Ather 450 Apex Booking Start, जाणून घ्या फीचर्स, लाँच आणि डिलिवरी Date

Ather 450 Apex Booking started: अथर एनर्जीची ४५० अपेक्स हि नव्या जनरेशांच्या गाडीची बुकिंग सुरु झाली असून ऑफिशिअल वेबसाईट वर कंपनीने बुकिंगचा ऑपशन खुला केला आहे. याच सोबत कंपनीने गाडीची काही खास फीचर्स सुद्धा दाखवली असून या गाडीत काय काय खास मिळणार आहे याचा अंदाज आम्ही लावला असून तुम्ही या लेखात संपूर्ण माहिती वाचू शकता.

Ather 450 Apex Booking start

मागील महिन्यात अथर ने त्यांची फॅमिली स्कूटर लाँच होणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता आणि त्यासोबतच वर्तमान ४५० सिरीज मध्ये सुद्धा अँटेड मिळणार असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे सर्वात प्रथम कंपनी अथर ४५० अपेक्स हे मॉडेल लाँच करत असून आणेवारी २०२४ मध्ये गाडीचे अनावरण केले जाणार आहे.

अथर एनर्जी तर्फे सर्व ग्राहकांना अपेक्स संदर्भात व्हाट्सअँप मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली असून गाडीचे हायलाईटेड फीचर्स सुद्धा रिव्हिल केले आहेत. कंपनीच्या मेसेज नुसार Ather Apex जानेवारी २०२४ मध्ये लाँच होणार असून गाडीची डिलिव्हरी मार्च २०२४ मध्ये सुरु केली जाणार आहे. या गाडीमध्ये सध्याच्या अथर ४५० एक्स पेक्षा अधिक फीचर्स आणि अपग्रेडेड परफॉर्मन्स मिळणार आहे.

ather apex translucent

अथर 450 अपेक्स फीचर्स & डिजाईन

अथर 450 अपेक्स मध्ये कंपनीने डिजाईन वाईस बदल केलेलं नाहीत परंतु कंपनीने गाडीच्या कलर आणि ग्राफिक्स मध्ये बदलावं आणि अपग्रेड केले आहेत. अपेक्स मध्ये गाडीचा पाठीमागचा पॅनेल translucent (पारदर्शक) दिला आहे, या व्यतिरिक्त ग्राफिक्स स्टिकर्स हे विंग पॅनेल वर आडवे दिले आहेत. गाडीच्या हेड वाइजर मध्ये सुद्धा ट्रान्सपर्यंत पॅनेल दिला आहे. translucent पॅनेल व्यतिरिक्त गाडीच्या पेर्फोर्मन्सला देखील अपग्रेड केले आहे. नॉर्मल ४५० एक्स मध्ये टॉप स्पीड ९० किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि यामध्ये सर्वोच्च राईड मोड warp आहे पण अपेक्स मध्ये कंपनीने टॉप स्पीड १००+ किलोमीटर प्रति तास केले असून Warp + हा रायडींग मोड ऍड केला आहे. गाडीची रेंज सुद्धा वाढवण्यात येईल पण त्याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नाही. अपेक्स ची एक्स-शोरूम किंमत ₹१,६०,०००/- रुपये असण्याची शक्यता आहे.

वाचा – Honda Activa Electric : होंडाने सादर केली नवीन ऍक्टिवा इलेक्ट्रिक ई-स्कूटर, पाहा डिटेल्स

अथर अपेक्स बुकिंग कशी करावी?

ather apex booking form

Ather Apex Booking करण्यासाठी अथर ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊन अपेक्स सेक्शनवर जावे. “Book 450 Apex” या टॅब वर क्लिक करून तुमचे नाव, राज्य, शहर, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी टाकून ₹ 2500 चे रिफंडेबल पेमेंट करावे. यानंतर बाकीच्या फॉर्मॅलिटीज साठी कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.

नोट – गाडी बुक करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईटचाच उपयोग करावा अन्यथा तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment