SSC च्या रिझल्टनंतर कॉलेजमध्ये जाण्यासाठी 5 बेस्ट स्कूटर, नो लायसन्स नो रजिस्ट्रेशन 

5 Best Electric Scooters for SSC 10th Passed Students

आजचं दहावीचा निकाल लागला आहे, तुम्ही चांगल्या गुणांनी पास होऊन पुढच्या शिक्षणाचा प्रवास करण्यासाठी म्हणजेच कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी अश्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहात का, जी चांगले मायलेज-रेंज तर देईलचं शिवाय इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरीसुद्धा मजबूत असेल तर तुम्ही अगदी योग्य माहिती वाचत आहे, खालील माहितीमध्ये 5 इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती मिळत आहे, ज्या चालवायला लायसन्स अथवा रजिस्ट्रेशनची गरज अजिबात पडत नाही शिवाय कमी किंमतीमध्ये 50 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल.

जेमोपाई मिसो इलेक्ट्रिक स्कूटर

44 हजारात मिळणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 75 किमी इतकी रेंज देते. या स्कूटरची 0.84 Kwh लिथियम आयन बॅटरी चार्ज होण्यासाठी 3-4 तास पुरेसे आहेत. 4 रंगामधून ही स्कूटर उपलब्ध आहे. पुढील आणि मागील बाजूस ड्रमब्रेक्स मिळतात. स्कूटरला सुरू करण्यासाठी पुश बटण मिळत,LED हेडलाइट-टेललाइट-टर्न सिग्नल सोबत इतर अद्यावत फिचर्स स्कूटरमध्ये मिळतात. ह्या स्कूटरसाठी लायसन्स-रजिस्ट्रेशन ची गरज पडत नाही.

ओकिनावा लाइट

69,095 किंमत असणारी ओकिनावा लाइट ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 60 किमी पेक्षा अधिक रेंज देते, तरुणाईला आवडतील असे 5 रंग या स्कूटरमध्ये उपलब्ध आहेत. यातील 1.25 kWH लिथियम आयन बॅटरीला 3 वर्षाची वॉरंटी मिळते आणि मोटरला 30,000 किमी किंवा 3 वर्षाची वॉरंटी मिळते. या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 3-4 तास पुरेसे आहेत. सिटखाली जागा, LED हेडलाइट-ब्रेकलाइट-टर्न सिग्नल, स्कूटर चालू-बंद करण्याचे बटण, रायडिंग मोड बदलण्यासाठी बटण मिळते. बॅजेटफ्रेंडली आणि दैनंदिन वापरासाठी ओकिनावा लाइट स्कूटर हा पर्याय चांगला आहे. ह्या स्कूटरला चालवण्यासाठी कोणत्याही लायसन्स अथवा रजिस्ट्रेशनची अजिबात गरज पडत नाही.

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश LX

60,000 रुपये ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत असून 2 रंगात ही स्कूटर विकली जाते. ह्या स्कूटरच्या महत्त्वाच्या फिचर्समध्ये पोर्टेबल म्हणजेच काढघालीची बॅटरी,LED हेडलँप्स, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, USB चार्जिंग पोर्ट, टेलिस्कोपिक सस्पेशन सारखे अनेक एडवांस्ड फिचर्स स्कूटरमध्ये मिळतात. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किली प्रति तास इतका आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 85 किमी इतकी रेंज देते. हिची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तासांचा कालावधी पुरेसा आहे. ही स्कूटर चालवण्यासाठी कोणत्याही लायसन्स अथवा रजिस्ट्रेशनची अजिबात गरज पडत नाही.

हिरो एडी

72,000 रुपयांची ही हिरो एडी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड  आणि क्रुझ कंट्रोल हे दोन आकर्षणाचे फिचर्स आहेत. याचसोबत USB चार्जिंग पोर्ट, टेलिस्कोपिक सस्पेशन, E-लॉक सारखे इतर एडवांस्ड फिचर्सचा समावेश आहे. स्कूटरचा टॉप-स्पीड 25 किमी प्रति तास इतका असून, 4- 5 तासाच्या संपूर्णपणे चार्ज होणाऱ्या बॅटरीमार्फत 85 किमी इतकी रेंज ही स्कूटर देते. ह्या स्कूटरला चालवण्यासाठी लायसन्स अथवा रजिस्ट्रेशनची गरज पडत नाही.

कायनेटिक ग्रीन झिंग

71,990 रुपये किंमतीची ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन वेरिएंट्स आणि 3 रंगामधून मिळते. ह्या स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. एका चार्जमध्ये ही स्कूटर 70 किमी पेक्षा अधिक प्रवास करते. ह्या स्कूटरच्या बॅटरीवर 3 वर्षाची आणि मोटरवर 2 वर्षाची वॉरंटी मिळते. ह्या स्कूटरला चालवण्यासाठी कोणत्याही लायसन्स अथवा रजिस्ट्रेशनची अजिबात गरज पडत नाही.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment