Rising Hybrid Cars: इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ‘हाइब्रिड कारला’ जास्त प्राधान्य..का मिळतेय हाइब्रिड कारला जास्त पसंदी ?

आजकाल सर्वत्र इलेक्ट्रिक कारचा बोलबाला असताना मजबूत हायब्रीड कारसुद्धा भारतीय बाजारपेठेत स्वतःचा ठसा उमटवत आहेत. इलेक्ट्रिक कार्स आणि हाइब्रिड कार्स ह्याना वाहन बाजारपेठेत एकमेकांचे स्पर्धक म्हणूनच पाहिलं जातंय. भारतीय कार खरेदारांच्या यादीत ह्या ‘हायब्रिड गाड्या’ मोठ्या संखेने विकल्या जात आहेत, आणि आत्ताच्या इलेक्ट्रिक कार्स च्या जमान्यात हायब्रिड गाड्याना का पसंती मिळते हे जाणूया.

  • 3 महिन्याच्या गाड्या विक्रीच्या अहवालात कोणत्या गाड्या जास्त विकल्या गेल्या ?
  • हायब्रीड कारला प्राधान्य देण्यामागची 4 कारणे

हाइब्रिड कार्स विक्री अहवाल

2023  च्या गेल्या तीन महिन्यात गाडीविक्री च्या अहवालात अशी माहिती मिळाली आहे की , इलेक्ट्रिक वाहनांचे 21,445 युनिट्स विकले गेले आहेत तर, त्याच ठिकाणी हायब्रीड गाड्यामध्ये 24,062 युनिट्स ची विक्री झाली आहे. विशेषत हायब्रीड गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्या जास्त प्रमाणात उपलब्ध होत्या.

हायब्रीड कार कडून मिळणाऱ्या सुविधा

1. परवडणाऱ्या दरात विक्री

संकरित वाहनांवर 43% विस्तृत दर असूनसुद्धा हायब्रीड कारच्या किंमती ह्या इलेक्ट्रिक कार च्या किमतीपेक्षा परवडणाऱ्या असतात.

2. असामान्य लवचिकता आणि सुविधा

EV गाड्यांच्या तुलनेत हायब्रीड गाड्यांची जास्त विक्री होण्याचं मोठं कारण हे आहे की चार्जिंग पॉईंट्स अथवा चार्जिंग स्टेशन शोधण्याची चिंता करावी लागत नाही, ज्यामुळे ड्राइविंग करण सोयीस्कर बनत.

3. गाड्यांचे विविध पर्याय

भारतात इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत संकरित वाहनांमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत. ह्या पर्यायात कॉम्पक्ट SUV सेडान आणि MPV चा समावेश आहे.

4. कमी खर्च शिवाय रेसेल वैल्यू पण चांगली

भारतीयांची विचारक्षमता अशी आहे की, त्यांना कमी देखभालीत चांगली गाडी हवी असते. इलेक्ट्रिक गाडीची तुलना हायब्रीड गाड्यात करताना हायब्रीड गाड्याना बॅटरी बदलण्याची आवश्यकता नसते. maintenance कमी होतो, अश्या वेळेस गाडीची पुनर्विक्री करताना गाडीची resell value पण चांगली मिळते.

हेपण वाचा:

Top 5 EV Scooters in 2023- या वर्षा अखेरीस लाँच होणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक स्कूटर

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment