या स्मार्टफोन कंपनीने बनवली टेस्लापेक्षा ऍडव्हान्स कार, 800 किमी रेंज आणि 265 चे टॉपस्पीड

Xiaomi SU7 Electric Car – चिनी स्मार्टफोन निर्माता शाओमी कंपनीने ऑटो सेक्टरमध्ये पाऊल ठेवत अधिकृतपणे पहिली इलेक्ट्रिक कार SU7 लाँच केली आहे. हि गाडी एका चार्ज मध्ये ८०० किमी रेंज देणार असून २१० किलोमीटर प्रति तास स्पीड दिले जाणार आहे. शाओमी ने टेस्ला आणि पोर्शला या प्रीमियम इलेकट्रीक कार ब्रॅण्ड्सला देण्यासाठी आणि पुढील २० वर्ष्यात मेनस्ट्रीम ऑटोमेकर बनण्याची इच्छा बोलून दाखवली.

सारांश

  • Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार दोन व्हेरिएंट मध्ये लाँच केली गेली आहे: SU7 आणि SU7 Max
  • SU7 हे मॉडेल रिअर-व्हील ड्राइव्ह तर SU7 Max ऑल-व्हील-ड्राइव्ह असणार आहे
  • SU7 साठी बॅटरी निर्माण BYD द्वारे केला जाईल.

xiaomi electric car su7 side

शाओमी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने नवीन धाडसी पाऊल टाकत इलेकट्रीक कार निर्मिती क्षेत्रात एन्ट्री केली आहे. कंपनी पुढील १५ ते २० वर्ष्यात जागतिक ऑटोमोबाईल लीडर बनण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले असून टेस्ला आणि पोर्शला टक्कर देणारी “ड्रीम कार” तयार केली आहे. या ड्रीम कार ला त्यांनी SU7 हे नाव दिले असून दिसायला हि कार टेस्ला कार सारखीच आहे. हि गाडी शाओमीच्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम शेअर केली असल्याने कंपनीला आशा आहे ते जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यास यशस्वी होतील.

वाचा – मारुतीच्या या स्मार्ट हायब्रीड गाडीने घेतला पेट, रिअल-इस्टेट व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

Xiaomi SU7 Electric Car Design & Specifications

शाओमी SU7 इलेकट्रीक स्पोर्ट कार सेडान कॅटेगरी मध्ये असे, यामध्ये सर्वत्र एलईडी लाइटिंग तंत्रज्ञान दिले असेल, मागील भागावर ऍक्टिव्ह एरो विंग,कनेक्टेड सी-आकाराचे एलईडी टेललाइट्स स्टायलिश अलॉय व्हील डिझाइन, एरो डायनॅमिक डिजाईन, स्टायलिस्ट हेडलाईट सेटअप, LiDAR आणि ३६० डिग्री कॅमेरा तंत्रज्ञान हे फीचर्स गाडीत दिले जातील. केबिन मध्ये कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, चालकाला आरामदायी वाटावे असे फीचर्स या गाडीत दिले जातील. कारमधील डिस्प्ले मध्ये शाओमीची ऑपरेटिंग सिस्टिम दिली असेल ज्याने शाओमी स्मार्टफोन कारच्या इन्फोटेनमेंट युनिटशी सदैव कम्युनिकेट करत राहील.

xiaomi electric car su7 front

Xiaomi SU7 दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे ज्यामध्ये SU7 आणि SU7 Max हे दोन व्हेरिएंट्स असतील. SU7 हि रियर-व्हील ड्राइव्ह कार आहे आणि SU7 Max हे टॉप ऑफ दि लाईन ऑल-व्हील-ड्राइव्ह मॉडेल आहे.

वाचा – इलेक्ट्रिक कारचे मालक असणारे बॉलीवूड कलाकार, अभिनेता शाहरुख पडला ‘ह्या’ ईव्हीच्या प्रेमात

SU7 चे स्पेसिफिकेशन तपशील:

SU7 हे मॉडेल कंपनीचे स्मॉल रेंज एन्ट्री लेव्हल व्हेरिएंट असेल ज्यामध्ये 668 km क्लेम रेंज मिळणार आहे. या गाडीत सिंगल मोटर पाठीमागच्या साईडला दिली गेली आहे. टॉप स्पीड 210 kmph असेल तर गाडीचे एक्सीलेरेशन जबरदस्त असल्याने 0-100 kmph फक्त 5.28 सेकंदात हि गाडी गेन करेल.

SU7 मॉडेल
बॅटरी101 kWh BYD बॅटरी
ड्राइव्ह सिस्टीमरिअर व्हील
मोटर पॉवर299 PS
मोटर टॉर्क400Nm
रेंज668 km क्लेम
टॉप स्पीड210 kmph
एक्सीलेरेशन0-100 kmph फक्त 5.28 सेकंदात

 

SU7 Max चे स्पेसिफिकेशन तपशील:

SU7 Max टॉप व्हेरिएंट असून यामध्ये 475 kW क्षमतेची ड्युअल मोटर दिली जाणार आहे ज्यामुळं 0-100 kmph फक्त 2.78 सेकंदात हि गाडी अचिव्ह करेल आणि टॉप स्पीड 265 kmph इतके असेल. एका चार्ज मध्ये हे मॉडेल ८०० किलोमीटर रेंज देईल.

SU7 मॉडेल
बॅटरी101 kWh BYD बॅटरी
ड्राइव्ह सिस्टीमऑल-व्हील
मोटर475 kW
मोटर पॉवर673 PS
मोटर टॉर्क838Nm
रेंज668 km क्लेम
टॉप स्पीड265 kmph
एक्सीलेरेशन0-100 kmph फक्त 2.78 सेकंदात

शाओमी एसयू 7 – किंमत आणि लाँच

सध्या तरी शाओमी एसयू 7 या गाडीची किंमत रिव्हिल झालेली नाही परंतु चायनामध्ये हि गाडी पुढील काही महिन्यात लाँच होणार आहे. गाडी भारतात लाँच होण्यासाठी कार प्रेमींना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. गाडीचा मराठी भाषेत रिव्हिव बघण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment