इलेक्ट्रिक कारचे मालक असणारे बॉलीवूड कलाकार, अभिनेता शाहरुख पडला ‘ह्या’ ईव्हीच्या प्रेमात

आजच्या जमान्यात सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनाचा बोलबाला आहे. श्रीमंतांपासून सामान्य माणूस इंधनाच्या गाडयांपेक्षा इलेक्ट्रिक कारना, अधिक प्राधान्य देत आहेत. अश्यात बॉलीवूडच्या कलाकारांनासुद्धा इलेक्ट्रिक कार काळाची गरज आहे हे उमगले असून, काही कलाकार तर इलेक्ट्रिक कार चे मालक सुद्धा बनले आहेत. अगदी सदाबहार सौंदर्य, दिग्गज अभिनेत्री रेखा ते किंग ऑफ रोमान्स शाह रुख खान सुद्धा ‘EV’ चे चाहते आहेत. खालील यादीत इलेक्ट्रिक कारचे मालक असणारे लोकप्रिय बॉलीवूड कलाकार आहेत.

रेखा- बीएमडब्ल्यू आयएक्स

560km ची रेंज देणारी बीएमडब्ल्यू आयएक्स ची किंमत  किंमत 2.03 कोटी ते 2.50 कोटी रुपये आहे. नुकतेच ऑक्साईड ग्रे मेटॅलिकरंगामधली बीएमडब्ल्यू आयएक्स एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाने खरेदी केली आहे.

शाहरुख खान- ह्युंदाई लॉनिक 5

नुकतंच शाह रुख खानच्या गाड्यांच्या ताफ्यात 5 सीटर Hyundai IONIQ 5 ची एंट्री झाली आहे. जिची किंमत 45.95 लाख रुपये इतकी आहे.

वाचा: Hero Vida V1 Pro Offer: या वर्षी गाडी घ्या पुढच्या वर्षी पैसे भरा सोबत 38,500 रुपये डिस्काउंट

रितेश देशमुख-BMW iX आणि टेस्ला मॉडेल X

अभिनेता रितेश देशमुख इलेक्ट्रिक BMW iX आणि टेस्ला मॉडेल X चा मालक असून BMW iX SUV ची किंमत 1.16 कोटी रुपये आणि  टेस्ला मॉडेल X  ज्याची किंमत 2.00 करोड इतकी आहे.

1 1

माधुरी म्हणाली- Tata Nexon EV

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि तिचे पती सुद्धा इलेक्ट्रिक चर्च चाहते आहेत, माधुरीचा अनेक गाड्यांच्या ताफ्यात Tata Nexon EV सुद्धा आहे. जिची किंमत 14.74 – 19.94 लाख इतकी आहे.

वाचा: बजाज पल्सर 1000 एफ, जी पार करते 100 Kmh अंतर फक्त 3 सेकंदात

मंदिरा बेदी- टाटा नेक्सॉन ईव्ही

फिटनेसप्रेमी मंदिरा बेदीला ईव्ही ची भुरळ पडली आहे, अनेकदा मंदिरा बेदी तिच्या इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्हीची राईड घेताना दिसून आली आहे.

जॅकलिन फर्नांडिस- बीएमडब्ल्यू आयएक्स

सिनेअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला सुद्धा गाड्यांची आवड आहे. जॅकलिन कडे सुद्धा अभिनेत्री रेखासारखी बीएमडब्ल्यू आयएक्स इलेक्ट्रिक कार आहे.

किम शर्मा- बीएमडब्ल्यू आयएक्स

टाटा नॅनो ऑटोमॅटिक कारची मालकीण किम शर्मा हि सुद्धा बीएमडब्ल्यू आयएक्स वापरकर्ती आहे.

नुसरत भरुचा-BMW iX

सिनेअभिनेत्री नुसरत भरुचाला अनेकदा एअरपोर्टवर तिच्या आवडत्या 1.21 करोड किंमतीच्या BMW iX इलेक्ट्रिक कारमध्ये प्रवास करताना पहिले आहे.

वाचा: Maruti Brezza EV एका चार्ज मध्ये ५५० किमी धावणार, स्वस्त किंमत पण फीचर्स ने असणार लोडेड

काजोल-बीएमडब्ल्यू आयएक्स

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण ला कार प्रेमी म्हणून ओळखाल जात, त्याची बायको अभिनेत्री काजोल कडे लक्झरी कार मर्सिडीज-मेबॅच GLS-क्लास असून नुकतीच काजोल बीएमडब्ल्यू आयएक्स मधून प्रवास करताना दिसून आली.

सुनील शेट्टी- एमजी कॉमेंट EV

सुनीत शेट्टी यांच्या अनेक गाड्यांच्या ताफ्यात आता एमजी कॉमेंट EV ची एंट्री झाली आहे. हमर H2 आणि लँड रोव्हर डिफेंडर SUV  सारख्या गाड्यांचा हा अभिनेता मालक आहे.

गुल पनाग- महिंद्रा झोर ग्रँड ईव्ही

नुकतेच गुल पनाग चे काही फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले ज्यात गुल तिच्या मुळशीच्या फार्महाउस वर महिंद्रा झोर ग्रँड ईव्ही 3-व्हीलर या गाडीसोबत दिसली.

सहसा काही श्रीमंत बिझनेसमन, अभिनेते- अभिनेत्री यांचा कल मोठ्या महागड्या आणि लक्झरी कार विकत घेण्याकडे असतो पण आजच्या जमान्यात वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग आणि इंधनाचा अतिवापर लक्षात घेता इलेक्ट्रिक कार खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे, शिवाय राज्य सरकारकडून काही इलेक्ट्रिक कार- मोटोरसायकल खरेदी वर सबसिडी सुद्धा मिळत आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment