New Nissan X-Trail spied testing: न्यू निसान एक्स ट्रेल चाचणी करताना झाली स्पॉट,स्पायशॉट्स मधून मिळाली ही जबरदस्त माहिती

वाहनाच्या स्पर्धेच्या यादीत टिकून राहण्यासाठी निसान इंडिया पुरेपुर प्रयत्न करत असताना New Nissan X-Trail suv चाचणी दरम्यान आढळून आली आहे, ही गाडी 2024 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हायलाईट्स पॉइंट्स

  • निसान एक्स-ट्रेल: स्पायशॉट्स-Nissan X-Trail spied testing
  • 2024 मार्च मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा
  • 40 लाख किमतीच्या आतमध्ये विक्री होणारी गाडी

निसान एक्स-ट्रेल: स्पाईशॉटस

thmbnail 1 13

निसान इंडिया स्वतःला अपडेट करत असताना New Nissan X-Trail suv चे स्पायशॉट्स मिळाले आहेत. ज्यामध्ये nissan कॅनवर चाचणी प्लेट्स नजरेस आल्या. मागच्या वर्ष्यात निसान कडून Juke SUV आणि Qashqai ह्या दोन कार प्रदर्शित झाल्या होत्या. याच दरम्यान निसान ने लवकरच भारतामध्ये New Nissan X-Trail प्रदर्शित होणार आहे, अशी बातमी दिली होती. आणि आत्ता तब्बल एका वर्ष्यानंतर New Nissan X-Trail हे, निसान च्या चौथ्या पिढीचे स्पायशॉट्स सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

निसान एक्स-ट्रेल: इंजिन

या गाडीमध्ये ‘माइल्ड हाइब्रिड टेक्नोलॉजी टर्बो पेट्रोल इंजिन’ ज्याची इंधन क्षमता 1.5 लिटर ची आहे. New Nissan X-Trail spyshots वरून इंजिन बाबतीत जास्त काही माहिती मिळाली नसली तरी , ही गाडी ePower petrol electric hybrid आवृत्ती असू शकते, अशी शक्यता मांडण्यात येत आहे. गादींच्या बैठक व्यवस्था बाबतीत सांगायचं झाल तर ही गाडी ,5 आणि 7 seaters ह्या दोन प्रकारातून भारतामध्ये लॉन्च होऊ शकते.

निसान एक्स-ट्रेल: डिसाइन अपडेट्स

गाडीच्या मिळालेल्या हेरचित्रांतून ‘नवीन निसान एक्स-ट्रेल’ च्या चाकाना राखाडी आणि सिल्वर रंग मिळालेला आहे, गाडीला मिळणाऱ्या बाहेरील आवरणाच्या वैशिष्ठामध्ये ‘फ्लेर्ड व्हील आर्च, नवीनतम-जनरल व्ही-मोशन ग्रिल, रॅप-अराउंड टेल लॅम्प’ या गोष्टी आहेत. 10-इंच डिस्प्ले, दोन USB-C चार्जिंग पॉइंट्स,परिचित स्टीयरिंग व्हील आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, या गाडीमध्ये प्रदान केले आहेत.

निसान एक्स-ट्रेल: किंमत आणि प्रतिस्पर्धी

2024 च्या मध्यात लॉन्च होणाऱ्या निसान च्या या गाडीची किंमत 32-36 लाख रुपये इतकी आहे, या गाडीची तुलना Toyota Fortuner ,VW Tiguan, Skoda Kodiaq आणि MG Gloster यांच्याशी होऊ शकते.

हेपण वाचा:

MG Comet EV: एमजी धूमकेतू ईव्ही वर 65,000 रुपयांपर्यंत सवलत

Tata Motors New Launch: कंपनीने सादर केली तब्ब्ल ५ वाहन, यातील Intra V70 आहे एकदम खास

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment