१५१ किमी रेंज देणारी हि ओला ई-स्कूटर अवघ्या ८५,९९९ रुपयांत मिळतेय, त्वरा करा

Ajinkya Sidwadkar

Updated on:

Ola S1 X Plus Price Cut: दिवाळी सण संपल्यानंतर ओला इलेक्ट्रिक ने डिसेंबर २०२३ साठी ओला एस-१ एक्स प्लस (Ola S1 X+) या इलेक्ट्रिक स्कूटर वर तब्ब्ल ₹२०,००० किंमत कपात केली आहे. ओला ची हि स्कूटर एका चार्ज मध्ये तब्ब्ल १५१ किलोमीटर रेंज प्रदान करते असे कंपनीचे म्हणणे आहे.

  • ओला एस-१ एक्स प्लस या मॉडेलवर ₹२०,००० डिस्काउंट
  • हि प्राईज कट लिमिटेड काळा करिता
  • अवघ्या ₹८९,९९९ एक्स-शोरूम किमतीत मिळणार ओला एस-१ एक्स प्लस

Ola S1 X Plus Price Cut: डिसेंबर टू रिमेंबर डिस्काउंट ऑफर

ओला इलेकट्रीक तर्फे नव्याने बाजारात आणलेल्या S1 X+ या इलेकट्रीक ‘डिसेंबर टू रिमेंबर’ या ऑफर अंतर्गत कंपनीने २० हजार सवलत जाहीर केली असून हि प्राईज कट डिसेंबर महिन्यापुरती मर्यादित असणार आहे. ग्राहक या ऑफर अंतर्गत S1 X+ अवघ्या 89,999 रुपये, एक्स-शोरूम किंमतीत इलेकट्रीक करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या ऑफर व्यतिरिक्त बँक ऑफ बडोदा, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, येस बँक, फेडरल बँक, वनकार्ड, IDFC, HDFC बँकांसह क्रेडिट कार्ड EMI वर ₹ 5,000 पर्यंत 5% सूट ग्राहकांना मिळणार आहे. जर तुमच्याकडे या बंकेंचे खाते आणि संबंधित कार्ड असेल तर तुम्हालाओला एस-१ एक्स प्लस अवघ्या ८५,९९९ रुपयांच्या किमतीती गाडी खरेदी करता येणार आहे. फायनान्स करिता शून्य डाउन पेमेंट, शून्य प्रोसेसिंग फी आणि ९.९९ टक्के इतके कमी व्याजदर याचा देखील लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ola S1 X+स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

S1 X+ मध्ये ६ kw क्षमतेची बीएलडीसी टेक्नॉलॉजी असणारी हब मोटर दिलेली आहे. हि मोटर ३.३ सेकंद अवधीत ०-४० किलोमीटर प्रतितास वेग घेते आणि ९० किलोमीटर प्रति तास इतका वेग धारण करते. या वाहनात ३ kWh ची लिथियम अयान तंत्रज्ञानाची बॅटरी दिली आहे जी १५१ किलोमीटर सर्टिफाईड रेंज प्रदान करते. १५१ किमी हि ऑन पेपर रेंज असून खऱ्या आयुष्यात हि ९० किलोमीटर च्या दरम्यान असेल. S1 X+ मध्ये टोटल सात कलर्स देण्यात आले आहेत ज्यामध्ये रेड व्हेलॉसिटी (लाल), मिडनाईट (निळा), वोग (काळा), स्टेलर (आकाशी), फंक (हिरवा), पोर्सलीन व्हाईट (पंढरा) आणि लिक्विड सिल्वर (सिल्वर) असे कलर्स देण्यात आले आहेत.

वाचा – Top 10 EV In India : 500km पेक्षा जास्त रेंज देणाऱ्या ‘Top 10 EV’ मायलेज आणि किंमती सह

वाचा – Ather New Family Scooter Launch Date जाहीर, ९० किमी टॉप स्पीड आणि ११० किमी रेंज देणारी स्कूटर, पहा स्पाय शॉट्स

ओला एस१ एक्स प्लस महाराष्ट्रातील ऑन रोड किंमत

जर तुम्ही महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, अमरावती, सातारा, पनवेल, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, नाशिक, पिंपरी-चिंचवड किंवा इतर शहरांत स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी S1 X+ ची ऑन रोड किंमत पुढील प्रमाणे असेल –

ओला एस१ एक्स + एक्स-शोरूम किंमत ₹८९,९९९/-
रजिष्ट्रेशन आणि रोड टॅक्स २५०/-
२ हेल्मेट (कंपलसरी) ₹१,२९९/-
इन्शुरन्स ₹७,४८०/-
फुलफीलमेंट – डॉक्युमेंट चार्जेस ₹२,८८८/-
एक्सटेंडेड वॉरंटी (ऑपशनल) ₹७,२९९/-
ओला केअर प्लस प्लॅन (ऑपशनल) ₹३,५३९/-
S1 X+ ऑन रोड किंमत ₹१,१२,७५३/-

 

ओला S1 X+ ची ऑन रोड किंमत हि डिसेंबर २०२३ या महिन्याकरिता असून तुमच्या एरिया मध्ये सध्या किती किंमत आहे हे ऑफिशिअल वेबसाईट वर चेक करू शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version