Hero Vida V1 Pro Offer: या वर्षी गाडी घ्या पुढच्या वर्षी पैसे भरा सोबत 38,500 रुपये डिस्काउंट

Hero Vida V1 Pro Offer – हिरो मोटो कॉर्प च्या विदा ब्रांडची इलेक्ट्रिक स्कूटर V1 pro यावर कंपनीने नवीन जबरदस्त ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना 38,500 रुपयांचा तुरंत डिस्काउंट मिळणार असून या वर्षी गाडी घेऊन त्याचे पैसे पुढच्या वर्षी भरायचे आहेत. ही ऑफर नक्की काय आहे चला जाणून घेऊया आजच्या या लेखात.

Hero Vida V1 Pro Offer Year End Discount

vida v1 pro

हेरो मोटोकॉर्प ने भारतीय बाजारात विदा या नावाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेगळा सब ब्रँड उभा केला आहे हे तुम्हा सर्वांना ठाऊक असेलच, या कंपनीने Ather Energy मध्ये इन्वस्टमेन्ट करून नुकतीच फास्ट चार्जिंग ची सुविधा विदा ग्राहकांना मिळून दिली आहे. कंपनीने आता जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी Start riding in 2023 and pay in 2024 ऑफर सुरू केली आहे.

वाचा – फेम २ सबसिडी बंद? १ जानेवारी पासून इलेक्ट्रिक स्कूटर महागणार

Start Riding In 2023 And Pay In 2024 ऑफर काय आहे?

Screenshot 20231228 190449 Facebook e1703773529112

1 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत जर तुम्ही विदा वी1 प्रो ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तर इन्स्टंट लोन अप्रोवल मिळणार आहे. यामध्ये 0 प्रोसेसिंग फी, 5.99% व्याजदर आणि 2,429 रुपयांचा हफ्ता दिला जाणार आहे. डिसेंबर मध्ये गाडी बुक केल्या केल्या ग्राहकांना काही दिवसात मिळणार आहे आणि हफ्त 2024 मध्ये भरावयाचा आहे.

Screenshot 20231228 193413 Chrome e1703773486334

या व्यतिरिक्त तुम्हाला 38 हजारांचे बेनेफिट्स मिळणार आहेत. यामध्ये ईएमआय स्कीम मध्ये ₹7,500, एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी साठी ₹8,259, ₹6,500 रुपयांचा तुरंत कॅश डिस्काउंट, जुनी गाडी एक्सचेंज केली तर एक्स्ट्रा ₹5,000 डिस्काउंट, लोयल्टी डिस्काउंट ₹7,500, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या साठी ₹2,500 आणि ₹1,125 चे फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन असे मिळून ₹38,500 चा डिस्काउंट मिळणार आहे. गाडीची एक्स शोरुम किंमत ₹1,45,900 इतकी आहे. 

  • ₹7,500′ worth of EMI benefits
  • ₹8,259° Extended Battery Warranty
  • ₹6,500* Cash Discount
  • ₹5,000″ Exchange Bonus
  • ₹7,500″ Loyalty discount
  • ₹2,500′ Corporate Discount
  • ₹1,125 worth of Subscription Plan

Vida V1 Pro Specification & Features

Vida V1 Pro या गाडीमध्ये 3.9 kW नॉर्मल पीक असणारी PMS मोटर दिली आहे ज्यामुळे 90 किमी चा ताशी वेग मिळतो. 3.94 kWh च्या 2 काढता येण्याजोग्या बॅटरीज दिल्या आहेत. या बॅटरी पॅक मुळे 110 किमी रिअल वर्ल्ड रेंज मिळते. बॅटरी चार्ज होण्यासाठी नॉर्मल चार्जरला 5 तास 55 मिनिटे आणि फास्ट चार्जरला 1.2 किमी चार्ज साठी 1 मिनिट लागतो.

गाडीमध्ये टच स्क्रीन दिली आहे, फास्ट चार्ज ची सुविधा आहे. इको, नॉर्मल, सपोर्ट आणि 100+ कष्टमायजेशन मोड दिले आहेत.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment