Ather New Family Scooter Launch Date जाहीर, ९० किमी टॉप स्पीड आणि ११० किमी रेंज देणारी स्कूटर, पहा स्पाय शॉट्स

Ather New Family Scooter Launch Date: अथर एनर्जी एक फॅमिली स्कूटर लॉन्च करणार असून कंपनीचे सीईओ “तरुण मेहता” यांनीही याला दुजोरा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्कूटरबद्दल..

काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकले असेल की Ather Energy फॅमिली स्कूटर लॉन्च करणार आहे. सगळ्यांनाच ही अफवा वाटली पण आता कामोफ्लॉज मध्ये गुंडाळलेल्या स्कूटरची काही छायाचित्रे समोर आली आहेत आणि तरुण मेहता यांनीही ट्विट करून याला दुजोरा दिला आहे.

बजाज चेतक आणि TVS iQube ई-स्कूटर्सची विक्री काही महिन्यांपासून वाढत आहे. जर तुम्ही बजाज चेतकच्या वाढीवर नजर टाकली तर 2000 पेक्षा कमी युनिट्स विकत होते, परंतु आज ते 8000 युनिट्स प्रति महिना पोहोचले आहे. गेल्या 10 महिन्यांत बजाजने 50000 चेतक विकले आहेत. Bajaj Chetak BLDC सुद्धा लवकरच बाजारात येणार आहे त्यामुळे विक्री अजून वाढण्याची शक्यता आहे आणि जर आपण TVS iQube बद्दल माहिती घेतली तर 4 ते 5 हजार युनिट्स प्रत्येक महिन्यात विकल्या जात होत्या पण आता जवळपास 15000 युनिट्स विकल्या जात आहेत. TVS ने 45 महिन्यांत 2 लाख iQube विकल्या आहेत आणि 22% मार्केट शेअर कॅप्चर केला आहे.

दोन्ही कंपन्या फक्त एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या जोरावर वाढत आहेत जी एक फॅमिली स्कूटर आहे ज्याचे डिझाइन पारंपारिक आहे आणि कोणत्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुष चालवू शकतात.. दुसरीकडे, एथर ही स्कूटर स्पोर्टीलुक सह येते जो फक्त तरुण पिढीलाच आवडतो.. जुनी कंपनी आणि चांगली प्रतिष्ठा असूनहीअथर चा सेल पाहिजे इतका वाढत नाही आणि लोक पारंपारिक लूकला अधिक प्राधान्य देत आहेत, त्यामुळे आता अथर ने नवीन स्कूटर लाँच करण्यासाठी चाचणी करणं सुरु केलं आहे. या येत्या नवीन अथर फॅमिली स्कूटर ची डिजाईन पारंपरिक असेल जे कुटुंबातील सर्व लोकांना आवडेल.

Ather New Family electric Scooter: स्पेसिफिकेशन्स

ather energy family electric scooter confirmed spied ahead of 2024 launch

एथरच्या आगामी फॅमिली स्कूटरच्या स्पाय शॉट्समध्ये, तुम्हाला वाहनाची काही निवडक वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसतील, ज्यात समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि 12 इंच अलॉय व्हीलसह डिस्क ब्रेक यांचा समावेश आहे. मोबाइल ठेवण्यासाठी एक छोटी जागाही यामध्ये देण्यात आली आहे. गाडीच्या फ्लोअर बोर्ड ची जागा थोडी मोठी करण्यात आली आहे, आता कदाचित त्यात सिलिंडर बसू शकेल.

समोरचा भाग बघितला तर आडवा एलईडी हेड लॅम्प दिलेला स्पष्टपणे दिसतो.. समोरची रचना पूर्णपणे बल्की आणि आकर्षक आहे.. गाडीची डिजाईन दुसऱ्या कोणत्या इलेकट्रीक स्कूटर शी जुळते आहे असे तुम्हाला वाटते का? कोणती गाडी? कृपया कमेंट मध्ये सांगा.

ather energy family electric scooter

मागचा भाग सुद्धा खूपच सुंदर आहे. इथे सुद्धा आडवा LED टेल लॅम्प दिला आहे.. मोठे स्विंग आर्म्स दिसत आहेत.. या फोटोत कोणत्या प्रकारची मोटर मिळेल हे स्पष्ट नाही पण मागच्या बाजूला ड्रम ब्रेक दिले जाऊ शकते.. पारंपारिक स्कूटर सारखी आरामदायी सीट आणि पिलियनसाठी चांगला पाठीमागचा सपोर्ट तुम्ही येथे पाहू शकता.

ग्राहक बजाज चेतक आणि TVS iQube मध्ये प्रदान केलेल्या रेंजबद्दल खूप तक्रार करतात, त्यामुळे जर अथर ला स्पर्धेत पुढे जायचे असेल तर कंपनी 2.9 kWh बॅटरी पॅकसह 90 किमी आणि 3.7 kWh बॅटरी पॅक सह 110 किमीची ऑन रोड रेंज देऊ शकते.. डैशबोर्ड पर टच स्क्रीन आणि ट्रू व्यू डिस्प्ले दोन्हीचा ऑपशन मिळू शकतो. तरुण मेहता यांनी आधीच पुष्टी केली आहे की स्कूटर स्वस्त नसली तरी ग्राहकांना नक्कीच समाधानी करेल.

Ather New electric Scooter launch date

Ather Energy 2024 च्या पहिल्या तिमाहीत Ather ची ही नवीन फॅमिली ओरिएंटेड स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटरसोबत, 450 सीरीज स्कूटर देखील अपग्रेड केल्या जाणार आहेत, म्हणजेच 450x ची रेंज आणखी वाढवली जाणार आहे. तुम्ही अथरच्या या आगामी फॅमिली स्कूटरची वाट पाहत आहात की तुम्हाला चेतक किंवा आयक्यूब सर्वोत्कृष्ट आवडते का? टिप्पण्यांमध्ये सांगा. जय महाराष्ट्र

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment