EV Startup Creatara Launch: IIT दिल्ली इंजिनिअर्सने बनवली ‘क्रिएटारा इलेक्ट्रिक स्कूटर’, जाणून घ्या हा ‘EV स्टार्टअप’

Ajinkya Sidwadkar

Creatara – innovation in motion: ‘जगाच भविष्य भावी पिढीवर अवलंबून आहे’, ह्या वाक्याला शोभेल असा उपक्रम भारतातील ’दिल्ली IIT’ इंजिनिअर्सने सिध्द करुन दाखवलं. ग्रीन अर्बन मोबिलिटी सोल्यूशन या प्लेटफॉर्म वर IIT च्या ह्या दोन अभियंतांनी Creatara या EV कंपनीसोबत काम करताना, दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत, ज्यांची नावे ‘Cero आणि Motocross’ अशी आहेत. ह्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या खास फीचर्स, डिटेल्स आणि डिझाइन बाबतीत संपुर्ण माहीती जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा.

  • क्रिएटाराने लाँच केलेल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर

  • ग्रीन अर्बन मोबिलिटी म्हणजे काय ?

  • इलेक्ट्रिक स्कूटरचे रेंज आणि डिटेल्स

क्रिएटाराने लाँच केलेल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर

भारतामध्ये नामवंत शिक्षण संस्थेच्या यादीत दिल्ली IIT च नाव नेहमीच मोजलं जात. २०१८ मध्ये ह्याच IIT च्या दोन टेलेंटेड विकास गुप्ता आणि रिंगलेरी पाल्मे या अभियंतानी इलेक्ट्रिक वाहन कंपनी बनवली, जिच नाव क्रिएटारा ठेवण्यात आलं. आणि ह्या कंपनीने जवळजवळ ५ वर्षाच्या लांबच्या पल्ल्यानंतर Cero आणि Motocross या दोन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीयांच्या भेटीस आणल्या आहेत. ह्या कंपनीचे उद्दिष्ठ ग्रीन अर्बन मोबिलिटी साधन लोकांपर्यंत पुरवणं, लोकांसाठी EV उपलब्ध करुन देणं आहे.

ग्रीन अर्बन मोबिलिटी म्हणजे काय ?

शहरांमध्ये अथवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकाना वस्तूंच्या हिरव्या, स्मार्ट आणि सर्वसमावेशक हालचालींना प्रोत्साहन देणे, जसं की लोकांना इंधन गाड्यांऐवजी पायी अथवा bycycle चा वापर करण्यास प्रोस्तहित करणे, खाजगी गाड्यांऐवजी पब्लिक ट्रांसपोर्ट वापरण्यास प्रोत्साहित करणे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

इलेक्ट्रिक स्कूटर: रेंज आणि इतर डिटेल्स

Creatara च्या ह्या दोन EV Cero आणि Motocross याना हाय-स्पीड सेगमेंटमध्ये मोजल जात आहे ज्याच कारण ह्या गाड्यांची पाउरफुल बॅटरी आहे, ह्या गाड्यांमधली 4 kWh बॅटरी जी चार्ज केल्यावर 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. ह्या गाड्यांचा प्रतितासचा टॉप स्पीड हा 100 किलोमीटर इतका आहे, ह्या दोन्ही गाड्यांचे डिझाइन अशक्य कमालीचे बनलेले आहे, या गाड्यांची बॅटेरीसुद्धा रिमूव्हेबल आहे.
या दोन्ही गाड्यांच्या वापर भिन्न प्लेटफॉर्मसाठी केला जाणार आहे ; Sero ही इलेक्ट्रिक स्कूटर दैनंदिन वापरासाठी तर त्याच ठिकाणी Moto Cross ही भारतामधल्या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर धावण्यासाठी केली जाणार आहे. दानही गाड्यांच्या फिचर्सची माहिती देता इतर इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे ह्या गाड्यांमध्येसुद्धा हवामान आणि रस्त्याच्या परिस्थितीची रिअल-टाइम माहिती देणारे सेन्सर्स दिले गेले आहेत. सोबत गाड्यांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग आणि स्पीड मॉनिटरिंग फिचरसुद्धा मिळणार आहेत.आणि आता लवकरच Creatara ह्या दोन्ही गाड्यांच्या युनिट्स सोबत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेसुद्धा वाचा:

Rising Hybrid Cars: इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ‘हाइब्रिड कारला’ जास्त प्राधान्य..का मिळतेय हाइब्रिड कारला जास्त पसंदी ?

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment