अथर ई-स्कूटर मालकाला मिळणार टाटा नेक्सन ईव्ही वर ३ लाखांचा डिस्काउंट

Ajinkya Sidwadkar

टाटा मोटर्स आणि अथर एनर्जी या दोन ऑटो मेकर्स ने हात मिळवणी करून ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंट सुरु केला आहे. जर तुमच्याकडे अथर ४५० या सिरीजची गाडी असेल तर टाटा नेक्सन ईव्ही घेण्यासाठी तुम्हाला आरामात ३ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. काय आहे हि नवीन ऑफर चला जाणून घेऊया आजच्या या लेखात.

काय आहे अथर इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी नेक्सन ईव्ही डिस्काउंट ऑफर?

जर तुम्ही अथर कंपनीची ४५० एक्स किंवा ४५० एस खरेदी केली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ई-मेल ऍड्रेस रजिस्टर केला असेल. त्या मेल आयडी वर तुम्हाला प्रमोशन सेक्शन मध्ये अथर कंपनीचा एक ईमेल प्राप्त झाला असेल. या प्राप्त झालेल्या ई-मेल नुसार अथर कम्युनिटी साठी टाटा मोटर्स च्या लोकप्रिय इलेकट्रीक एसयूव्ही वर तब्ब्ल ३ लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. नुसताच डिस्काउंट नाही तर त्यासोबत एक्सचेन्ज बेनिफिट आणि आकर्षक emi ऑफर देखील लागू केली जाणार आहे.

Screenshot 20231222 120107 Gmail

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात हि डिस्काउंट ऑफर बदलू शकते त्यामुळे तुम्हाला मिळालेली एक्साक्ट ऑफर बघण्यासाठी कृपया तुमचा ई-मेल ऍड्रेस तपासा किंवा तुम्हाला नक्की किती डिस्काउंट मिळणार हे जाणून घेण्यासाठी [email protected] या ई-मेल आयडीला मेल करा आणि तुम्हला मिळाली ऑफर जाणून घ्या.

वाचा – Ather 450 Apex Booking Start, जाणून घ्या फीचर्स, लाँच आणि डिलिवरी Date

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment