‘डुकाटी डायवेल V4 लिमिटेड एडिशनचे’ जागतिक बाजारपेठेत पदार्पण. जाणून घ्या, वैशिष्ट्ये आणि किंमत

Ducati Diavel V4 Price – Mileage, Images, Colours : डुकाटी मोटारसायकल आणि बेंटले कार प्रेमीसाठी खुशखबर…! बेंटले आणि डुकाटी या दोन ‘अनोख्या आणि शक्तिशाली उत्पादन वाहन’ असलेल्या कंपनीने मिळून डुकाटी डायवेलची मर्यादित आवृत्ती बनवली आहे. ज्याच्या हटके आणि अनोख्या स्टाइलिंग आणि लूकची चर्चा सगळीकडे होते. जाणून घेऊया या डुकाटी डायवेल V4 लिमिटेड एडिशन बद्दल सर्व माहिती.

  • डुकाटी डायवेल V4 लिमिटेड एडिशन: हटके स्टायलिंग
  • Ducati Diavel V4: इंजिन
  • डुकाटी डायवेल V4 : किंमत

Ducati Diavel V4 Price - Mileage, Images, Colours

डुकाटी डायवेल V4 : परिचय आणि हटके स्टायलिंग

ऑटोमोटिव्ह क्षेत्रातली सर्वात अप्रतिम आणि प्रभावशाली बेंटली ने सुंदर बॉडी सोबत तांत्रिक कौशल्याने भरलेल्या सेंट्रो स्टाइल डुकाटीशी एकत्रित येऊन लक्झरी मोटरबाइक -डुकाटी डायवेल V4 लिमिटेड एडिशन बाजारपेठेत आणाल आहे. या मॉडेलच्या फक्त दुर्मिळ 550 आवृत्या विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये 500 आवृत्या डुकाटी डायवेल V4 असणार आहेत आणि उर्वरित 50 ‘डुकाटी डायवेल फॉर बेंटले मुलिनर’ “Diavel for Bentley Mulliner” बाइक्स असणार आहेत, ह्या स्पेशल बाईक्स बेंटले ग्राहकांसाठी राखीव असणार आहेत.

ज्यामध्ये या गाडीच्या हाय-प्रोफाइल ग्राहकाना त्यांच्या आवडीप्रमाणे या मोटारसायकलला अन्य सुविधासोबत रंग आणि ट्रिम चा पर्याय अनेक पर्यायी मिळणार आहे. डुकाटी डायवेलची ची चाके डार्ट सॅटिन टायटॅनियममध्ये बनवली असून गाडीला स्पोर्टी लुक देण्यासाठी ग्रिल आणि सॅडलवर लाल अॅक्सेंट एकत्र करून काळ्या अल्कंटारा सॅडलच्या वर बेंटली लोगो दिला आहे.

Ducati Diavel V4: इंजिन

ऑटोमोटिव्ह आर्टचा एक भाग असणारी डायवेल V4 ह्या मॉडेलच्या इंजिनबाबत माहिती देता, 1,158cc चे V4 इंजिन 7,500rpm वर 126Nm पीक टॉर्क तयार करते तर 10,750rpm वर 166bhp कमाल पॉवर तयार करू शकतो. या V4 मध्ये , इंजिन सोबत सहा-स्पीड गिअरबॉक्ससह एकत्र आणले आहे, ज्यामुळे डायवेल V4 ताशी 299 किमी इतकी रेंज देते. फ्रंट मडगार्ड, फ्युएल टैंक आणि एयर इंटेकसारखे कॅंपोनेंत या मध्ये उपलब्ध आहेत.

डुकाटी डायवेल V4 : किंमत आणि बुकिंग

डुकाटी डायवेल च्या ग्राहकाला गाडी विकत घेताना खास अनुभव यावा ,यासाठी मोटरसायकल सोबत कव्हर, वैयक्तिक लाकडी केस , डुकाटी डायवेल ऑथेंटीसीटी सर्टिफिकेट आणि एक पॅसेंजर सॅडल या गोष्टी सुपुर्द करण्यात येणार आहेत.

तुम्हालासुद्धा या मर्यादित एडिशन बीस्टसाठी बुकिंग करायचं असेल तर लवकरच तुम्ही तुमच्या जवळच्या डुकाटी डीलरशी संपर्क तुमचा स्लॉट बुक करू शकता. भारतामध्ये लक्झरी मोटरबाइक डुकाटी डायवेल रु. 52.08 लाख म्हणजेच 58,000 EUR ची किंमत असून ,Bentley Mulliner Edition Diavel, ज्याची फक्त 50 Mulliner ग्राहकांना विक्री केली जाणार आहे, ही मोटारसायकल 63.76 लाख किंमतीमध्ये म्हणजेच 71,000 EUR मध्ये विकली जाणार आहे.

हेपण वाचा:

‘नवीन पोर्श मॅकन EV’ प्रोटोटाइप फर्स्ट लूक, जाणून घा वैशिष्ट्ये, इंटीरियर आणि किंमत

ट्राफिक नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलन दंड फास्ट टॅग अकाउंट मधून कट होणार, वाचा काय आहे नवा नियम?

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment