Benling Aura Electric Scooter: स्वस्तात मस्त रेंज आणि फिचर्सने भरपूर बेन्लिंग ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर, असं करा बुकिंग

बेन्लिंग इंडिया ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये लाँच झाली आहे, जी एका चार्जमध्ये 100 किमी पेक्षा अधिकचा पल्ला गाठू शकते. लोंग रेंजसाठी पॉवरफुल बॅटरी, आकर्षक बॉडी आणि भरपूर जागा मिळणारी ही स्कूटर टीव्हीएस iQube, बजाज चेतक आणि एथर 450X ला टक्कर देऊ शकते. तुम्हीसुद्धा अशी 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणारी इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर बेन्लिंग ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तुमच्या जवळचे बेन्लिंग इंडिया ऑरा इलेक्ट्रिक स्कूटरचे शोरूम किंवा या इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग कसं करायचं हे जाणून घ्यायच असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

बेन्लिंग इलेक्ट्रिक स्कूटर

बेन्लिंग ऑरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 94,296 रुपये इतकी असून या वेरिएंटमध्ये 2.5kW BLDC मोटर दिली गेली आहे. या स्कूटरची लिथियम आयन बॅटरी एका चार्जमध्ये 120 किमी प्रवास करू शकते. त व्हेरिएंटच्या लिथियम आयन बॅटरीवर 3 वर्षाची वॉरंटी आणि मोटरवर 1 वर्षाची वॉरंटी मिळते. या व्हेरिएंटच्या स्पेसिफिकेशनमध्ये स्कूटर स्टार्ट-स्टॉप होण्याचा स्विच, औरा USB चार्जिंग पोर्ट, स्मार्ट ब्रेकडाउन असिस्ट, डिजिटल कंसोल, पार्किंग असिस्ट मोडसोबत इतर फिचर्सचा समावेश आहे. स्टँडर्ड वेरिएंटमध्ये तीन रंग पर्याय मिळतात; पर्पल, ब्लॅक आणि ब्लू. ह्या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 4 तास पुरेसे आहेत. पुढे डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक असणारी ही स्कूटर वजनाने इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत खूप हलकी आहे.

वाचा: Ather Rizta किंमत, बुकिंग-डिलीव्हरी, रंग, रेंज, वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती

बेन्लिंग ऑरा स्कूटर फिचर्स आणि संपूर्ण माहिती

प्रत्येकाला आकर्षित करणारे फिचर्स ह्या स्कूटरला दिले गेले आहेत, ज्यामध्ये स्टाइलिश हेडलँप्स,ट्यूबलेस टायर सोबत नवे आलोय व्हिल्स, सामान वाहून नेण्यासाठी छोटं पण मजबूत कॅरियर, टेललॅम्प, यासोबत USB चार्जिंग पोर्ट, इंटिग्रेटड लॉकिंग सिस्टिम, स्मार्ट ब्रेडाऊन असिस्ट, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम, एंटीथेफ़्ट प्रोटेक्टिव अलार्म यांचा समावेश आहे.

बेन्लिंग ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग प्रक्रिया

ही स्कूटर स्टँडर्ड व्हेरिएंट नुसार एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये विक्रीस आहे, तुम्हाला जर ह्या लोंग रेंज देणाऱ्या अमी एडवांस्ड फिचर्सने भरपूर असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग करायचे असेल तर तुम्ही इंटरनेटवर benling aura electric scooter showroom near me अस टाकून तुमच्या जवळच्या शोरूममध्ये भेट अथवा टेस्ट-रायिड घेवू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment