Tata Motors: टाटा हॅरियर ईव्हीचा इंटरनेटवर धुमाकूळ, क्रेटा EV ला टक्कर द्यायला ‘SUV चा बाप’ बाजारात हजर

Tata Harrier EV: नव्या वर्षात बऱ्याच मोठ-मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कारसोबत आगमनाच्या मार्गावर आहेत; त्यातलीच विश्वासू आणि नामांकित कंपनी म्हणजे Tata Motors. टाटा मोटर्स लवकरच त्याच्या लोकप्रिय हॅरियरची इलेक्ट्रिक आवृत्ती म्हणजेच हॅरियर ईव्ही घेऊन येणार आहे, हो..! अगदी योग्य बातमी वाचत आहेत, लवकरच टाटा, पंच इव्ही नंतर नवीन Tata Harrier EV सोबत मार्केटमध्ये दमदार एंट्री करणार आहे. टाटा हॅरियर ईव्हीच हे ‘ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत आकर्षक आणि मजबूत डिझाइन’ असणारं हे मॉडेल ‘ऑल-इलेक्ट्रिक हॅरियरची आवृत्ती’ म्हणून ओळखले जाईल.

टाटा हॅरियर इव्ही च्या डिझाइन

टाटा पंच EV नंतर एसयूव्हीचा बाप करणार एंट्री 

टाटा पंच इलेक्ट्रिक नंतरची टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेइकल लाइनअपमध्ये मोस्ट अवेटिंग कार म्हणजे Harrier EV आहे. सध्याच्या टाटा हॅरिअर डिझेल व्हर्जनच हॅरिअर इलेक्ट्रिक मॉडेल खरेदी करणं हे बऱ्याच जणांचं स्वप्न होत, जे आता सत्यात उतरत आहे. 5 सीटर आणि 15.5 लाख – ₹25.9 लाख किमतीची, डिझेल सिलेंडर मध्ये उपलब्ध असणारी टाटा हॅरिअर आकर्षक फीचर्स आणि लुकने भरभरून आहे. तरीही टाटाने Tata Harrier EV मॉडेल तयार करत ईव्हीप्रेमींना सुखद धक्का दिला आहे. या टाटा हॅरियर EV चे नुकतेच डिझाइन पेटंट बाहेर पडले आहे.

टाटा हॅरियर इव्हीच्या डिझाइनचा इंटरनेटवर धुमाकूळ

Harrier EV मध्ये नवीन एरो अलॉय व्हील सेट आणि फ्रंट डोअर वर EV’ बॅजिंगची चमक उठून दिसू शकते. ब्लँक-ऑफ ग्रिल आणि ट्वीक केलेला फ्रंट बंपर सोबत, मॉडिफाइड फॅसिआ इलेक्ट्रिक हॅरियर मिळण्याची अपेक्षा मांडली जातेय.

Tata Harrier EV ला मिळणार 500km पर्यंत रेंज आणि जबरदस्त फीचर्स

इलेक्ट्रिक हॅरियर मध्ये 500km पर्यंत रेंज मिळण्याची शक्यता मांडली जातेय, हे अंतर पार करण्यासाठी या इलेक्ट्रिक SUV मध्ये अंदाजे 60 kWh ते 80 kWh पर्यंतचा एक मजबूत बॅटरी पॅक असू शकतो.

दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील, पॅनोरामिक सनरूफ, टच-बेस्ड HVAC कंट्रोल ,ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सूट आणि 360° सराउंड व्ह्यू कॅमेरा, याशिवाय या इलेक्ट्रिक SUV मध्ये आधुनिक फीचर्स जसं ज्वेलेड गियर डायल आणि 10.25-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड आणि पॉवरफुल फ्रंट सीट्स यांचा समावेश आहे.

या टाटा इलेक्ट्रिक हॅरियरचे प्रतिस्पर्धी क्रेटा ईव्ही आणि होंडा एलिव्हेट ईव्ही ठरू शकतात. या एसयूव्हीची किंमत रु. 22.00 – 25.00 लाख अंदाजित किंमत असल्याची शक्यता मांडली जातेय. 2024 च्या नवीन वर्षाच्या येत्या काही महिन्यांत हि एसयूव्ही ईव्ही लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment