इलेक्ट्रिक ड्यूकचा बोलबाला, एकदा पहाच KTM ची पहिली इलेक्ट्रिक बाइक

KTM Duke’s Electric Bike India Launch: तरुणाईमध्ये पॉप्युलर बाईक्समधलं अग्रगण्य नाव म्हणजे ‘KTM’ आणि आता केटीएम बाबतीत ब्रेकिंग न्युझ बाहेर पडली आहे, ती म्हणजे KTM ची ‘ड्रीम-बाईक’ इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत एंट्री करत आहे, या बाईकचे नाव Duke Electric किंवा E-Duke असू शकते, केटीएमची ही पहिली इलेक्ट्रिक बाईक असणार आह, परफॉर्मन्सने हि बाईक Ktm Duke च्या तोडीस तोड देणारी असून वेगवान, लुकने स्पोर्टी आणि जबरदस्त- कमालीचे फीचर्स या बाइकमध्ये असणार आहेत. चला जाणून घेऊया, केटीएम इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकबद्दल माहिती सोबत भारतामधल्या टॉप मोठ्या बॅटरीच्या 5 इलेक्ट्रिक बाइक्स इनफॉर्मेशन

केटीएम इलेक्ट्रिक बाइक

संपूर्ण भारतात ड्यूक केटीएम सिरीज तरुणाईच्या गळ्यातलं टाईतच आहे. इलेक्ट्रिक बाईकचा वाढत वापर आणि प्रसार पाहता, भलेभले नावाजलेले आणि प्रसिद्ध वेहिकल ब्रँड आता इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रात पाय रोवत असताना, स्पोर्ट बाईक प्रेमींची  टू-व्हीलर कंपनी, KTM पण इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये ड्यूकला घेऊन धकधक वाढवायला सज्ज झाली आहे. KTM कंपनीची इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमधील हि पहिली इ-बाईक असणार आहे; जिची नाव ‘E-Duke किंवा ड्यूक इलेक्ट्रिक बाइक’ असणार आहे.

KTM E-Duke ची किंमत 2.50 लाख असण्याची अपेक्षा केली जातेय, जी केवळ एका व्हेरिएंट मध्येच उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही अपकमिंग बाईक अंडर 5 लाख च्या शोधात असाल तर केटीएम इलेक्ट्रिक बाइक हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा: ‘बॅटरीवाली ॲक्टिव्हा’ होंडा इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग, किंमत आणि फीचर्स

इ-ड्यूकमध्ये बेस्ट रेंज देणारा बॅटरी पॅक

ड्यूक इलेक्ट्रिक बाइक मध्ये 5.5 kWh ची बॅटरी पॅक दिली जाणार आहे जीची , 13.4 bhp पर्यंत पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. KTM ड्यूक इलेक्ट्रिक मोटरसायकल एका चार्जमध्ये 150 किलोमीटर ते 200 किलोमीटर अंतर कापणार आहे. अपकमिंग केटीएम इलेक्ट्रिक बाइक हि Husqvarna E-Pilen वर आधारित असणार  आहे.

वाचा: ‘बिझिनेसवाल्यांची स्कूटर’ ओलाची नवीन स्कुटर मिळणार फक्त B2B साठी, काय आहे हे B2B?

ड्यूक इलेक्ट्रिक बाइक स्पोर्टी लूक

असं म्हंटल जातंय ,दिसायला हि इलेक्ट्रिक बाईक KTM 125 Duke सारखीच स्पोर्टी आणि आकर्षक असण्याची शक्यता आहे, KTM कंपनीकडून याबाबतीत खुलासा जरी झाला नसला तरी या बाइकमध्ये चांगला स्पीड, प्रीमियम फीचर्स, शक्तिशाली परफॉर्मन्स 125 Duke च्या तुलनेत कसे असतील, याची माहिती लवकर जाहीर होईल.

वाचा: यामाहा मोटरने ‘देशी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअपला’ दिला, 335 कोटी रुपयांचा निधी

Husqvarna ई-पिलेन

अपकमिंग केटीएम इलेक्ट्रिक मध्ये Husqvarna (मूळचे स्वीडन)मधील अत्याधुनिक आणि हाय क्वालिटी इलेक्ट्रिक मोपेड असणार आहे ज्यामध्ये 8,000 वॅटची शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर आहे ज्याचा उपयोग जलद प्रवेग प्रदान करण्यासाठी केला जातो.

E-Duke च्या मागोमाग ‘या’ दोन बाईकची एंट्री

KTM ची मूळ कंपनी Pierer Mobility यांच्याकडून नव्या अपकमिंग बाइकबाबदल अधिक माहिती बाहेर पडली; ई-ड्यूक सोबत आणखी दोन इलेक्ट्रिक बाइक्स लवकरच बाजारपेठेत हजेरी लावणार आहेत, KTM E10 आणि E LV. केटीएम E10 ही डर्ट बाईक असणार आहे तर E LV ही स्क्रॅम्बलर बाईक असणार आहे.

भारतात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक

इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणं म्हणजे एक वेळची गुंतवणूक केल्यात जमा आहे, थोडक्यात एकदाच रक्कम भरून बाईकची खरेदी त्यांनतर मात्र इंधनाचा खर्च कायमचा बंद, म्हणूनच सध्या पेट्रोल बाईकच्या तुलनेत इलेक्ट्रिक बाईकची विक्री वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहन काळाची गरज बनलेली असताना मोठ-मोठ्या बाइक, स्कुटर कंपन्या सुद्धा इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंटमध्ये उडी घेत आहेत.

स्पोर्ट बाईकचे चाहते जगभरात सर्वत्र आहेत; तरुणाईमध्ये इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईकला सुद्धा पसंदी मिळतेय. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईकच्या शोधात असाल तर खाली यादीत तुम्हाला भारतामधल्या टॉप 5 इलेक्ट्रिक बाइक्सची माहिती मिळेल, ज्याचा डॅशिंग लूक आणि कमाल परफॉर्मन्स आहे.

  1. अल्ट्राव्हायोलेट F77
  2. ओबेन रोर
  3. कोमाकी रेंजर
  4. जॉय ई-बाईक मॉन्स्टर
  5. कबिरा मोबिलिटी KM 3000

 

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment