टाटा हॅरिअर आणि सफारी ठरल्या भारतातील सर्वात सुरक्षित कार,कार क्रॅश टेस्ट मध्ये टाटाच्या गाडयांना 5 स्टार रेटिंग

देशातील पहिली कार क्रॅश चाचणी एजन्सी Bharat NCAP, मधल्या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) मध्ये टाटाच्या काही कार्सच्या चाचण्या घेण्यात आल्या. याद्वारे टाटाच्या टाटा हॅरिअर आणि टाटा सफारीच्या सुरक्षितेची चाचणी करण्यात आली सोबत याचे निकालसुद्धा जाहीर करण्यात आले.

क्रॅश टेस्टिंग

कशी होते कार क्रॅश टेस्टिंग?

भारत एनसीएपी हि वाहनांच्या सुरक्षिततेची चाचणी घेणारा प्रोग्राम असून याद्वारे प्रवाशांसाठी सुरक्षितता रेटिंग ठरवले जाते. यामध्ये प्रोग्राम मध्ये  साईड इम्पॅक्ट आणि फ्रंट ऑफसेट क्रॅश टेस्ट करण्यासाठी गाडीमध्ये काही डमी प्रवाश्यांना गाडीमध्ये बसवलं जातं, ज्यामध्ये डमी प्रौढ आणि बालक याना ठेवलं जात,एक्सटीरियर आणि इंटीरियर ची क्रॅश टेस्ट करताना कारचा स्पीड 64 किमी प्रतितास इतका असतो , फ्रंट ऑफसेट टेस्टिंगसाठी गाडीचा स्पीड 64 किमी प्रतितास, पोल साईड इम्पॅकसाठी 29 किमी प्रतितास आणि साईड इम्पॅक्ट टेस्टिंगसाठी 50 किमी स्पीड इतका असावा लागतो आणि अश्या स्पीडमध्येच गाडी समोर असणाऱ्या बॅरियवर आदळली जाते. 

हॅरियर आणि सफारीचे सुरक्षा रेटिंग

टाटा मोटर्सच्या(Car)च्या गाड्यांची ओळख हि तिच्या दणकटपणा आणि सुरक्षितेसाठी असून नुकत्याच भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat- NCAP) मध्ये नवीन सफारी आणि हॅरियर ची चाचणी करण्यात आली आणि या भारत एनसीएपीकडून 5 स्टार रेटिंग मिळविणाऱ्या पहिल्या कार आहेत.ह्या चाचणीचा निकाल संपूर्ण सुरक्षा सोबत अडल्ट आणि चाईल्ड प्रोटेक्शन पाहून ठरवण्यात आला आहे. टाटा एसयूव्ही हि क्रॅश टेस्ट सर्टिफिकेशन अंतर्गत चाचणी घेण्यात येणारी ही पहिली कार आहे.

वाचा: अथर ई-स्कूटर मालकाला मिळणार टाटा नेक्सन ईव्ही वर ३ लाखांचा डिस्काउंट

हॅरियर आणि सफारीची संपूर्ण क्रॅश टेस्ट करताना दोन्ही SUV ने 49 पैकी 45 गुण मिळवत डोके, छाती, पोट आणि नितंब यांना चांगले संरक्षण दिले, या गाड्यांची साइड पोल इम्पॅक्ट टेस्टमध्ये, सहा एअरबॅग असलेल्या दोन्ही SUV ने नितंबांना चांगले संरक्षण, छातीला किरकोळ संरक्षण आणि पोटाला पुरेसे संरक्षण दिले. या टेस्टमध्ये चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टम (Child restraint system) मध्ये 12 मिळवले आहेत, ज्यात साधारण 18 महिने आणि 3 वर्षाच्या बालकांचे डमी आय-साईज अँकरेज आणि सपोर्ट लेग्स वापरून बसविण्यात आले होते, ह्या डमी ची बसण्याची दिशा उलटी होती.

टाटाच्या नवीन सफारी आणि हॅरियर सोबतच नेक्सॉन आणि पंच या गाड्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आणि या चाचणीत दोन्ही गाडयांना 5 स्टार मिळाले आहेत.

वाचा: जुनी थार विसरा आता येणार पॉवरफूल महिंद्रा थार 5-डोअर, लवकरच होणार लाँच – हे आहेत फीचर्स

नवीन सफारी आणि हॅरियर चे सेफ्टी फिचर्स

कारच्या सुरक्षितते साठी प्रसिद्ध असणारी टाटा ह्या कंपनीने काही सेफटी फीचर्स दिले आहेत ज्याच्या मदतीने टाटाने नवीन सफारी आणि हॅरियर च्या सेफ्टी रेटिंगसाठी अव्वल नंबर मिळवला आहे,

  •  6 एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण
  • सर्व रो- 3 पॉइंट सीट बेल्ट
  • सीट बेल्ट रिमाइंडर
  • आयसोफिक्स टिथर्स
  • रिट्रॅक्टर्ससह सीट बेल्ट
  • प्रीटेन्शनर्स
  • लोड लिमिटर
  • अँकर प्रीटेन्शनर

SUV टाटा सफारी आणि  SUV हॅरियर ह्या दोन्हीसाठी सध्याच्या घडीला केवळ डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध आहे. 15.49 लाखांपासून सुरु होणाऱ्या 5 सीटर SUV हॅरियरची किंमत 26.44 लाखापर्यंत संपते. तर 7 सीटर SUV Tata Safari ची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख असून हि किंमत 27.34 लाख रुपयांपर्यंत संपते.

 
टाटा हॅरियर आणि सफारी एकच आहे का?

टाटा हॅरियरच्या तुलनेत टाटा सफारी थोडी मोठी आहे. दोन्हींमधील सामान घटक म्हणजे कनेक्टेड LED DRL आहेत.

 
हॅरियर सफारीपेक्षा महाग आहे का?

 
हॅरियरची किंमत ₹15.49 लाख ते ₹26.44 लाखांपर्यंत आहे, टाटा सफारीची किंमत ₹16.19 लाख ते ₹27.34 लाखांपर्यंत आहे.

 
टाटा सफारी 5 की 7 सीटर आहे?

 
16.19 – 27.34 लाख रु किमतीची टाटा सफारी ही 7 सीटर एसयूव्ही आहे.

 
टाटा सफारी खरेदी करणे योग्य आहे का?

सेफटी आणि इतर वैशिष्टय पाहता टाटा मॉडेल सफारीमध्ये एक उत्तम दर्जाची आणि आकर्षित करणारी 7-सीटर SUV आहे. जी खरेदी करण्यास योग्य आहे.

टाटा सफारीची किंमत आहे का?

15.8-22.7 लाख

2024 मध्ये टाटा सफारी खरेदी करणे योग्य आहे का?

इंटिरियर डिझाईन , एक्सट्रेरिअर लुक , केबिन वैशिष्ट्ये आणि सेफटी ह्या गोष्टी पाहता 2024 वर्षी विकत घेणे योग्य आहे.

टाटा सफारी डार्कची किंमत किती आहे?

टाटा सफारी डार्क एडिशन (Tata Safari Dark Edition) ची किंमत ₹ 19.98 लाख इतकी आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment