फेम २ सबसिडी बंद? १ जानेवारी पासून इलेक्ट्रिक स्कूटर महागणार

द टाइम्स ऑफ इंडिया (टीओआई) ने लिहिलेल्या एका रिपोर्ट नुसार केंद्र सरकार दोन चाकी इलेकट्रीक वाहनांवरील फेम सबसिडी बंद करण्याच्या तयारीत असून चार चाकी आणि तीन चाकी इलेकट्रीक वाहनांना फेम सबसिडी चा लाभ घेता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नववर्ष्यात दुचाकी इलेकट्रीक वाहन खरेदी कारण महाग होणार असल्याचे समजते. या लेखात आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत.

फेम सबसिडी काय आहे?

इलेकट्रीक आणि हायब्रीड वाहन उद्योगाला चालना मिळावी आणि भारताची झिरो इमिशन या उपक्रमाकडे वाटचाल व्हावी याकरिता केंद्र सरकारने फेम म्हणजे Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles हि योजना २०१५ साला पासून संपूर्ण भारतभर राबवण्यास सुरु केली. या योजनेचा पहिला टप्पा २०१५ ते २०१९ पर्यंत राबविण्यात आला आणि दुसरा टप्पा म्हणजेच फेम – २ सबसिडी २०१९ मध्ये लागू करण्यात आली आणि हा टप्पा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारने फेम २ सबसिडी साठी 10,000 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. 

वाचा – अथर ई-स्कूटर मालकाला मिळणार टाटा नेक्सन ईव्ही वर ३ लाखांचा डिस्काउंट

ईव्ही विक्रीवर सबसिडी आणि विक्रीवर परिणाम

केंद्र सरकारने मागील सहा महिन्यापूर्वी इलेकट्रीक वाहनांवरील सबसिडी कमी केल्याने इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत घट झाली आहे. प्रति किलोवॅट पंधरा हजार रुपयांवरून दहा हजार रुपयेआणि प्रत्येक कंपनीच्या एक्स-फॅक्टरी किमती वर सबसिडीत घट करून ४० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आली होती. सध्या ओला, अथर, बजाज ऑटो, टीव्हीस आणि हिरो विदा या कंपन्यांच्या वाहनांवर रुपये २१ हजार ते रुपये २२ हजार सबसिडी केंद्र सरकार देत आहे त्यामुळे वाहनांच्या किमती जरी जास्त असल्या तरी लोक त्यांना खरेदी करू शकत आहेत. सध्याच्या ईव्ही विक्रीचा ग्राफ पाहिल्यास आत्ता कुठे इलेकट्रीक दुचाकी वाहनांची विक्री वाढून स्थिरावली होती पण आता सरकारने फेम सबसिडी बंद केल्यास किमती २२ हजारां पर्यंत वाढू शकतात.

वाचा – बजाज ऑटो ने बंद केली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कारण

FAME II दुचाकी ईव्ही सबसिडी समाप्ती

गेल्या आर्थिक वर्षात, FY23 मध्ये, ८ लाखांपेक्षा जास्त हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स संपूर्ण भारतात विकल्या गेल्या आहेत. भारतात दुचाकी इलेकट्रीक वाहनांच्या तुलनेत तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे अवजड उद्योग मंत्रालयाने दुचाकी वरील सबसिडी बंद करून तीन चाकी आणि चार चाकी प्रायव्हेट आणि कमर्शिअल वाहन खरेदी साठी प्रोत्साहन मिळावे यासाठी फेम २ सबसिडी दिली जाणार आहे. या सरकारच्या निर्णयामुळे सर्व कंपन्यांच्या इलेकट्रीक स्कूटर आणि बाईक्स च्या किमती २१ ते ३० हजार रुपयांनी वाढणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रालय टेस्ला सारख्या हाई-एंड इलेक्ट्रिक कार निर्मात्यांसाठी भारतात फॅक्टरी सुरु करण्यास प्रोत्साहित करण्याकरिता नवीन योजना सुरु करण्याचा विचार देखील करत आहे.  

वाचा – फक्त ९० हजारांत मिळणारी ओलाची हि इलेक्ट्रिक स्कूटर बनली होंडा ऍक्टिवाचा कर्दनकाळ, वाचा फीचर्स

काय होऊ शकते?

फेम २ सबसिडी १ जानेवारी २०२४ पासून दुचाकी इलेकट्रीक वाहनांवर सबसिडी बंद करू शकते किंवा ३१ मार्च २०२४ पासून फेम २ सबसिडीची शेवटची तारीख वाढवून या मध्ये दुरुस्ती करून टू-व्हिलर्सनां वगळून फक्त तीन चाकी किंवा चार चाकी वाहनांना सबसिडी मिळण्याची तरतूद केली जाऊ शकते.

सोर्स

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment