फक्त ९० हजारांत मिळणारी ओलाची हि इलेक्ट्रिक स्कूटर बनली होंडा ऍक्टिवाचा कर्दनकाळ, वाचा फीचर्स

ओला इलेक्ट्रिक ची OLA S1x + वर कंपनीने December to Remember ऑफर सुरु केली असून या गाडीवर तब्ब्ल २० टक्के डिस्काउंट घोषित केला आहे. पूर्वी ₹१,०९,९९९/- रुपयांमध्ये मिळणारी ओला एस१एक्स प्लस २० हजारांचा डिस्काउंट दिला असल्याने आता फक्त ₹८९,९९९/- रुपयांत मिळणार आहे.

हायलाईट

  • OLA S1x + वर डिसेंबर टू रिमेंबर ऑफर सुरु
  • ₹१,०९,९९९/- वर फ्लॅट ₹२०,०००/- डिस्काउंट
  • ९० किमी टॉपस्पीड आणि १५१ किमी रेंज

काय आहे OLA S1x + December to Remember offer?

ओला इलेकट्रीक सध्या भारतातील ई-स्कूटर उत्पादन आणि विक्री च्या बाबतीतला नंबर १ चा ब्रँड बनला असून या कंपनीने नोव्हेंबर महिन्यात तब्ब्ल ३० हजार इलेकट्रीक स्कूटर्स विकल्या आहेत. कंपनीने त्यांच्या पोर्ट फोलिओ मध्ये एक नवीन स्कूटर लाँच केली असून ही गाडी ₹८९,९९९/- रुपयांमध्ये मिळत असून कंपनीने नुकताच या गाडीवर २० टक्के डिस्काउंट घोषित केला आहे.

ola december to remember offer

ओला इलेकट्रीक कडे सध्या प्रत्येक बजेटसाठी एक इलेकट्रीक गाडी असून कंपनीने त्यांचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी अनेक बॅटरीचे पर्याय त्यामध्ये दिले आहेत. ओला एस १ प्रो जेन-२ हि कंपनीची एस १ सिरीजची सर्वात टॉप फीचर्स असणारी स्कूटर आहे तर त्याच्या खाली एस १ एअर आणि त्यानंतर एस १ एक्स हे मॉडेल आहे. सध्या एस १ एक्स या व्हेरिएंट च्या प्लस या मॉडेल मध्ये तब्ब्ल २० हजार रुपयांचा जबरदस्त डिस्काउंट कंपनी ऑफर करत आहे.

OLA S1x + या स्कूटर वर फ्लॅट डिस्काउंट सह अजून ऑफर्स कंपनीने वेबसाईट वर नमूद केल्या आहेत ज्यामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या बँक लोन वर ६.९९ टक्के व्याजदराने गाडीसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. जर ग्राहक Standard Chartered Bank, Yes Bank, Federal Bank, Onecard, IDFC, HDFC Banks या बँकांचे क्रेडिट कार्डचे ग्राहक असल्यास ईएमआय स्कीम मध्ये एक्सट्रा ५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

OLA S1x + On-Road Price in Maharashtra

ओला S1x Plus या इलेकट्रीक स्कूटरची सध्या एक्स-शोरूम किंमत रुपये ८९,९९९/- इतकी आहे यामध्ये आरटीओ चे रजिष्ट्रेशन आणि स्मार्ट कार्ड चार्जेस रुपये २५०/- ऍड होतील. या नंतर दोन हेल्मेटचे रु.१,२९९/-, इन्शुरन्स रु.७,००५/-, फुलफीलमेंट चार्जेस रु.२,८८८/- असे मिळून एकूण होतात ₹१,०१,४४४/- हि गाडीची ऑन-रोड किंमत होते. यामध्ये जर ओला केअर प्लॅन आणि बॅटरी एक्सटेंडेड प्लॅन खरेदी केला तर त्याचे चार्जेस एक्सट्रा होतात.

ola s1 x plus on road price in maharashtra

ओला एस १ एक्स प्लस – रेंज, टॉपस्पीड, स्पेफिकेशन्स, फीचर्स

ओला इलेकट्रीक कंपनीची एस १ एक्स प्लस यागाडीची डिजाईन टॉप मॉडेल एस १ प्रो प्रमाणेच असणार आहे. एक्स प्लस मध्ये सात कलर्स चे ऑपशन्स आणि ड्युअल टोन कलर्स आणि ग्राफिक्स  चा पर्याय या गाडीत उपलब्ध आहे. एक्स प्लस मध्ये ३ kWh ची लिथियम आयन बॅटरी दिली आहे यामुळे १५१ किमी सिंगल सर्टिफाईड रेंज कंपनीने क्लेम केली आहे आणि ट्रू रेंज यामध्ये १२५ किमी सिंगल चार्ज आणि इको मोड मध्ये हि गाडी प्रोव्हाइड करेल. बॅटरीला चार्ज होण्यासाठी ५०० वॅट चार्जर दिला जाणार आहे. या चार्जर सह गाडी फुल चार्ज होण्यासाठी ७ तास ४० मिनिटांचा वेळ लागतो.

एस १ एक्स प्लस मध्ये २.७ kw ची बीएलडीसी हब मोटर दिलेली आहे. हि मोटर ६ kw चा हाय पीक निर्माण करते. गाडीला ९० किमी प्रति तास इतके टॉप स्पीड दिले आहे. इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि रिवर्स असे चार रायडींग मोडस या गाडीमध्ये दिले असल्याने ग्राहक गरजे नुसार त्यांचा वापर करू शकतो.

वाचा – Honda Activa Electric Scooter जानेवारी मध्ये होणार लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

सामान वाहून नेण्यासाठी ३४ लिटरचा बूट स्टोरेज या गाडीत दिला असल्याने चार्जर आणि हेल्मेट आरामशीर कॅरी करता येते. १२ इंच स्टील व्हील रिम आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम सह पुढे आणि पाठीमागे ड्रम ब्रेक्स दिले आहेत. पुढच्या बाजूला टेलेस्कोपिक ड्युअल शॉक अब्जोबर्स आणि पाठीमागे ड्युअल स्प्रिंग सस्पेन्शन दिले आहेत. गाडीमध्ये १६० एमएम चा ग्राउंड क्लिअरन्स दिला असल्याने स्पीड ब्रेकर, खड्डे यामध्ये गाडी खाली घासणार नाही.

वाचा – इलेक्ट्रिक वाहन खरेदी करुन मिळवा 80% सबसिडी, जाणून घ्या नोंदणीसोबत संपूर्ण माहिती

डॅशबोर्ड ला ५ इंच कृष्ण धवल स्क्रीन दिलेली आहे. गाडी सुरु करण्यासाठी चावी ऐवजी पासवर्ड आणि ओला कंपेनीयन अँप च्या मध्येमातून प्रॉक्सिमिटी अनलॉक करता येते. गाडी संपूर्णपणे क्लाऊड कनेक्टेड असल्याने अनलॉक करणे, नेव्हिगेशन, प्रोफाइल ऍड करणे या फीचर्स चा लाभ घेता येतो. या गाडीचा रामपूर्ण रिव्हिव मराठी भाषेतून बघण्यासाठी आमचा युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment