टॉप 5 सनरूफ असणाऱ्या SUV ज्यांची किंमत 10 लाखाच्या आतमध्ये आहे, ही वाचा लिस्ट

Aishwarya Potdar

आजकाल कारला सनरूफ असले की, ती लक्जरी कार म्हणूनच ओळखली जाते. पण सनरूफ कारला सुरक्षितता असणे तितकेच महत्त्वाचे आहे, आणि ‘सेफ्टी विद सनरूफ कार’ विकत घ्यायची म्हंटली तर तितका पैसापण भरावा लागतो असा बऱ्याच जणांचा समज असतो, पण आता मार्केटच्या प्रचंड व्हारायटीमध्ये काही बेस्ट कार कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला सेफ्टी सोबत सनरूफ पुरवतात ते सुद्धा 10 लाखांमध्ये. चला जाणून घेवूया ‘टॉप ५ सनरूफ असणाऱ्या कार ज्या 10 लाखाच्या आतमध्ये मिळतील’.

10 लाखाच्या आतमध्ये मिळणाऱ्या 5 बेस्ट सनरूफ कार

आजकाल कार एडवांस्ड फिचर्सने जितकी कमालीची हवी तितकी लुने सुद्धा आकर्षक हवी, हा विचार बऱ्याच जणांचा असतो. त्यामुळे खास सनरूफ सारखे एडवांस्ड फिचर कारमध्ये मिळवण्यासाठी लोक त्याचे पैसे मोजायलाही तयार होतात, पण प्रत्येकाला सनरूफ असणाऱ्या महागड्या कार विकत घेणं परवडत नाही, त्यात सनरुफसाठी अन्य एडवांस्ड किंवा सेफ्टी फिचर्समध्ये तडजोड करावी लागते,पण आता काही कंपन्यांनी अश्या सुरक्षित कार लाँच केल्या आहेत, ज्यांना सनरूफची जोड मिळते शिवाय बजेट फ्रेंडली किंमतीमुळे सनरूफ असणारी कार विकत घेतल्याचा आनंद मिळतो. खालील यादीत अश्या कारची माहिती दिली आहे, ज्यांना सनरूफ तर मिळतच शिवाय कमी किंमत, कमालीचे फिचर्स, मायलेज-रेंज आणि लूकसुद्धा मिळते.

टाटा नेक्सॉन

सनरूफ असणारी नेक्सॉन ही कार 5 सीटर असून, डिझेल आणि पेट्रोल या इंधन प्रकारातून 7.60 लाखापासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही एसयुव्ही 1 लीटर पेट्रोलमध्ये 24.07 किमी मायलेज तर 1 लीटर डिझेलमध्ये 27.5 किमी इतकं मायलेज देते. ग्लोबल NCAP तर्फे या एसयुव्हीला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत.

ह्युंदाई वेन्यू

AN-CAP तर्फे ह्युंदाई वेन्यू एसयुव्हीला 4 स्टार रेटिंग मिळाले असून, मिडल क्लास लक्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या सनरूफ कारची किंमत 7.94 लाख इतकी आहे. 5 सीटर कारमध्ये अनेक एडवांस्ड फिचर्स आहेत. तीन इंजिन ऑप्शन्स असणारी ही कार 24 किमी इतकं मायलेज देते.

वाचा: 30 लाखाच्या आतमध्ये मिळणार महिंद्राची नवीन 7 सीटर ईव्ही

महिंद्रा XUV300

ही एसयुव्ही ऑटोमैटिक आणि मैन्युअल पेट्रोल, डिझेल या व्हेरिएंटमधून उपलब्ध आहे. या सनरूफ असणाऱ्या कारची किंमत 9.39 लाखापासून सुरू आहे. ग्लोबल NCAP तर्फे या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार 17 ते 20 किमी इतकं मायलेज देते.

वाचा: एथर रिझताचे बुकिंग सुरु, 999 रुपये भरुन करा ह्या सोप्या पद्दतीने बुकिंग

एमजी ॲस्टर

या सनरूफ असणाऱ्या पेट्रोल एसयुव्हीची किंमत 10.81 लाखापासून सुरू होते, एका लिटरमध्ये ही एसयुव्ही 15.07 इतकं मायलेज देते. या कारला ग्लोबल NCAP तर्फे 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग, ABS यांचा समावेश आहे.

वाचा: टॉप 5 शहरामधील टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची किंमत

किया सोनेट

सनरूफ असणाऱ्या या एसयुव्हीची किंमत 9.99 लाख रुपये असून सेफ्टी साठी या कारमध्ये 6 एअरबॅग दिल्या गेल्या आहेत, ग्लोबल NCAP मध्ये या कारला 3 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. ही एसयुव्ही 26.5 किमी इतके मायलेज CNG मधून, 23.9 किमी मायलेज डिझेलमधून आणि 18.4 किमी इतके मायलेज पेट्रोलमधून देते.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment