Maruti Brezza EV एका चार्ज मध्ये ५५० किमी धावणार, स्वस्त किंमत पण फीचर्स ने असणार लोडेड

Maruti Suzuki Brezza EV: भारतीय मार्केट लाखों गाड्या दार महिन्याला विक्री करून नंबर १ पोजीशनवर असणारी मारुति सुझुकी इंडियाने त्यांच्या आगामी इलेकट्रीक चारचाकी वाहन लाँच करणार असल्याची अधिकृत घोषणा केली असून या गाडीचे नाव जाहीर करणे बाकी आहे. सध्या मार्केट मध्ये असणाऱ्या अफवा आणि तज्ज्ञांचे अंदाज यानुसार हि आगामी इलेकट्रीक वेहिकल “ब्रेझा” असल्याचे बोलले जात आहे. याचे मुख्य कारण या गाडीची डिजाईन हि संपूर्णपणे ब्रेझा सारखी असून एका चार्ज मध्ये ५५० किलोमीटर अंतर पार करता येणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला या आगामी मारुती ब्रेझा ईव्ही चा विडिओ, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, अनुमानित किंमत आणि डिजाईन ची माहिती देणार आहोत.

बेझ्झा ईव्हीचे काय आहे कोडनेम?

सध्या भारतीय मार्केट मध्ये टाटा मोटर्सचा ७२ टक्के शेअर असून २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ३४ हजार इलेकट्रीक वाहन विकली आहेत. टाटा मोटर्सच्या इलेकट्रीक वाहनांची वाढती मागणी आणि एकंदरीत भारतातील ईव्ही ची वाढती विक्री यामुळे अनेक कंपन्या आपली इलेकट्रीक वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. देशातील अग्रगण्य ऑटो मेकर मारुती सुझुकी सुद्धा यामध्ये मागे नाहीये. कंपनीने नुकतेच “eVX” कोडनेम असलेल्या ब्रेझ्झा ईव्हीला ऑटो एक्स्पो मध्ये शोकेस केले आहे.

वाचा – एका चार्जमध्ये फिरा 400 किमी, बेस्ट ५ कार ज्या गाठतात लांबचा पल्ला

Maruti Brezza EV Design & Specifications Features

maruti brezza ev 2024

ब्रेझ्झा ईवी म्हणजेच eVX सध्याच्या पेट्रोल व्हेरिएंट पेक्षा दिसायला अगदी वेगळी असणार आहे. ई-ब्रेझ्झा हि ICE प्रमाणेच बॉक्सी असणार आहे परंतु डिजाईन पॅटर्न आणि प्रेजेंट हा फेंटुरिस्टिक आणि शार्प असणार आहे. चांगली रेंज मिळावी यासाठी गाडीला अरोडायनॅमिक बनवले जाणार आहे. डिजाईन मध्ये उतरती रूफ डिजाईन, समोरचे आकर्षक एलईडी DRLs आणि लाइट्स, बोल्ड डिजाईन सह मोठी १७ इंच चाकं, बूमरँग आकाराच्या फॉग लाईट्स, फ्लश डोर हैंडल, कनेक्टेड टेल लॅम्प्स, कॉम्पैक्ट रियर विंडशील्ड आणि चार हि बाजूने बॉडी कॅलॅडींग असे बदल केले जातील. या इलेकट्रीक गाडीमध्ये ADAS, कनेक्टेड कार टेक्नोलोंजि आणि 4×4 फिचर सह मार्केट मध्ये उतरवली जाणार आहे.

गाडीच्या इंटेरिअर मध्ये फेंटुरिस्टिक इलेक्ट्रिक वाहन वाटावे यासाठी स्टाइलिश केबिन, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, आरामदायी कुशन असणारी व्हेंटिलेटेड सीट्स, उत्तम डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असे फीचर्स लोड केले जातील. पाठीमागे दोन अडल्ट आणि एक चाईल्ड बसण्यासाठी आरामदायी सीट्स असतील आणि मानेला हेड रेस्ट दिले जातील. पुढे ड्रायवर आणि फ्रंट पॅसिंजरसाठी सुद्धा अडजस्टेबल उत्तम सीट्स दिले जाणार आहेत. भविष्यात गाडीचा मराठी भाषेत रिव्हिव बघण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

वाचा –फेम २ सबसिडी बंद? १ जानेवारी पासून इलेक्ट्रिक स्कूटर महागणार

eVX या आगामी ब्रेझ्झा चे डायमेन्शन्स पुढील परिमाणे असतील –

Maruti Suzuki Brezza eVX Dimensions
LENGHT4300 mm
WIDTH1800 mm
HEIGHT1600 mm

सेफटी फीचर्स

eVX सेफटी फीचर्स मध्ये सुद्धा मागे नसणार आहे. या गाडीत ६ एअर बॅग्स स्टॅंडर्ड असतील यासोबत ABS, EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), 360डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टिम (TPMS), स्पीड लिमीटर, क्रूझ कंट्रोल, ड्रायवर अटेन्शन मॉनेटरिंग यांसारखे सेफटी फीचर्स दिले जातील ज्याने सुरक्षित प्रवास करता येईल.

वाचा – अथर ई-स्कूटर मालकाला मिळणार टाटा नेक्सन ईव्ही वर ३ लाखांचा डिस्काउंट

मारुती सुझुकी ब्रेझ्झा ईव्ही मोटर, बॅटरी, रेंज

ब्रेझ्झा ईव्ही मध्ये 60 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाणार आहे ज्यामुळे कंपनीने ५५० किलोमीटर सिंगल चार्ज रेंज क्लेम केली आहे. गाडीमध्ये 4×4 ऑपशन दिला जाणार असल्याने डुअल-मोटर सेटअप दिला जाईल ज्यामुळे 200 bhp पॉवर जनरेट होईल. जबरदस्त पॉवर आणि तुफान वेग यामुळे हि इलेकट्रीक ब्रेझ्झा चालकाला स्पोर्ट कारचा अनुभव देण्यास सक्षम असेल.

ब्रेझ्झा ईव्ही लाँच तारीख आणि किंमत

eVX या ब्रेझ्झा ईव्ही ची किंमत कंपनीने अधिकृत रित्या जाहीर केलेली नाही, परंतु मार्केटच्या अभ्यासानुसार मारुती नेहमीच मिडल क्लास फॅमिलीचे बजेट समजून त्या बजेट मध्ये गाडी लाँच करत असते. अनुमाना नुसार या गाडीची एक्स-शोरूम किंमत २० लाख ते २५ लाख रुपये असेल. eVX चे प्री प्रोडक्शन मॉडेल २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सादर केले जाऊ शकते आणि प्रोडक्शन मॉडेल 2025 च्या सुरुवातीला भारतीय बाजारात येणार आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment