‘छोटा पॅकेज- बडा धमाका’ 300 km पेक्षा जास्त रेंज देणारी ‘स्वस्त इलेक्ट्रिक नॅनो’

Published:

Tata Nano EV: टाटा ची लोकप्रिय आणि Ratan Tata Ji’s Dream Car म्हणजेच Tata Nano Hybrid लवकरच नव्या इलेक्ट्रिक कार व्हर्जनमध्ये भेटीस येत आहे. भारतीय बाजारपेठेत केवळ एका चार्जमध्ये 300 km पेक्षा जास्तकिलो मीटरची रेंज देणारी इलेक्ट्रिक नॅनो अनेक फिचर्स आणि बजेटमध्ये बसणाऱ्या किंमतीत म्हणजे ६ लाखाच्या आत उपलब्ध होणार आहे. स्वस्त इलेक्ट्रिक कार च्या सेगमेंट मध्ये ‘टाटा नॅनो’ ही कार MG Comet EV शी बरोबरी करू शकते.

टाटा नॅनो हायब्रीड

सुरवातीला नॅनो आल्यानंतर,लोकांनी नॅनो ला ‘छोटूशी कार’ म्हणून नाकारल होत, त्यानंतर कंपनीने नॅनोच उत्पादन बंद केलं; पण नंतर जसं लोकाना छोट्या आणि कॉम्पैक्ट कारचा चांगला अनुभव यायला लागला, तसा लोकांचा नॅनोकडे कल वळायला लागला, म्हणून टाटाने नॅनोला ‘इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये’ लॉन्च करायचा विचार पक्का केला आहे. टाटाची ही छोटी नॅनो लोंग रेंज मध्ये सादर होणार आहे.

वाचा: Hero Surge: 2 इन 1 कन्व्हर्टेबल ईव्ही, इलेक्ट्रिक सर्ज एस-32 स्कूटरची बनते रिक्षा

एका चार्जमध्ये 300km ची रेंज

टाटा च्या अनेक इलेक्ट्रिक वाहनाच्या सेगमेंट मध्ये टाटाची नवीन ‘इलेक्ट्रिक कार टाटा नॅनो’ प्रगतीच्या टोकावर पोहोचवून शकणार आहे. टाटाच्या या कारमध्ये 17KW क्षमता असणारी बॅटरी पैकचा समावेश असण्याची शक्यता आहे; या इलेक्ट्रिक कारची बॅटरी उत्कृष्ट लिथियम आयन बॅटरी असू शकते, जी केवळ एका चार्जमध्ये 300 किमी अंतर पार करू शकेल. या इलेक्ट्रिक कॉम्पैक्ट कारचा टॉप स्पीड 60 ते 70 किमी प्रतितास असू शकतो.

वाचा: आजचा डिझेलचा भाव : महाराष्ट्रात डिझेलचे दर कमी झाले कि वाढले?

नॅनो ईव्ही फिचर्स

टाटा ev कारच्या फिचर्समध्ये पॉवर स्टीयरिंग, ॲडजस्टेबल स्टीयरिंग, एअर कंडिशनर, एअर क्वालिटी कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, क्रॅश सेन्सर, पार्किंग सेन्सर, क्रूझ कंट्रोल आणि चार एअरबॅग यांचा समावेश असणार आहे .

Tata Nano EV किंमत

टाटाच्या मूळ नॅनोची किंमत अतिशय किफायतदार म्हणजे फक्त १ लाख अशी होती पण नव्या टाटा इलेक्ट्रिक नॅनोच्या किंमतीची माहिती अजूनपर्यंत बाहेर पडली नसली तरी तिची प्रतिस्पर्धी MG Comet EV च्या किंमतीची बरोबरी या टाटा इव्ह सोबत होत आहे.

41.42 bhp पॉवर असणारी आणि 17.3 kWh बॅटरी कपॅसिटी असणारी एमजी कॉमेट ईव्ही ची किंमत 7.98 – 9.98 असून या टाटाच्या ईव्हीची किंमत या दरम्यान किंवा यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Nano EV - What could have been | Drive | Autocar India

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version