रॉयल एन्फिल्डचे वर्चस्व संपणार! बुलेट संपवायला आली हि तुफान गाडी

हिरो मोटोकॉर्प ने हार्ले-डेविडसन बरोबर भागेदारी करत त्यांची पाहिली 500cc बाईक “Hero Mavrick” लाँच करणार आहे. हि गाडी रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350, हंटर 350 आणि ट्रायम्फ स्पीड 400 या वाहनांशी सरळ स्पर्धा करणार आहे. मावरिक 440 येत्या २३ जानेवारीला संपूर्ण देशात लाँच केली जाणार असून गाडीचे काही विशेष फीचर्स समोर आले आहेत.

Hero Maverick 450 – मुख्य फीचर्स

हिरो मावरिक हर्ले-डेव्हिडसनचा X440 प्लॅटफॉर्म शेअर करणार असून, या गाडीपेक्षा हिरो मावरिकची प्रोफाइल एकदम वेगळी असणार आहे.

Maverick 440 चे काही प्रमुख फीचर्स आहेत ज्यामध्ये गोलाकार हेडलॅम्प, ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप, गोल आरसे, मोठी पेट्रोल टाकी, रुंद हँडलबार, स्टॅंडर्ड ग्राबरेल सह सिंगल लॉन्ग सीट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.  हर्ले-डेव्हिडसनचा X440 प्लॅटफॉर्म शेअर जरी केला असला तरी Mavrick ला X440 च्या तुलनेत नवीन अलॉय व्हील्स पॅटर्न दिला गेला आहे.

गाडीची किंमत भारतीयांना रुचेल अशी ठेवण्यासाठी या गाडीत कॉस्ट कटिंग साठी X440 चा गोलाकार 3.5-इंच TFT डिस्प्ले जश्याचा तसा इथे दिला जाऊ शकतो, हा डिस्प्ले स्पीडोमीटर, पेट्रोल गेज, गियर शिफ्ट इंडिकेटर, साइड स्टॅन्ड अलर्ट, एबीएस अलर्ट, कॉल नोटिफिकेशन्स, मेसेजेस, मुसिक बार आणि टर्न-बाय-टर्न नेविगेशन सारखे फीचर्स यात वापरता येऊ शकतात. या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला मोबाईल ब्लू-टूथ द्वारे जोडता देखील येतो.

तुम्हाला वाचायला आवडेल – Ather 450 Apex Launch: ब्रेक न दाबता थांबते हि ई-स्कूटर,

ब्रेकिंग साठी गाडीमध्ये पुढच्या चाकाला 320 मिमीडिस्क आणि मागच्या चाकाला 240 मिमी डिस्क ब्रेक दिला गेला आहे. यासोबत सेफटी साठी डुअल-चैनल एबीएस देखील यात ऍड केले गेले आहे ज्याने गाडीची ब्रेकिंग उत्तम कॉन्फिडन्ट होते.

हीरो मावरिक 440 – इंजिन परफॉर्मन्स

हीरो मावरिकला वाऱ्याचा वेग देण्यासाठी 440cc, सिंगल सिलेंडर, एयर-ऑयल कूल्ड इंजिन दिले गेले आहे. हे शक्तिशाली इंजिन 27 bhp पॉवर आणि 38 Nm मॅक्सिमम टॉर्क उत्पन्न करतो. या इंजिनला 6-स्पीड गियरबॉक्स शी जोडले गेले आहे.

Hero MAVRICK B

हीरो मावरिक 440 – रॉयल एन्फिल्डचे वर्चस्व संपणार?

हीरो मावरिक 440 लाँच करून हिरो या सेगमेंट मध्ये एन्ट्री जरी घेत असेल तरी रॉयल एन्फिल्ड आणि ट्रायम्फला टक्कर देण्याची चूक हिरो करणार नाही कारण रॉयल एन्फिल्डचा एक वेगळा चाहता वर्ग असून RE च्या बाजारपेठेतील वर्चस्वाला हिरो आव्हान देऊ शकत नाही म्हणूनच कंपनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण करण्याचे प्रयत्न करेल. राहिली गोष्ट किमती ची तर हिरो या गाडीला २ लाखांच्या आत लाँच करून ग्राहक आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्की करेल.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment