Ather Rizta किंमत, बुकिंग-डिलीव्हरी, रंग, रेंज, वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती

नुकतीच Ather Energy ची नवीन स्कूटर ‘रिझता’ लाँच झाली आहे, रिझताची किंमत 1.20 लाखच्या आतमध्ये असून ही स्कूटर आतापर्यंच्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमधली सर्वात मोठी सीट असणारी स्कूटर म्हणून ओळखण्यात येत आहे. या स्कूटरचे दोन व्हेरिएंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नवे डिझाईन केलेले LED हेडलँप आणि नवे आलोय व्हिल्स असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त 999 रुपये भरून बुक करू शकता. (ather rizta launch)

एथर रिझता 1.10 लाखामध्ये लाँच

टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीमध्ये एथर एनर्जीचे नाव आवर्जुन घेतले जाते आणि आता हीचं एथर इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी नवीन स्कूटर रिझताला घेवून बाजारात येतंय. आजपर्यंत जितकी चर्चा अंबानीच्या मुलाच्या लग्नाची झाली नसेल, तितकी चर्चा एथर रितझाची झाली आहे, चर्चेचं कारणही तसंच आहे; कमालीचे फिचर्स, लांबचा पल्ला आणि सर्वात महत्वाचं आत्तापर्यंतच्या सर्वात मोठी सीट असणारी इलेक्ट्रिक स्कूटर रिझता. चला जाणून घेवुया रिझताची संपूर्ण माहिती.

एथर रिझता दोन व्हेरिएंटमध्ये लाँच

रिझता ही फॅमिली ओरिएंटेड स्कूटर म्हणूनच नावारूपास आली आहे आणि नावामधेच ‘फॅमिली’ असल्याने या स्कूटरमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबाच्या इलेक्ट्रिक स्कूटरकडून असणाऱ्या अपेक्षा-गरजा पुरवणारे फिचर्स देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन वेरिएंट्समध्ये लाँच झाली आहे; Ather Ritza S आणि Ather Ritza Z. या दोन्ही वेरिएंट्सची रेंज आणि बॅटरीमध्ये भिन्नता आहे. लुकच्या बाबतीमध्ये माहिती द्यायची झाली देताना, एथर 450 शी रिझताचा लुक मिळत-जुळता आहे, अशी भावना रिझताला पाहिल्या क्षणी येते. स्कूटरमध्ये नव्या प्लेटफॉर्म वर बनलेले स्पोर्टी, नजरेत भरणारे फ्रंट ऍप्रन्स ज्यामध्ये DRL आणि टर्न इंडिकेटर समाविष्ठ झाले आहेत. राउंड पॅनल्स, स्लिक LED टेललाइट्स आणि मोनो LED हेडलँप्ससारख्या वैशिष्ठ्यांमुळे स्कूटर अधिकचं आकर्षक दिसते.

आत्तापर्यंतच्या सर्वात मोठी सीट असणारी इलेक्ट्रिक स्कूटर

कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी या स्कूटरमध्ये जागेचा तुटवटा अजिबात केला नाहीये, एकूण 56 लीटरची बूट- स्पेस असणाऱ्या या स्कूटरला 900 मिमी इतकी लांब सीट दिली गेली असून, ज्यामध्ये किराणा, दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असणाऱ्या सर्व वस्तू आरामात मावू शकतील अशी स्पेस देण्यात आली आहे. ही सीट आतापर्यंच्या इतर कोणत्याही स्कूटरच्या तुलनेत 34लिटरची अंडर स्टोरेज असणारी मोठी सीट आहे. सोबत निफ्टी स्टोरेज बिनसुद्धा या स्कुटरध्ये देण्यात आली आहे; ज्यामध्ये पटकन हाती येईल अस सामान ठेऊ शकता येत. ह्या स्कूटरमध्ये 12 इंचाचे टायर दिले आहेत.

नवीन डिझाइन आणि फीचरसोबत रिझता लाँच

रिझताच्या फिचर्सबाबत माहिती देता स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड आणि ऑटो हिल्ड होल्डसोबत दोन रायडिंग मोड दिले गेले आहेत;स्मार्ट इको मोड आणि झिप मोड. रिझतामध्ये इतर एडवांस्ड फिचरसोबत डिपव्यु LED डिस्प्ले, पार्क असिस्ट, टच- स्क्रिन सोबत TFT डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि नॅविगेशन सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टीसाठी स्कूटरला स्किड कंट्रोल टेक्नोलॉजी फिचर देण्यात आला आहे. सोबत ESS सिस्टम आणि एथर फॉल सेफ यासारखे फिचर देण्यात आले आहे. बॅटरीची माहिती देता, दोन्ही वेरिएंट्सला भिन्न बॅटरी पॅक पुरवण्यात आला आहे. रिझता येसमध्ये 105 किमी रेंज देणारी 2.9 kWh बॅटरी देण्यात आली आहे तर रिझता झेडमध्ये सुद्धा 105 किमी रेंज देणारी 2.9 kWh बॅटरी पॅकसोबत 3.7 kWh बॅटरी जी 125किमीचा पल्ला पार करू शकते अशी बेटेरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्समधल्या बॅटरी पॅकना 5 वर्ष किंवा 60,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे.

९९९ रुपये भरून रिझताचे बुकिंग सुरू

तीन रंगांमधून उपलब्ध असणाऱ्या ह्या रिझता येस व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख इतकी आहे तर रिझता झेडमधल्या 2.9 kWh बॅटरी असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 1.25 लाख आणि 3.7 kWh बॅटरी असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 1.45 लाख रुपये इतकी आहे. तुम्हाला जर ही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्यायची असेल तर तुम्ही केवळ 999 रुपयांची टोकन अमाऊंट भरून बुकिंग करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment