बंगलोरमधील 5 बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर

Published:

Best electric scooter in Bangalore

पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर आता काळाची गरज बनली आहे, आपण सर्वच कमी किंमतीमध्ये चांगल्या दर्जाची बॅटरी-मोटर, लांबची श्रेणी, जास्त वेग, सुरक्षितता आणि टिकाऊ इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधत असतो आणि अशी बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली की आपला संपूर्ण प्रवास आरामदायी आणि सुखकर होतो. खालील माहितीमध्ये अश्या काही बेंगळुरूमध्ये मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती दिली आहे, ज्या कमालीची वैशिष्ट्ये, बॅटरीचे आयुष्य, वेग आणि आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.

बाउन्स इन्फिनिटी E1

Bounce Infinity E1 ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही बेंगळुरूमधल्या कोणत्याही Bounce Infinity शोरूममधून खरेदी करू शकता. 93,386 रुपयांपासून या स्कूटरची किंमत सुरू होते. बाउन्स इन्फिनिटी E1 या स्कूटरची अदलाबदल करण्यायोग्य बॅटरी ही खासियत आहे. 65 किमी प्रति तास इतका टॉप-स्पीड आणि 85 किमी इतकी रेंज या स्कूटरला मिळते. या स्कूटरची 1.9 kWh बॅटरी पैक  असणारी बॅटरी 4 तासात संपूर्ण चार्ज होते. 

बाउन्स इन्फिनिटीचे मुख्य हायलाइट्स 
  • सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
  • अदलाबदल करण्यायोग्य बॅटरी

अँपिअर मॅग्नस EX

अँपिअर मॅग्नस EX ची किंमत 94,900 रुपये इतकी असून तुम्ही जर Ampere Magnus EX showroom near me असं गुगलवर शोधलं तरी तुम्हाला तुमच्या जवळचे Ampere शोरूम मिळतात. 2.29 Kwh ची बॅटरी सोबत या स्कूटरमध्ये 121 किमी रेंज आणि 50 किमी प्रति तास इतका टॉप स्पीड मिळतो. 

अँपिअर मॅग्नसचे मुख्य हायलाइट्स
  • रोजच्या प्रवासासाठी बेस्ट
  • इंधन ICE स्कूटरसाठी देखणी
  • ट्रॅफिकमध्ये बेस्ट

Vida V1

बेंगलोरमध्ये कोणत्याही शोरूमध्ये Vida V1 या इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी करू शकता. 1,28,294 रुपये स्कूटरची किंमत असून 80 किमी प्रति तास इतका टॉप-स्पीड आणि 100 किमी इतकी रेंज या स्कूटरची आहे. 5 तासात या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी संपूर्ण चार्ज होते.

Vida V1चे मुख्य हायलाइट्स
  • स्वॅप करण्यायोग्य बॅटरी वैशिष्ट्य मिळते
  • लोंग रेंज
  • क्रूझ कंट्रोल, कीलेस इग्निशनसारखे टॉप एडवांस्ड फिचर्स

OLA S1 Pro

OLA S1 Pro ही बेंगलोरमधल्या सर्वात लोकप्रिय स्कूटरच्या यादीत सामावते. 1,32,478 रुपये इतकी किंमत असणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ एका चार्जमध्ये 200 किमी पर्यंतची रेंज देते. 120 किमी प्रति तास इतकी टॉप स्पीड या स्कूटरचा आहे. 

ओला येस वन प्रो प्रमुख हायलाईट्स
  • एडवांस्ड फिचर्सने भरपूर
  • फ़ास्ट चार्जिंग सपोर्ट

Ather 450X

या स्कूटरची खरेदी तुम्ही बेंगलोरमधून Ather energy showroom मधून करू शकता. 1,41,307 रुपये इतक्या किंमतीची ह्या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी आणि रेंज 111 किमी इतकी आहे. या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात.

Ather 450X प्रमुख हायलाईट्स
  • कमालीची रेंज
  • बेस्ट टचस्क्रीन क्लस्टर 
  • फ़ास्ट चार्जिंग सपोर्ट
Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version