हिरोची सर्वात ‘प्रीमियम बाईक’ झाली लॉन्च,जाणून घ्या मॅवरिक 440 ऑफर, फिचर्स आणि बुकिंग

Best Bike Under 2 Lakh- Hero Mavrick 440 Launch : हीरो मोटोकॉर्पची आतापर्यंतची सर्वात प्रीमियम बाईक लॉंच झाली आहे, 440cc चे दमदार इंजिन असणारी हि ‘हीरो मावरिक 440’ ही बाईक शानदार हार्ले डेव्हिडसन X440 बनवली आहे. 1.99 लाखापासून सुरु होणाऱ्या किंमतीची हि प्रीमियम बाईकची एप्रिलमध्ये डिलिव्हरी सुरु होणार आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 350,जावा 350 ,होंडा सीबी 350 आणि ट्रायम्फ स्पीड 400 च्या तोडीस तोड देणाऱ्या हीरोच्या बाईकचे व्हेरिएंट्स, किंमत आणि बुकिंग सगळी माहिती तुम्हाला खालील लेखात मिळेल.

हीरो मावरिक 440 व्हेरिएंट्स

या बाईकचे तीन व्हेरिएंट्स लॉन्च झाले आहेत, बेस, मिड आणि टॉप. या बेस व्हेरिएंट्सची किंमत 199,000/-,मिड व्हेरिएंट्सची किंमत 214,000/- आणि टॉप व्हेरिएंट्सची 224,000/- इतकी आहे. हि भारतातील एक्स-शोरूम किंमत आहे. Hero Mavrick 440 च्या तीन व्हेरिएंट्समध्ये आपल्याला पाच रंगाचे पर्याय मिळतात. त्यातल्या बेस व्हेरिएंटमध्ये व्हर्जन आर्क्टिक व्हाइटया आणि सेलेस्टियल ब्लू ,मिड व्हेरियंट मध्ये फियरलेस रेड सोबत टॉप व्हेरिएंट मध्ये फँटम ब्लॅक आणि एनिग्मा ब्लॅक मिळतात.

वाचा: ‘ही’ ईव्ही स्कूटर पेट्रोल स्कूटरपेक्षा स्वस्त, जिला मिळते सर्वात सुरक्षित बॅटरी जाणून घ्या फिचर्स, रेंज, किंमत आणि सर्व काही

मावरिक 440 इंजिन

हार्लेच्या तुलनेत या बाईकच्या इंजिनमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत, बाइकमध्ये दिलं गेलेलं इंजिन ‘TorqX’ इंजिन एअर-कूल्ड आहे. मावरिक 440 मधलं सिंगल-सिलेंडर इंजिन 440cc चे आहे जी 27hp जनरेट करत आणि टॉर्क 36Nm प्रोड्युस करत.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

हीरो मोटोकॉर्प मावरिक 440 फिचर्स

तुम्हाला राइडिंगचा सुखद आणि आरामदायक अनुभव देण्यासाठी या बाइकमध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लच , 6-स्पीड ट्रान्समिशन, 17 इंचाची चाके, आणि 0° स्टील रेडियल पॅटर्न टायर्सचा समावेश केला आहे. बाइकमध्ये 43mm टेलिस्कोपिक फोर्क देण्यात आला आहे, शिवाय बाईकचा 320mm फ्रंट आणि 240mm रिअर डिस्क ब्रेक आहे. लायटिंग सेटअप, गोल खर्च हेडलँप, डिजिटल स्पीडोमीटर ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर इंडिकेटर, eSIM-बेस्ड कनेक्टिव्हिटी ज्याच्या मदतीने रिअल-टाइम माहिती मिळते.

वाचा: इलेक्ट्रिक ड्यूकचा बोलबाला, एकदा पहाच KTM ची पहिली इलेक्ट्रिक बाइक

एखाद्या अग्रेसिव्ह रोडस्टरला आवडणाऱ्या वैशिष्ठ्यांना या बाइकमध्ये देण्यात आले आहे, बाईकमध्ये  मस्क्युलर लुकवाला टँक, ऐसपैस सीट, स्ट्रेट राइडिंग पोझिशन, पुरेसा लेगरूम आणि ऑप्टिमाइझ ग्रॅब-रेल्स देण्यात आले आहेत.

15 मार्चपूर्वी Mavrick 440 चे बुकिंग करून मिळवा फ्री ऍक्सेसरीझ

15 मार्चच्या आधी जर तुम्ही मावरिक 440 साठी बुकिंग केले, तर तुम्हाला चक्क 10,000 रुपयांपर्यंत  कस्टमाईस मावरिक किट ऍक्सेसरीझ आणि मर्चंडाईस अगदी मोफत मिळणार, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करून ह्या बुकींगचा फायदा घ्या.

मावरिक 440 किंमत आणि बुकिंग

या बाइकमध्ये दिलेल्या तीन व्हेरियंटची किंमत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे, मावरिक 440 बेस व्हेरियंटची किंमत 1,99,000 रुपये, मावरिक 440 मिड व्हेरियंटची किंमत 2,14,000 रुपये असणार आहे तर टॉप व्हेरियंटची किंमत 2,24,000 असणार आहे.

हीरो मोटोकॉर्प मावरिक 440 साठी  बुकिंग तुम्ही 5000 रुपये टोकन किंमत भरून करू शकता. या बाईकच्या बुकिंगसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या हीरो मोटोकॉर्प शोरूममध्ये जाऊन विचारणा करू शकता, किंवा हीरो मोटोकॉर्प डिलर कडे चौकशी करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment