्ट्रिक स्कुटर’ बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे; म्हणूनच यामाहा इंडियाने या अत्याधुनिक ,नाविन्यपूर्ण आणि जबरदस्त फीचरने पुरेपूर असणाऱ्या कंपनीसाठी 40 दशलक्ष डॉलर्स इतका निधी दिला आहे. हा संपूर्ण निधीचा वापर देशभरात वितरण आणि सेवा नेटवर्कचा विस्तार उत्पादनाचे संशोधन आणि नवीन उत्पादन तयार करण्यासाठी होणार आहे.

देशी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअप- रिव्हर मोबिलिटी

रिव्हर मोबिलिटीबद्दल अधिक माहिती सांगताना, रिव्हर इंडी स्कुटरचे इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रात फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्चिंग आणि ऑगस्ट 2023 मध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (इंडी ई-स्कूटर) तयार केली, हि इलेक्ट्रिक स्कुटर इंडी संपूर्ण made -in -india आहे कारण या स्कुटरचे संशोधन आणि डिझाइन हा बेंगळुरू मध्ये झाले असून ह्या स्कुटरला  बेंगळुरूच्या बाहेरील भागात उत्पादित करण्यात गेलं आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

रिव्हर मोबिलिटी या कंपनीने इंडी इलेक्ट्रिक स्कूटर बेंगळुरू मध्येच डिझाइन आणि विकसित केली आहे. या इंडी ई-स्कूटर ‘स्कूटरची एसयूव्ही’ असं नाव दिल आहे, या नावामागचं कारण; ही मल्टी-युटिलिटी इलेक्ट्रिक स्कूटर असून कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर सहज आणि आरामदायी राईडचा अनुभव देते. या इलेक्ट्रिक स्कुटरची विक्री ऑक्टोबरपासून सुरू झाली होती.

वाचा: ‘सुजुकीची इलेक्ट्रिक स्कूटर’ पेट्रोल इंजिनवर भारी पडणारी आणि 100 किमीपेक्षा जास्त range देणारी सुझुकी स्कूटर

रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कुटर

रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत रु 1,38,000 असून यात 4 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला गेला आहे, ज्यामुळे एका चार्जमध्ये हि स्कूटरला 120 किमीची लॉन्ग रेंज देते. या स्कुटरचा टॉप स्पीड 90 किमी/तास इतका आहे.

इंडी इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 6.7 kW ची मिड-ड्राइव्ह PMSM इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे,जी 8.9bhp पॉवर आणि 26NM टॉर्क तयार करते. 55 लीटर स्टोरेज स्पेस या स्कुटरमध्ये मिळत असून, जर तुम्ही हि स्कुटर स्टँडर्ड चार्जरने चार्ज केली तर फक्त 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

या स्कुटरमध्ये 3 राइडिंग मोड दिले गेले आहेत: इको, राइड आणि रश याचसोबत 6 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी पोर्ट, मोठे एलईडी हेडलॅम्प, 14 इंच अलॉय व्हील, 240 मिमी फ्रंट आणि 200 मिमी रियर डिस्क ब्रेक या फीचर्सचा समावेश या स्कुटरमध्ये आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

यामाहाने ‘या’ कारणांमुळे केली रिव्हर मोबिलिटीमध्ये गुंतवणूक

रिव्हर मोबिलिटीमध्ये गुंतवणूक देताना, हाजीम जिम आओटा-यामाहा मोटर कंपनी लिमिटेड(न्यू बिजनेस डेव्हलोपमेंट सेंटर, चीफ जनरल मॅनेजर) यांनी सांगितलं;  रिवर कंपनीने इतक्या मध्ये केलेल्या प्रगतीने आणि मिळवलेल्या यशाने आम्ही प्रभावित झालो आहोत. या कंपनीच्या प्रगतीचं कारण स्कुटरची डिझाईन आणि स्कुटरमध्ये दिलं गेलेलं तंत्रज्ञान आहे.

अरविंद मनी (रिवर सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ) गुंतवणुकीबाबतीत माहिती देताना म्हणाले; ‘ही गुंतवणूक 2030 पर्यंत एक अब्ज डॉलरचा जागतिक उपयुक्तता जीवनशैली ब्रँड बनवण्याच्या, आमच्या योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.’

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Aishwarya Potdar

मी कोल्हापुरी मुलगी असून नागपूर येथून हॉटेल मॅनेजमेंट डिग्री पूर्ण केली आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याबद्दल लिहायला आवडते.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version