दुचाकीच्या किंमतीमध्ये मिळणार टाटा नॅनो, चौरस कुटुंबासाठी बेस्ट ईव्ही,वाचा संपूर्ण माहिती

सध्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बाजारपेठेत टाटाच्या ईव्हीचा बोलबाला आहे, टाटाची प्रत्येक कार सेफ्टी, स्पेस आणि मायलेज अथवा रेंजसाठी बेस्ट आहेत, त्या अनेक लोकप्रिय कार मधली टाटा नॅनो पुन्हा एकदा नव्याने कमबैक करत आहे, तेपण नॅनो इलेक्ट्रीकला घेवून. तुम्हालासुद्धा या टाटा ईव्ही नॅनोबाबतीत माहिती जाणून घेण्याची उस्तुकता असेल, तर खालील लेख संपूर्ण वाचा.

टाटा नॅनो ईव्ही संपूर्ण माहिती

टाटाच्या अनेक लोकप्रिय वाहनांपैकी टाटा नॅनो, हे मॉडल भारतामध्ये खूप वर्षांपूर्वी लाँच झालं होत पण थोड्या कालावधीनंतर ह्या मॉडेलची विक्री काही कारणामुळे बंद करण्यात आली होती. बऱ्याच लोकांना ही कॉम्पैक्ट- छोटूशी कार आवडली तर काहींनी या कारला दिसण्यावरून नापसंद केले. ह्या छोट्या कारमुळे स्पेस अडून राहत नाही, शिवाय छोट्या बोळातूनसुद्धा ही कार अगदी सहजपणे बाहेर पडते, ही खासियत बऱ्यांच जणांच्या उशिरा लक्षात आली, तेव्हापर्यंत टाटा नॅनो बंद झाली होती आणि या कारला मागणी मात्र येतंच होती, आणि हि कॉम्पॅक्ट कारची मागणी लक्षात घेऊन टाटाने बाजारात नॅनो पुन्हा एकदा नव्याने आणायचा निर्णय घेतला, शिवाय हि कार आता ‘इलेक्ट्रिक टाटा नॅनो’ म्हणून ओळखली जाणार आहे.

वाचा: जगातील पहिली सीएनजी बाईक, बजाज पल्सरबद्दल जाणून घ्या सर्व माहिती

टाटा नॅनोचा हटके लुक आणि फीचर्स

ईव्ही नॅनोच्या स्टॅंडर्ड फीचरमध्ये अँपल कनेक्टिविटी,अँड्रॉइड ऑटोप्ले, ७ इंचाची स्क्रीन, ६ स्पिकर्स मिळणार आहेत, शिवाय पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो अँटी ब्रेकिंग लॉकिंग सिस्टीम, इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग, रिमोट लॉकिंग आणि एसी यांचा समावेश असणार आहे. ह्या कारच्या हटके लूकमध्ये मोठ्या अलॉय व्हील्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे हि कार आधीकच स्पोर्टी दिसते.

एका चार्जमध्ये ३१५ किमी धावणार

ह्या कारमध्ये दिली गेलेली बॅटरी हि लिथियम आयन बॅटरी असून, यात दोन बॅटरी पॅक मिळतात. दोन्ही बॅटरी पॅक वेगवेगळी रेंज पुरवतात. १९ kWh बॅटरी पॅक २५० किमी इतकी रेंज देते तर २४ kWh बॅटरी पॅक ३१५ किमी इतकी रेंज देते. याशिवाय या इलेक्ट्रिक कार मध्ये ४० किलोवॅट ची मोटर बसण्यात आली आहे, जिच्यामुळे ० ते १०० किमी प्रति तास इतका या कारला वेग मिळेल. या कारचा टॉप स्पीड ८० किमी इतका आहे. या इलेक्ट्रिक टाटा नॅनोची किंमत ३ लाख असण्याची शक्यता मांडली जातेय. भारतामधली हि कॉम्पॅक्ट टाटा नॅनो कार चौरस कुटुंबाला साजेशी आणि परवडणारी आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment