एका चार्जमध्ये फिरा 400 किमी, बेस्ट ५ कार ज्या गाठतात लांबचा पल्ला

तुम्हीसुद्धा वर्षा अखेरीस इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करत आहात का? मग हीचं ती वेळ आहे, योग्य इलेव्हट्रिक कार खरेदी करण्याची, त्याचं कारण नवीन वर्षात वाहनाची वाढणारी किंमत आणि 2023 ची वर्षाअखेरीची कारची माहिती .

पेट्रोल-डिझेल च्या वाहनविक्रीच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्यांना विशेष प्राधान्य मिळतं आहे म्हणूनच इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री जास्त प्रमाणात होत आहे. 2023 च्या वर्षाअखेरीमध्ये  टाटा, महिंद्रा, एमजी, ह्युदाई आणि बीवायडी यांसारख्या कंपन्यांच्या 5 इलेक्ट्रिक कार ची माहिती देत आहे, ज्या एका चार्जमध्ये 400 किलोमीटर पेक्षा अधिक रेंज मिळवून देतात.

टाटा नेक्सॉन ईव्ही लाँग रेंज

टाटा नेक्सॉन ईव्ही लाँग रेंजभारतामध्ये टाटाची सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन इव्ही जी एका चार्जमध्ये कमाल रेंज देते,या गाडीला नुकतच फेसलिफ्ट मिळाल असून अत्याधुनिक फिचर्स मुळे गाडीला अधिक लोकप्रियता मिळत आहे. या गाडीची इस्टिमेट रेंज 437 किलोमीटर आहे. या गाडीची किंमत रु. 8.10 – 15.50 लाख इतकी आहे.

बीवायडी एटो 3 ईव्ही

बीवायडी एटो 3

अत्याधुनिक फिचर्सने भरपूर आणि बेस्ट इलेक्ट्रिक मिड साईज SUV म्हणून ओळखली जाणारी BYD अटो ही Rs. 33.99 – 34.49 लाख या किंमतीमध्ये मिळते. 5 सीटर प्रवाश्याना बसण्याची क्षमता असणारी ही कार एका चार्जमध्ये 521 किमी इतकी रेंज देते.

महिंद्रा XUV400 ईव्ही

महिंद्रा XUV400 EV

5 सीटर XUV एका चार्जमध्ये 456 किलोमीटर इतकी रेंज देते. महिंद्रा XUV400 EV ची किंमत 15.99 लाख रुपयांपासून ते 19.39 लाख रुपये आहे.

वाचा: फेम २ सबसिडी बंद? १ जानेवारी पासून इलेक्ट्रिक स्कूटर महागणार

MG ZS EV

2023 MG ZS EV

साधारण 22.9 lakhs – ₹25.9 लाखापर्यंत किमतीची ही इलेक्ट्रिक कार स्पोर्ट यूटिलिटी वेहिकल या प्रकारात मोडते. ही गाडी एका चार्जमध्ये जवळपास 461 किमी अंतर पार पाडते, जर तुम्ही स्पोर्ट्कार च्या शोधात असाल तर MG ची स्पोर्ट यूटिलिटी कार तुमचीसाठी योग्य आहे.

वाचा: अचानक महिंद्रा थारने घेतले चक्क पाण्यातल्या बोटीचे रुप, हिमाचल प्रदेशातला वाहतूक कोंडीवर जीवघेणा उपाय

ह्युदाई कोना इलेक्ट्रिक SUV

ह्युदाई कोना इलेक्ट्रिक SUV

₹23.8 लाख किंमतीपासून सुरु होणारी ही ह्युदाई कोना कार कार स्पोर्ट यूटिलिटी वेहिकल या प्रकारात मोडते. एका चार्जमध्ये ही कार जवळपास 452 km इतकं अंतर पार पाडते. या गाडीची प्रवासी बसण्याची क्षमता 5 जणाची आहे. ह्युंदाईच्या स्पोर्ट्स प्रकारातून ह्युदाई कोना इलेक्ट्रिक SUV ही गाडी अत्यंत चांगला पर्याय आहे.

वाचा: टाटा हॅरिअर आणि सफारी ठरल्या भारतातील सर्वात सुरक्षित कार,कार क्रॅश टेस्ट मध्ये टाटाच्या गाडयांना 5 स्टार रेटिंग

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment