किआ कार्निवलच्या बोल्ड लूकवर लोक झाले फिदा, जाणून घ्या एसयूव्हीची खास वैशिष्टय

Aishwarya Potdar

2024 च्या नवीन वर्षात बऱ्याच गाड्या लॉन्च होत आहेत, पण ह्या लाँचिंग चढाओढीत किया ‘द न्यू कार्निव्हल’ च्या किलर लूकची चर्चा होतेय. टोयोटा वेलफायर आणि टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची प्रतिस्पर्धी Kia Carnival Facelift नुकतंच स्पाय टेस्टिंग करताना क्लीक झालं आहे. ह्या स्पायशॉट्समध्ये कार्निव्हलची चौथी पिढी ऐटीत जात असताना, सुधारित एक्सटेरिअर डिझाईनच्या बाबतीत काही बदल दिसून आले आहेत.

facelifted kia carnival

‘या’ डिझाईनमुळे फेसलिफ्ट किया कार्निव्हल झालीये बोल्ड

सध्या कियाच्या तिसऱ्या जनरेशन चे मॉडेल रस्त्यावर धावत असताना, कियाच्या चौथ्या जेनेरेशन च टेस्टिंग होताना बघायला मिळालं. 2024 च्या जानेवारीमध्ये लॉन्च होणाऱ्या कियामध्ये कमालीचे फेसलिफ्ट दिसून आले, उभे लांब एलईडी हेडलाइट्स, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स,मोठे टायगर-नोज ग्रिल, नव्याने डिझाइन केलेले बंपर सोबत भक्कम फॅसिआ आणि मोठ्या एलईडी डीआरएलने कियाच्या गाडीचा लुक बोल्ड झाला आहे. गाडीच्या मागच्या बाजूस मागील बाजूस सुधारित टेलगेटसह कनेक्टेड LED टेल लाइट्स दिलेले आहेत. किआ कार्निवल फेसलिफ्ट गाडीमध्ये ड्युएल 10.2-इंचाची वळलेली स्क्रीन आणि किंचित नव्याने डिझाईन केलेले AC व्हेंट्स सोबत क्लायमेट कंट्रोल पॅनल मिळाले आहेत.

वाचा: टाटा हॅरिअर आणि सफारी ठरल्या भारतातील सर्वात सुरक्षित कार,कार क्रॅश टेस्ट मध्ये टाटाच्या गाडयांना 5 स्टार रेटिंग

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

डोळयात भरणारे फ्रंट रेडिएटर ग्रिल आणि  बाजूच्या सिल क्रोम गार्निश उठून दिसतात. विलक्षण फॉग लॅम्प्स, टर्न सिग्नल्स, रिव्हर्सिंग लाइट्स या गाडीत मिळत आहेत. कियाच्या नव्या लूकमध्ये सर्वात जास्त स्किड प्लेट, लोअर डोअर मोल्डिंग, सी-पिलर गार्निश, लोअर रेडिएटर ग्रिल मोल्डिंग, रूफ रॅक आणि बाहेरील मिरर कव्हर्स याचे रंग भाव खाऊन गेले आहेत. अलॉय व्हील्समध्ये मात्र जास्त काही बदल दिसून आले नाहीयेत. किया कार्निव्हल च्या चाकांची रचना किआच्या ईव्ही मॉडेल्सशी सामान असल्याची जाणीव करून देते. स्टेअरिंग व्हील सोबत सेंटर कंसोल हे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या चौथ्या जनरेशनच्या मॉडेलप्रमाणेच देण्यात आले आहे.

किआ कार्निवल फेसलिफ्ट: पॉवरट्रेन अपेक्षा

इंजिनच्या बाबतीत माहिती देता, या गाडीमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिनसह येऊ शकते, जे 197 bhp पॉवर आणि 440Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याचीही शक्यता आहे. यात 10.2 इंच ड्युअल स्क्रीन, अपडेटेड एसी व्हेंट, क्लायमेट कंट्रोल पॅनल यांसारखी वैशिष्ट्ये असतील. यात 4 लोकांसाठी बसण्याची जागा असेल.

वाचा: जुनी थार विसरा आता येणार पॉवरफूल महिंद्रा थार 5-डोअर, लवकरच होणार लाँच – हे आहेत फीचर्स

Kia कारमधून ऑफर केली जाणारी फाईव्ह स्टार लक्झरी आणि फीचर्स लक्षात घेऊन नवीन जनरेशन किया कार्निव्हलची किंमत अंदाजे 40 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता मांडली जातेय. किआ कार्निवलच्या चौथ्या जनरेशन नवीन फॅशियाची टक्कर भारतातल्या बाजारपेठेत टोयोटा वेलफायर आणि टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी होतेय. 

लोकांना पडलेले प्रश्न

Kia कार कोणता देश बनवतो?

किया कार्स चा जन्म येओंगदेउंगपो-गु, सोल, दक्षिण कोरिया येथे झाला.

किया कार्निवलचे मायलेज किती आहे?

3.9 kmpl 

किया कार्निवलची किंमत किती आहे? 

रु. 35.48 लाख

किया कार्निवल भारतात उपलब्ध आहे का?

तीन सुंदर रंगामध्ये उपलब्ध असणारी Kia एप्रिल 2024 मध्ये 7 सीटर SUV कार म्हणून लॉन्च होत आहे.

 Kia कार टॉप मॉडेलचा दर किती आहे?

कियाच्या कारची किंमत 8.00 लाख पासून सुरु होते, Kia Sonet किंमत रु. 7.79 लाख आहे तर Kia Seltos किंमत रु. 10.90 लाख इतकी आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मी कोल्हापुरी मुलगी असून नागपूर येथून हॉटेल मॅनेजमेंट डिग्री पूर्ण केली आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याबद्दल लिहायला आवडते.

Leave a Comment