OLA Scooter Contest मध्ये विडिओ बनवून सहभागी व्हा आणि गिफ्ट जिंका

Published:

OLA Scooter End ICE Age Contest: नंबर १ इलेकट्रीक स्कूटर उत्पादक आणि सेलर कंपनी, ओला इलेकट्रीक ने ८९ हजारांत S1 x Plus ची घोषणा केल्यानंतर नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन #ENDICEage कॉन्टेस्ट ची घोषणा केली असून हि कॉन्टेस्ट दिनांक २८ डिसेंबर २०२३ ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता आणि कॉन्टेस्टचा तपशील जाणून घेऊया.

हायलाईट्स

  • #ENDICEage कॉन्टेस्ट २८ डिसेंबर २०२३ ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु.
  • प्रत्येक ओला कम्युनिटी मेम्बरला सहभागी होता येणार.
  • विजेत्यांना मिळणार ओला मर्च.

OLA Electric End ICE Age Contest मध्ये सहभागी होण्याकरिता तुम्हाला व्हर्टिकल किंवा हॉरीझॉन्टल अँथम किंवा स्लोगन सह विडिओ काढावा लागणार. या विडिओ मध्ये तुम्हाला एखादी टॅगलाईन वापरून विडिओ तयार करायचा आहे. उदा. – “ओला इलेक्ट्रिक स्कूटर जोमात पेट्रोल स्कूटर कोमात  #ENDICEage” आणि हा विडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचा आहे. लक्ष्यात घ्या कि विडिओ अपलोड करत असताना @OlaElectric आणि  #ENDICEage हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. जर तुमचे स्लोगन विडिओ कंपनीला आवडले तर ओला इलेकट्रीक चे मर्च जिंकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

हि कॉन्टेस्ट २८ डिसेंबर २०२३ रोजी सुरु झाली असून ७ जानेवारी २०२४ हि या कॉन्टेस्ट ची शेवटची तारीख असणार आहे यानंतर कोणीही गिफ्ट जिंकण्यासाठी पात्र नसेल. गाडीचा मराठी भाषेत रिव्हिव बघण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

😍 Ola S1 X Plus - पेट्रोल स्कूटरचा कर्दनकाळ ९० हजारांत 🔥

 

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version