महिंद्रा थारने घेतले चक्क पाण्यातल्या बोटीचे रुप, हिमाचल प्रदेशातला वाहतूक कोंडीवर जीवघेणा उपाय

हिमाचल प्रदेश या यंदा निसर्गापेक्षा तिथल्या ट्रॅफिकमुळे चर्चेत आलं आहे आणि त्यापेक्षा चर्चा रंगली आहे ती म्हणजे महिंद्रा थारच्या अनोख्या कृत्याची ज्यामध्ये या SUV गाडी चालकाने वाहतूक कोंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी चक्क महिंद्रा थारची होडी करत ही गाडी नदीमध्ये उतरवून स्वतःसाठी मार्ग तयार केला.

महिंद्रा थारच्या चालकाने थार SUV उतरवली नदीत

थार SUV

डिसेंबर महिना म्हणलं की सुट्टी आणि प्रवास पर्यटकांचा सोयीचा काळ, आणि यंदाच्या वर्षात बऱ्याच पर्यटकांची ओढ हिमाचल कुल्लू मनाली च्या दिशेने होते. तिथल्या स्थळांमुळे ह्या प्रदेशांची नेहमी चर्चा होत राहिली पण आता ह्यावर्षी मात्र ह्या स्थळापेक्षा तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेला उधाण आलेय. ह्या नाताळ आणि नवीन वर्षाच अवचित्य साधून बऱ्याच जानाणा मोठी चूक केली असच वाटलं असणार आहे कारण, हिमाचल प्रदेशच्या लाहोलर-स्पिती वैलीची निसर्ग रम्य ठिकाणे अनुभवण्यासाठी पीक सिझनमधल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे चक्क या ठिकाणी सलग तीन दिवसात जवळजवळ ५५,००० च्या वर वाहनाची गर्दी होऊन वाहनवाहतूक बसल्या ठिकाणी ठप्प झाली. लाहौल ते मनाली मार्ग संपूर्ण वाहनांनी भरुन जवळपास तीन दिवस गाड्यांचा जागेवरूंसुद्धा हलण्याची सोय राहिली नव्हती आणि ह्याच वाहतूक कोंडीमध्ये महिंद्राची थारसुद्धा बराच वेळ अडकून राहिली होती. गाडी पुढे अथवा मागे जायला मार्ग नाही आणि वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या पाहून चक्क ह्या थार चालकाने ही suv मनालीच्या रस्त्यावरून चक्क चंद्रा नदीच्या पात्राकडे वळवली, आणि ट्राफिकला बाय बाय म्हणता स्वतःचा ट्रॅफिकफ्री पण जीवघेणा मार्ग तयार केला ज्यामुळे ह्या वाहनचालकानं वाहतूक अधिकाऱ्यांकडून मोटर वाहन कायद्या अंतर्गत चलन सुद्धा ठोठावण्यात आले.

वाचा: किआ कार्निवलच्या बोल्ड लूकवर लोक झाले फिदा, जाणून घ्या एसयूव्हीची खास वैशिष्टय

ह्या SUV कार चालकांचा पर्यटकांनी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला काहींनी ह्याचे कौतुक केले पण काहीना ही जीवघेणी राईड अजिबात आवडली नाही आणि ह्यावर टीका केल्या, पण जेव्हा हिमाचल प्रदेशमधल्या पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मात्र तत्काळ घटनास्तळी पोलिसांनी जाऊन कार चालकाला कायद्याची माहिती देत मोटर वाहन कायदा १९८८ अंतर्गत चलन कापले. बाकी पर्यटकांना पोलिसांनी वाहतूक वाहतूक नियम पालन करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. भविष्यात असा थरारक अनुभव न येण्यासाठी हिमाचल प्रदेशातील अश्या पर्यटक भागात पोलीस तुकडी तैनात करण्यात येत आहेत.

वाचा: टाटा हॅरिअर आणि सफारी ठरल्या भारतातील सर्वात सुरक्षित कार,कार क्रॅश टेस्ट मध्ये टाटाच्या गाडयांना 5 स्टार रेटिंग

 

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment