Ola Electric S1: ओला स्कूटर खरेदीसाठी लोकांची घाई, Ola ने कमी केली या मॉडेलची किंमत, लवकर घ्या तुम्हीसुद्धा फायदा

इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय, पण बजेट कमी आहे? ओला इलेक्ट्रिकने तुमच्यासाठी अशी सुवर्णसंधी आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ओलाची सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटर ओला इलेक्ट्रिक S1X चा एक प्रकार सर्वात स्वस्त किंमतीमध्ये मिळणार आहे. ओला S1X इलेक्ट्रिक स्कूटर च्या किंमतीमध्ये कमालीची घट झाली आहे आणि जर तुम्हाला कमी किंमतीमध्ये प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर ओला इलेक्ट्रिक S1 चा विचार नक्कीच करू शकता. या स्कूटरची माहिती जाणून घ्यायची असेल अथवा बुकिंग करायचे असेल तर खाली संपूर्ण माहिती वाचा.

ओला S1 X ची किंमत 10,000 रुपयांनी कमी

ओला S1 X ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 69,000 ते 99,999 रुपये या दरम्यानची असून ही किंमत ओलाच्या बॅटरी पॅकवर आधारित आहे. ह्या ओला S1 X च्या स्कूटरमध्ये 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh बॅटरी पॅक मिळतो. या तीनही प्रकारच्या मॉडल्स 5,000 ते 10,000 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत, यातील ओला S1 X 2 kWh या मॉडेलची किंमत 69,000 रुपये एक्स शोरूम इतकी आहे, ओला S1 X 3 kWh या मॉडेलची किंमत 84,999 रुपये एक्स शोरूम इतकी आहे आणि ओला S1 X 4 kWh या मॉडेलची किंमत 99,999 रुपये एक्स शोरूम इतकी आहे. या सर्व किंमतीवर EMPS सबसीडी लागू आहे.

वाचा: ओला ने लाँच केली स्वस्तात 200 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर

ओला S1 X चे बॅटरी पॅकमुळ किंमतस्वस्त झालेली किंमत
 S1 X 2 kWh69,000 रुपये10,000 रुपये
 S1 X 3 kWh 84,999 रुपये 5,000 रुपये
 S1 X 4 kWh99,999 रुपये10,000 रुपये

वाचा: ओला Scooter Contest मध्ये विडिओ बनवून सहभागी व्हा आणि गिफ्ट जिंका

S1X फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 मोड्स मिळतात ज्यात; इको,नार्मल आणि स्पोर्ट मोड मिळतो. डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, 3.5 इंचाची एलसीडी स्क्रीन, ऍप कनेक्टिविटी, रिव्हर्स मोड, साइड स्टैंड अलर्ट, लो बॅटरी इंडिकेटर, इलेक्ट्रिक स्टार्टचे बटण, क्रुझ कंट्रोल, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेशन, ड्युएल रिअर स्प्रिंग सारखे फिचर्स असूनही स्कूटर 7 रंगातून उपलब्ध आहे. ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे, स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागतो. ओला S1 X 2 kWh ही स्कूटर एका चार्जमध्ये 95 किमी प्रवास करते, ओला S1 X 3 kWh ही स्कूटर एका चार्जमध्ये 143 किमी प्रवास करते, ओला S1 X 4 kWh ही स्कूटर एका चार्जमध्ये 190 किमी प्रवास करते. 

ओला येस वन एक्स साठी सोप्पी बुकिंग प्रक्रिया

तुम्हाला जर ओला S1 X च्या या स्कूटरच्या खरेदीवर फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या स्कूटरसाठी बुकिंग करू शकता, यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ओला इलेक्ट्रिक शोरूममध्ये भेट देऊ शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment